शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

'...तर राजकीय संन्यास घेईन', भाजपाच्या आरोपानंतर उदय सामंत यांचं विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2021 15:09 IST

Uday Samant : नारायण राणे यांच्या जन आशिर्वाद यात्रेसाठी जमाव बंदी लागू करण्यात आली नाही, असे जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी म्हटले आहे.

मुंबई : गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत केंद्रीय मंत्री नारायण यांनी केलेल्या आक्षेपार्ह विधानानंतर त्यांच्याविरोधात संपूर्ण शिवसेना एकवटल्याचे पाहायला मिळाले, तर भाजपा नारायण राणेंच्या मागे ठामपणे उभा राहिलेला दिसत आहे. यातच सिंधुदुर्गमध्ये जमाव बंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जन आशिर्वाद यात्रेला ब्रेक लावण्यासाठी ही जमाव बंदी लागू केल्याचा आरोप भाजपाने केला आहे. 

दरम्यान, नारायण राणे यांच्या जन आशिर्वाद यात्रेसाठी जमाव बंदी लागू करण्यात आली नाही, असे जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी म्हटले आहे. तसेच, नारायन राणे यांच्या जन आशिर्वाद यात्रेमुळे मी जमाव बंदीचे आदेश दिले, हे सिद्ध झाल्यास राजकारणातून संन्यास घेईन, असे विधान उदय सामंत यांनी केले आहे.

उदय सामंत आज रत्नागिरी दौऱ्यावर आहेत. यावेळी उदय सामंत एबीपी माझा या वृत्तवाहिनीशी बोलत होते. ते म्हणाले,"कोणाचा तरी दौरा आहे म्हणून आहे म्हणून मी रत्नागिरी दौऱ्यावर आहे, असे काही नाही, तो केवळ योगायोग समजावा. गेली तीन दिवस मी रत्नागिरी जिल्ह्यात आहे. जन आशीर्वाद यात्रेच्या वेळापत्रकाला अनुसरून आम्ही दौरे लावले नाहीत. तसेच कालची जी कारवाई होती ती कायदेशीर होती." 

उद्धव ठाकरे यांच्याबाबत अभिमानप्रत्येकाला त्याचा पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. परंतु हा पक्ष वाढवत असतांना प्रत्येकाला प्रत्येकाच्या नेत्याचा अभिमान असतो. तसा आम्हाला उद्धव ठाकरे यांच्याबाबत अभिमान आहे. गर्व देखील आहे. मुख्यमंत्री म्हणून ते अतिशय चांगल काम करत आहेत. कदाचित देशाच्या क्रमवारीत पहिल्या पाच क्रमांकामध्ये उद्धव ठाकरे आल्यामुळे काही लोकांना ते आवडले नसेल, असे उदय सामंत म्हणाले. 

'...तर राजकीय संन्यास घेईन'जन आशिर्वाद यात्रेला ब्रेक लावण्यासाठी जमाव बंदी लागू केल्याचा आरोपावर उदय सामंत यांनी भाष्य केले. यावेळी ते म्हणाले, भाजपाने खोटे आरोप केले आहेत. याचे पुरावे सिद्ध झाल्यास मी राजकीय संन्यास घेईन, असे सामंत म्हणाले. जिल्हाधिकाऱ्यांना स्वायत: अधिकार आहेत ते प्रशासनाचे प्रमुख आहेत. जिल्हादंडाधिकारी देखील आहे, त्यामुळे त्यांना वाटले असेल की कलम १४४ सिंधुदुर्गमध्ये लावणे आवश्यक आहे. ते गणपतीच्या पार्श्वभूमीवर किंवा इतर कोणत्या पार्श्वभूमीवर असेल, असे उदय सामंत यांनी सांगितले.

राणेंची जन आशीर्वाद यात्रा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोरोना काळात केलेल्या कामांना सामान्यापर्यंत पोहोचवण्यासाठी तसेच तेथील जनतेचे प्रश्न जाणून घेण्यासाठी भाजपाकडून देशभर जन आशीर्वाद यात्रा सुरु करण्यात आली आहे. त्यानुसार केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची जन आशीर्वाद यात्रा उद्यापासून रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात असणार आहे.

टॅग्स :Uday Samantउदय सामंतNarayan Raneनारायण राणे BJPभाजपाShiv SenaशिवसेनाRatnagiriरत्नागिरीsindhudurgसिंधुदुर्ग