“शिवसेनेवर आरोप करणारे मुंबई अन् मुंबादेवीचा अपमान करतायेत" - खासदार संजय राऊत

By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2020 02:30 PM2020-09-07T14:30:07+5:302020-09-07T14:35:12+5:30

शिवसेना नेहमीच महिलांच्या हक्कासाठी यापुढेही संघर्ष करेल. शिवसेनेचे प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आम्हाला हीच शिकवण दिली आहे असं शिवसेना नेते संजय राऊत म्हणाले आहेत.

"Those who accuse Shiv Sena are insulting Mumbai and Mumbadevi" - MP Sanjay Raut on Kangana Ranaut | “शिवसेनेवर आरोप करणारे मुंबई अन् मुंबादेवीचा अपमान करतायेत" - खासदार संजय राऊत

“शिवसेनेवर आरोप करणारे मुंबई अन् मुंबादेवीचा अपमान करतायेत" - खासदार संजय राऊत

googlenewsNext
ठळक मुद्देशिवसेना छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणा प्रताप यांच्यासारख्या राजांना आदर्श मानतेकाही लोकांकडून द्वेषाने शिवसेना महिलांचा अपमान करत आहे असं पसरवलं जात आहेशिवसेना नेहमीच महिलांच्या हक्कासाठी यापुढेही संघर्ष करेल ही बाळासाहेबांची शिकवण आहे.

मुंबई – बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत आणि शिवसेना यांच्यातील संघर्ष पेटला आहे. कंगना राणौतला अर्वाच्च भाषा वापरल्याप्रकरणी संजय राऊत यांच्याविरोधात अनेकांनी नाराजी व्यक्त केली. कंगना जे मुंबईबद्दल बोलली ते चुकीचेच आहे परंतु एका महिलेबाबत अर्वाच्च भाषेचा वापर करणे ही छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण नाही असं सांगत अनेकांनी संजय राऊतांच्या भूमिकेचा विरोध केला होता.

काँग्रेस नेते संजय निरुपम यांनीही शिवसेनेने छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला आहे असं म्हटलं होतं. त्यावरुन आता संजय राऊत यांनी ट्विटवरुन शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली आहे. या ट्विटमध्ये म्हटलं आहे की, शिवसेना हिंदुचे प्रेरणास्थान छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणा प्रताप यांच्यासारख्या राजांना आदर्श मानते. त्यांनी आम्हाला महिलांचा सन्मान राखणे शिकवलं आहे. पण काही लोकांकडून द्वेषाने शिवसेना महिलांचा अपमान करत आहे असं पसरवलं जात आहे असा आरोप त्यांनी केला.

तसेच जे लोक अशाप्रकारे शिवसेनेवर आरोप करत आहेत त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी की, ते मुंबई आणि मुंबादेवीचा अपमान करत आहेत. शिवसेना नेहमीच महिलांच्या हक्कासाठी यापुढेही संघर्ष करेल. शिवसेनेचे प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आम्हाला हीच शिकवण दिली आहे असं शिवसेना नेते संजय राऊत म्हणाले आहेत.

काय म्हणाली होती कंगना राणौत?

संजयजी तुम्ही माझ्याबद्दल अपशब्द वापरले..तुम्ही एक नेते आहात आणि हे तुम्हाला माहितच असेल की या देशात तासाला अनेक महिलांवर बलात्कार होत आहे, त्यांच्यावर अत्याचार केला जात आहे, अॅसिड हल्ला केला जातोय. तुम्हाला माहित्येय याला जबाबदार कोण आहे? तुम्ही माझ्याप्रती अपशब्द वापरून जी मानसिकता दर्शवलीत, ही त्याला जबाबदार आहे. या देशातील मुलगी तुम्हाला कधीच माफ करणार नाही,' असे तिनं म्हटलं होतं.

आमीर खान, नसरुद्दीन त्यांना कुणीच काही म्हटलं नाही.

''या देशात राहण्याची भीती वाटते, असं जेव्हा आमीर खान म्हटला होता. त्यावेळी कुणीच असे अपशब्द वापरले नाहीत. नसरुद्दीन शाह यांनाही कुणीच प्रत्युत्तर दिलं नाही. मुंबई पोलिसांचे मी कौतुक करताना थकत नव्हती. पण, पालघर साधू हत्या असेल किंवा सुशांत सिंग राजपूत प्रकरण असेल त्यावरून मी त्यांच्यावर टीका केली, तर ती माझी अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे,असंही ती म्हणाली.

संजय निरुपमांची शिवसेनेवर टीका

कंगना राणौतनं मुंबईबद्दल जे भाष्य केले आहे ते आम्हा कोणालाच मान्य नाही. तिच्या वक्तव्याचा आम्ही निषेध केला. पण शिवसेनेने छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन कंगनावर अर्वाच्च भाषेचा वापर केला. ही शिवसेनेची निराशा आहे. छत्रपतींच्या नावावर उघडपणे शिविगाळ करणे हा महाराजांचा अपमान आहे. सरकारमध्ये बसलेल्या लोकांनी या गोष्टीचा निषेध केला पाहिजे अशी मागणी संजय निरुपम यांनी केली होती.

कंगना राणौत आणि शिवसेना यांच्या संघर्षाची सुरुवात कंगनाच्या विधानानं झाली. ज्यात तिने शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर आरोप करत त्यांनी मुंबईत येऊ नये असं धमकावल्याचं सांगितले. याबाबत कंगनानं ट्विट करुन म्हटलं होतं की, संजय राऊत यांनी मला उघडपणे मुंबईत न येण्याची धमकी दिली आहे. मुंबईच्या गल्लोगल्ली स्वातंत्र्याचे नारे लावले जात होते आणि आता उघडपणे धमकी मिळत आहे. मुंबई पाकिस्तान व्याप्त काश्मीरसारखी का वाटतेय? असं तिने म्हटलं होतं.

Read in English

Web Title: "Those who accuse Shiv Sena are insulting Mumbai and Mumbadevi" - MP Sanjay Raut on Kangana Ranaut

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.