शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

हेलिकॉप्टरमधून पाहणी करत नाही; प्रत्यक्ष जमिनीवर उतरलोय; मुख्यमंत्र्यांचा मोदींना टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2021 10:29 IST

तौक्ते चक्रीवादळाचा फटका बसलेल्या भागांची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री कोकण दौऱ्यावर; रत्नागिरीत प्रशासनासोबत आढावा बैठक

रत्नागिरी: विरोधकांच्या टीकेला उत्तर देण्यासाठी नव्हे, तर कोकणवासीयांना दिलासा देण्यासाठी चक्रीवादळग्रस्त भागाचा दौरा करत असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. मुख्यमंत्री केवळ चार तासांसाठी कोकणचा दौरा करत आहेत, अशी टीका भारतीय जनता पक्षाकडून केली जात आहे. त्यावर चार तासांसाठी आलो आहे. फोटोसेशन करायला आलो नाही. मला त्याची गरज वाटत नाही, असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला. ते रत्नागिरीत आढावा बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधत होते. हे फडणवीसांना तर पटेल काय? मोदींना कानपिचक्या, देवेंद्रांचे कान टोचलेमुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज रत्नागिरी आणि सिंधुदुर्गच्या दौऱ्यावर आहेत. तौक्ते चक्रीवादळाचा फटका बसलेल्या भागांचा आढावा मुख्यमंत्री घेणार आहेत. मात्र चार तासांच्या दौऱ्यातून परिस्थितीचं आणि संकटाचं गांभीर्य कसं कळणार, असा सवाल विरोधकांकडून उपस्थित केला जात आहे. त्यावर हेलिकॉप्टरनं पाहणी करत नाही. प्रत्यक्ष जमिनीवर उतरून आढावा घेत आहे, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान मोदींना टोला लगावला. बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुजरातमधील वादळग्रस्त भागाची हवाई पाहणी केली. त्यावरून मुख्यमंत्र्यांनी चिमटा काढला.मुंबई हाय दुर्घटनेत अजूनही २६ बेपत्ता; ४९ मृतदेह हाती, नौदलाचे शोधकार्य सुरूचकोकणवासीयांना दिलासा देण्यासाठी रत्नागिरी, सिंधुदुर्गचा दौरा करत आहे. जास्त फिरत बसण्यापेक्षा महत्त्वाच्या गोष्टींवर लक्ष केंद्रीत केलं आहे. पंचनामे पूर्ण होताच मदतीसंदर्भात निर्णय घेतला जाईल. सध्या परिस्थितीचा आढावा घेत आहे. कोणत्या निकषांनुसार मदत करायची याचा निर्णय आढाव्यानंतर घेऊ. माझा दौरा चार तासांचा आहे. फोटोसेशन करण्यात मला रस नाही. त्याची गरज मला वाटत नाही. कारण मी स्वत: फोटोग्राफर आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले. रत्नागिरीत आढावा बैठक घेतल्यानंतर मुख्यमंत्री ठाकरे सिंधुदुर्गसाठी रवाना झाले आहेत. तिथे ते नुकसानग्रस्त भागांची पाहणी करणार आहेत.

टॅग्स :Tauktae Cycloneतौत्के चक्रीवादळUddhav Thackerayउद्धव ठाकरेNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाRatnagiriरत्नागिरी