शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे पोलिसांची मोठी कारवाई! ससूनच्या डॉक्टरांनी बिल्डर बाळाचे रक्ताचे नमुने बदलले; दोघांना अटक
2
"तुला मिळणार नाही, मोठ्याला घेऊन ये"; पुण्यात अचानक दारु विक्रीचे 'नियम' लागू झाले
3
भीषण! इस्रायलने राफामध्ये केला एअर स्ट्राईक; 35 जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी
4
४ जूनला मतमोजणी, १ जूनला इंडिया आघाडीची मोठी बैठक; केजरीवाल, स्टॅलिन यांना निमंत्रण
5
मालेगावच्या माजी महापौरांवर मध्यरात्री गोळीबार; हॉटेलमध्ये तीन गोळ्या झाडल्या, अब्दुल मलिक जखमी
6
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात, Adani Portsच्या शेअरमध्ये तेजी, Wipro घसरला
7
"भारतात आजही सावरकरांचे विचार लागू..."; रणदीप हूडाने मनातली भावना स्पष्टच सांगितली
8
डावखरेंचा पत्ता कापला? भाजपला पाठिंबा देणाऱ्या राज ठाकरेंनी विधान परिषदेसाठी उमेदवार उतरवला
9
गुरु रंधावा-शहनाज गीलच्या डेटिंगचं सत्य आलं समोर; गायकाने केला खुलासा, म्हणाला, 'मी डेट करायला सुरुवात...'
10
आजचे राशीभविष्य: भागीदारीत लाभ, प्रतिस्पर्ध्यांवर मात; हातून सत्कार्य घडेल, भाग्याचा दिवस
11
जान्हवी कपूरने शेअर केला हिंदी मालिकेचा प्रोमो, ऋतुजा बागवेची आहे मुख्य भूमिका
12
मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघ: घटलेल्या मतदानाचा नेमका फटका कोणाला बसणार?
13
JioCinema चा आणखी एक धमाका! अवाक् करणाऱ्या किंमतीत मिळणार प्रीमिअम ॲन्युअल प्लॅन, पाहा डिटेल्स
14
मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघ: अंधेरी पश्चिममधील मतदान महत्त्वाचे ठरणार!
15
६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना जून ठरेल शानदार, नवीन ओळख फायदेशीर; सुवर्ण संधी, सुखाचा काळ!
16
मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघ: कमी मतदानामुळे संभ्रमाची स्थिती, नक्की काय होणार?
17
ठाण्यात सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर, बाहेर पडण्यासाठी मार्ग अपुरा; गेमिंग झोनमध्ये तुटपुंजी अग्निरोधक यंत्रणा
18
घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरण: आरोपी भावेश भिंडेच्या कोठडीत चार दिवसांची वाढ
19
सायन हॉस्पिटल अपघात प्रकरण: चौकशीनंतर दोषींवर होणार कठोर कारवाई- अतिरिक्त आयुक्त
20
विशेष लेख: असह्य उन्हाळ्याचा आता मेंदूवरही परिणाम! दाहाचे संकट केवळ ‘गार वाटण्या’ने सुटणारे नाही

बंगालमध्ये निवडणुकीपूर्वी रक्तपात, मंत्र्यावर बॉम्बहल्ला, तर कोलकात्यात BJP-TMC कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी

By बाळकृष्ण परब | Published: February 18, 2021 8:10 AM

Bomb attacked on Trinamool Congress minister Zakir Hussain in West Bengal : पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणूक जसजशी जवळ येत आहे. तसतसे राज्यात हिंसक राजकारण वाढू लागले आहे.

कोलकाता - पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणूक (West Bengal Assembly Election 2021) जसजशी जवळ येत आहे. तसतसे राज्यात हिंसक राजकारण वाढू लागले आहे. आतातर ममता बॅनर्जी (Mamata Banerjee ) यांच्या सरकारमधील मंत्र्यावरच बॉम्बहल्ला (Bomb Attack) झाल्याने खळबळ उडाली आहे. तर कोलकात्यामध्ये भाजपा (BJP) आणि तृणमूल काँग्रेसच्या (TMC) कार्यकर्त्यांमध्ये तुंबळ हाणामारी झाल्याचे वृत्त आहे. (Bomb attacked on Trinamool Congress minister Zakir Hussain in West Bengal)ममता बॅनर्जींच्या नेतृत्वाखालील सरकारमधील मंत्री झाकीर हुसेन यांच्यावर मुर्शिदाबाद जिल्ह्यात पेट्रोल बॉम्बने हल्ला करण्यात आला. त्यानंतर हुसेन यांना तातडीने जंगीपूरमधील उपविभागीय रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले. मंत्री झाकीर हुसेन यांचा ताफा निमिता रेल्वेस्टेशनच्या दिशेने जात असताना ताफ्यावर हा हल्ला करण्यात आला.

मिळत असलेल्या माहितीनुसार मंत्री झाकीर हुसेन यांना आता कोलकातामध्ये आणण्यात येत आहे. मुर्शिदाबाद मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयातील डॉक्टर एके बेरा यांनी सांगितले की, सध्या मंत्री झाकीर हुसेन यांची प्रकृती स्थिर आहे. दरम्यान, या घटनेचा एक व्हिडीओ समोर आला असून, त्यामध्ये गंभीररीत्या जखमी झालेले मंत्री दिसत आहेत. तसेच या घटनेनंतर मंत्र्यांना कशाप्रकारे तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले हे दिसत आहे.एकीकडे मंत्र्यांवर बॉम्बहल्ला झाला तर दुसरीकडे कोलकातामध्ये भाजपा आणि टीएमसीचे कार्यकर्ते आपसात भिडल्याचे वृत्त आहे. भाजपाचे नेते फूलबागान परिसरात उपायुक्तांच्या कार्यालयात एका घटनेबाबतची माहिती घेण्यासाठी जात होते. तेव्हा तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी सुरू केली. त्यादरम्यान बाचाबाची होऊन दोन गट एकमेकांशी भिडले.दरम्यान, पश्चिम बंगालमधील मंत्री झाकीर हुसेन यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा भाजपा नेते कैलाश विजयवर्गीय यांनी निषेध केला आहे. याबबत केलेल्या ट्विटमध्ये विजयवर्गीय म्हणाले की, झाकीर हुसेन यांच्यावर निमटिटा रेल्वेस्टेशनवर क्रूड बॉम्बच्या माध्यमातून झालेल्या हल्ल्याचा मी कठोर शब्दात निषेध करतो. त्यांच्या प्रकृतीला लवकर आराम पडावा अशी मी प्रार्थना करतो.

टॅग्स :west bengalपश्चिम बंगालAll India Trinamool Congressआॅल इंडिया तृणमूल काँग्रेसBJPभाजपाCrime Newsगुन्हेगारीPoliticsराजकारणMamata Banerjeeममता बॅनर्जी