ठाकरे सरकारचा 'यू-टर्न'... काल म्हणाले, नाईट कर्फ्यू कशाला?, आज लागू केला!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2020 08:26 PM2020-12-21T20:26:18+5:302020-12-21T20:39:49+5:30

Uddhav Thackeray On Night Curfew : सकाळीच केंद्रीय आरोग्य़मंत्री हर्षवर्धन यांनी  केंद्र सरकारने पुरेशी काळजी घेतल्याचे म्हटले होते. अशातच ब्रिटनच्या धर्तीवर कोणत्याही राज्याने अद्याप नाईट कर्फ्यूचे पाऊल उचलले नाहीय. यामुळे ठाकरे सरकारने घेतलेला निर्णय बुचकळ्यात टाकणारा आहे.

Uddhav Thackeray government's 'U-turn'; no Night Curfew promise given on Sunday | ठाकरे सरकारचा 'यू-टर्न'... काल म्हणाले, नाईट कर्फ्यू कशाला?, आज लागू केला!

ठाकरे सरकारचा 'यू-टर्न'... काल म्हणाले, नाईट कर्फ्यू कशाला?, आज लागू केला!

Next

मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी दुपारी फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी "राज्यात पुन्हा लॉकडाऊनची गरज मला वाटत नाही. पण अजूनही आपण धोक्याच्या वळणावर आहोत हे विसरुन चालणार नाही", असं सांगितले. याचबरोबर नाईट कर्फ्यू, लॉकडाऊन कायद्याने लावू शकतो. पण, ते का करायचं? असा सवाल करत यापुढे असे काही होणार नसल्याचे संकेत दिले होते. मात्र, काही तासांतच उद्धव ठाकरेंनी यूटर्न घेतला आहे. 




केंद्र सरकारने ब्रिटनहून येणारी विमाने परवापासून बंद केली आहेत. आज रात्री ते उद्या रात्रीपर्यंत मुंबईत ५ विमाने लंडनहून येणार आहेत. यासाठी पंचतारांकीत हॉटेल्सच्या २००० रुम आणि हॉस्पिटलचे १०० बेड आरक्षित केलेले आहेत. सकाळीच केंद्रीय आरोग्य़मंत्री हर्षवर्धन यांनी  केंद्र सरकारने पुरेशी काळजी घेतल्याचे म्हटले होते. अशातच ब्रिटनच्या धर्तीवर कोणत्याही राज्याने अद्याप नाईट कर्फ्यूचे पाऊल उचलले नाहीय. यामुळे ठाकरे सरकारने घेतलेला निर्णय बुचकळ्यात टाकणारा आहे. महत्वाचे म्हणजे रविवारी त्यांना ब्रिटनमधील नवीन कोरोना स्ट्रेन आणि तेथील लॉकडाऊनची माहिती होती. याचा उल्लेखही त्यांनी यावेळी केला होता. 

पहिल्या लॉकडाऊननंनतर महाराष्ट्रातील वाढलेल्या कोरोना रुग्णांवरून राजकारण सुरु झाले होते. यावेळी ठाकरे व त्यांच्या मंत्र्यांनी केंद्र सरकारला जबाबदार धरत पदेशातून येणाऱ्या विमानांबाबत काहीच माहिती दिली नसल्याची टीका केली होती. 


उद्धव ठाकरे काय म्हणाले होते? 
फेसबुक लाईव्हमध्ये उद्धव ठाकरेंनी म्हटले होते की, मी आजपर्यंत जे जे आपल्याला सांगत आलो, ते ते आपण मनापासून अमलात आणत गेलात आणि म्हणूनच मी म्हणेन की आजच्या परिस्थितीवर आपण पूर्णपणे काबू मिळवला नसला तरी काही प्रमाणात नक्कीच नियंत्रण मिळवलं आहे. जवळपास सर्व गोष्टी आता उघडलेल्या आहेत. रहदारी सुरू झालेली आहे, कारभार सुरू झालेले आहेत, येणं-जाणं भेटणं याही गोष्टी सुरू झालेल्या आहेत. मात्र आपला कुटुंबप्रमुख म्हणून प्रत्येक पावलावर सावध रहा हे सांगणं माझं कर्तव्य आहे. गेल्या मार्चपासून आपल्या राज्यामध्ये कोरोनाचे पेशंट दिसायला लागले. त्यानंतर त्याची वाढ किती झाली, कमी कसे झाले, दुदैवाने मृत्यू किती झाले हे सर्व काही आपण जगासमोर अत्यंत पारदर्शकपणे ठेवलेलं आहे.


युरोपमध्ये आणि इंग्लंडमध्ये आजपासून आधीपेक्षा कडक लॉकडाऊन जाहीर केला आहे. का करावा लागला? आता न्यू इयर येणार. जसं आपण शुभेच्छा देत नववर्षाचं स्वागत करणार तसंच तेही करणार. हा टप्पा तिथे गर्दीचा असतो. गर्दी टाळण्यासाठी त्यांनी लॉकडाऊन केलाय. कोरोनाने तिकडे आपला अवतार बदलला आहे. काळाप्रमाणे त्याने त्याची गती वाढवली आहे. तिथे हीच भीती आहे की लॉकडाऊन नाही केला तर झपाट्याने पसरणारा व्हायरस गेल्या वेळेपेक्षा अधिक मोठा हाहाकार पसरवू शकेल. अजूनही आपण धोक्याच्या वळणावर आहोत. नाईट कर्फ्यू, लॉकडाऊन कायद्याने लावू शकतो. पण, ते का करायचं? ७०-७५% लोकं चेहऱ्यावर मास्क घालून फिरत असतात. पण उरलेल्यांना मी सूचना देतो की आपणही ही बंधन पाळा. कारण यामुळे केवळ आपल्यालाच धोका निर्माण होतो असं नाही पण जे ७०-७५% लोकं सावधानता बाळगत आहेत त्यांना हा धोका होऊ शकतो, आपल्या कुटुंबियांना हा धोका होऊ शकतो. मला असं वाटतं की आजार आणि इलाजापेक्षा काळजी घेतलेली बरी, असे ते म्हणाले होते. 

Web Title: Uddhav Thackeray government's 'U-turn'; no Night Curfew promise given on Sunday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.