शहरं
Join us  
Trending Stories
1
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
2
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
3
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
4
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
5
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
6
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
7
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
8
मंगळ ग्रह गायब झाला तर पृथ्वीचं काय होणार? संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर  
9
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
10
विरोधी पक्षनेतेपदाबाबत उद्धव ठाकरे आक्रमक, सरकारची कोंडी करण्याची तयारी; स्पष्ट इशाराच दिला
11
“अधिवेशानाचे सत्ताधाऱ्यांना गांभीर्य नाही, ‘हम करे सो कायदा’ पद्धतीने…”: हर्षवर्धन सपकाळ
12
“संसदीय लोकशाहीत विविध पक्षांच्या संघटनेचे योगदान देखील महत्त्वाचे”: मंत्री चंद्रकांत पाटील
13
“बाबा आणि आत्याने आईला खूप मारलं'”; ढसाढसा रडत ४ वर्षांच्या लेकाचा धक्कादायक खुलासा
14
अक्षय खन्नाला आहेत दोन भाऊ, एक सख्खा अन् एक सावत्र, दोघांनीही बॉलिवूडमध्ये केलं काम
15
विराट कोहली, रोहित शर्माला कपिल देव यांचा अजब सल्ला, म्हणाले- "मला वाटतं की टीम इंडियात..."
16
कॅमेरा नसलेला 'आयफोन' बाजारात? खरेच असा फोन अस्तित्वात आहे का? ॲप्पलच बनविते...
17
या ठिकाणी अचानक पडले ७०० मोठे खड्डे, जमिनीत गाडला जातोय संपूर्ण परिसर, कारण काय?
18
“साधूसंत झाडावर राहणार का? एक दिवस लोक सरकारला ‘चले जाव’ म्हणतील”; अण्णा हजारे संतापले
19
मैत्रिणींचा सोनमला वाचवण्याचा प्रयत्न? राजा रघुवंशीच्या भावाचा खळबळजनक आरोप
20
टाटा-हिंडाल्कोसह 'या' शेअर्समध्ये बंपर तेजी! बाजारात सलग दुसऱ्या दिवशी गुंतवणूकदारांची चांदी
Daily Top 2Weekly Top 5

"नेपाळ, श्रीलंकेतही येणार भाजप सरकार; अमित शहांकडे संपूर्ण योजना तयार"

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2021 08:36 IST

श्रीलंका, नेपाळमध्ये पक्षविस्तार करण्याची योजना अमित शहांकडे आहे. त्या देशांमध्येही भाजपचं सरकार येईल, असं त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लब कुमार देब यांनी म्हटलं.

अगरताळा: त्रिपुराचे मुख्यमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे नेते बिप्लब कुमार देब (Tripura CM Biplab Deb) कायम त्यांच्या विधानांमुळे चर्चेत असतात. आता देब यांनी भाजपच्या विस्ताराबद्दल एक विधान केलं आहे. सध्या हे विधान चर्चेचा विषय ठरत आहे. भाजप पुढील काळात आंतरराष्ट्रीय स्तरावर  विस्तार करेल, असं देब म्हणाले. अगरताळ्यात पक्षाच्या एका कार्यक्रमात ते बोलत होते. भाजपच्या विस्तार योजनेवर बोलताना देब यांनी गृहमंत्री अमित शहांसोबत झालेल्या एका बैठकीचा संदर्भ दिला."भाजपा सरकारच्या काळात हिंदू असुरक्षित; रिंकू शर्माच्या हत्येला अमित शहा जबाबदार, त्यांनी राजीनामा द्यावा"भाजपनं केवळ देशातच नव्हे, तर परदेशातही विस्तार करण्याची योजना आखली आहे. नेपाळ आणि श्रीलंकेत भाजपचं सरकार स्थापन करण्याची योजना शहांकडे आहे, असं देब यांनी पक्षाच्या कार्यक्रमात सांगितलं. २०१८ मध्ये त्रिपुरामध्ये विधानसभेची निवडणूक झाली. त्यावेळी झालेल्या एका बैठकीत झालेल्या संवादाचा तपशील यावेळी देब यांनी दिला. 'विधानसभेच्या निवडणुकीसाठी पक्षानं बैठक आयोजित केली होती. त्या बैठकीला अमित शहा उपस्थित होते. त्यावेळी पक्षाचं नेतृत्त्व शहांकडे होतं,' असं देब म्हणाले.शाह आणि अधीर यांच्यात वार-पलटवार, 'मुर्गी-अंडा-मुर्गी' वक्तव्यावर लोकसभेत एकच हशा!'तीन वर्षांपूर्वी झालेल्या त्या बैठकीत शहांनी परदेशातील विस्ताराच्या योजनेवर भाष्य केलं होतं. त्यावेळी आम्ही अतिथीगृहात बसलो होतो. पक्षाचे ईशान्य झोनचे सचिव अजय जम्वाल बैठकीला हजर होते. भाजपनं अनेक राज्यांमध्ये सरकार स्थापन केल्याचं ते म्हणाले. त्यावर श्रीलंका आणि नेपाळ अद्याप शिल्लक असल्याचं शहांनी म्हटलं. आपल्याला पक्षाचा विस्तार करायचा आहे. नेपाळ आणि श्रीलंकेत सरकार स्थापन करण्यासाठी पक्षविस्तार करायचा आहे, असं त्यावेळी शहा म्हणाले होते,' असं देब यांनी उपस्थितांना सांगितलं.यावेळी देब यांनी अमित शहांच्या नेतृत्त्वाची मुक्तकंठानं स्तुती केली. अमित शहांच्या नेतृत्त्वाखाली भाजप जगातला सर्वात मोठा पक्ष झाल्याचं ते म्हणाले. 'केरळमध्ये दर पाच वर्षांनी सरकार बदलतं. डावे आणि काँग्रेस आलटून पालटून सत्तेत येतात. पण हा ट्रेंड भाजप बदलेल. केरळमध्ये भाजपचं सरकार येईल,' असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पश्चिम बंगालमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसचा पराभव करून भाजप सत्ता स्थापन करेल, असंदेखील देब म्हणाले.

टॅग्स :Amit Shahअमित शहाBiplab Debबिप्लब देवBJPभाजपाNepalनेपाळSri Lankaश्रीलंका