शहरं
Join us  
Trending Stories
1
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
2
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
3
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
4
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
5
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
6
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
7
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
8
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
9
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
10
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
11
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
12
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
13
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
14
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
15
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
16
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
17
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
18
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
19
रिषभची विकेट घेऊन युझवेंद्र चहलने इतिहास घडवला; ट्वेंटी-२०त पराक्रम करणारा पहिला भारतीय
20
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...

पाच राज्यांसाठी भाजपची यादी जाहीर; बंगालमधून बाबूल सुप्रियो, तमिळनाडूतून खुशबू, तर केरळमधून श्रीधरन मैदानात

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2021 4:57 PM

Elections 2021 : पाच राज्यांच्या निवडणुकांसाठी भाजपनं जारी केली उमेदवारांची यादी, केंद्रीय मंत्री बाबूल सुप्रियो पश्चिम बंगालमधून निवडणूक लढवणार

ठळक मुद्देपाच राज्यांच्या निवडणुकांसाठी भाजपनं जारी केली यादीकेंद्रीय मंत्री बाबूल सुप्रिया पश्चिम बंगालमधू निवडणूक लढवणार

भारतीय जनता पक्षानं पाच राज्यांच्या निवडणुकांसाठी आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. आज पश्चिम बंगालमध्ये निवडणूक लढणाऱ्या उमेदवारांची तिसरी यादी जाहीर करण्यात आली. भाजपचे राष्ट्रीय महासचिव अरूण सिंह यांनी केंद्रीय मंत्री बाबूल सुप्रियो हे विधानसभा निवडणूक लढणार असल्याची घोषणा केली. बाबुल सुप्रियो यांनी टॉलिगंज येथून उमेदवारी देण्यात आली आहे. पश्चिम बंगालच्या निवडणुकांमध्ये भाजपनं चार खासदारांना निवडणुकीच्या मैदानात उतरवलं आहे. तर दुसरीकडे अभिनेते यशदासगुप्ता यांना चंडीतला येथून उमेदवारी देण्यात आली आहे. तर खासदार लॉकेट चटर्जी या चुरचुरा येथून निवडणूक लढवतील. अंजना बासू सोनपूरा दक्षिण, तर राजीव बॅनर्जी डोमजूर येथून, पायल सरकार बेहाला पूर्व आणि अलीपूरद्वार येथून अशोक लाहिरी यांना उमेदवारी देण्यात आली आहे.  पश्चिम बंगालच्या निवडणुकांसाठी रविवारी भाजपकडून ६५ नावांची घोषणा करण्यात आली. यातूल २७ उमेदवारी तिसऱ्या टप्प्यासाठी आहे. तर ३८ उमेदवार हे चौथ्या टप्प्यातील आहे. यामध्ये रविद्रनाथ भट्टाचार्य यांचं नावदेखील सामील आहे. त्यांना सिंहपूरमधून उमेदवारी देण्यात आली आहे. तर स्वप्नदास गुप्ता यांना तारकेश्वर. निशित परमानिक यांना दीनहाटा, इंद्रनील दास यांना कासबा आणि अभिनेत्री तनुश्री चक्रवर्ती यांना हावडा श्यामपूरमधून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तामिळनाडूत २० जागांवर निवडणूक लढवणारदरम्यान तामिळनाडूच्याही उमेदवारांची घोषणा यावेय़ळी करण्यात आली. तामिळनाडूत भाजप एनडीएचे सहकारी म्हणून निवडणूक लढवणार असल्याचं सिंह यांनी सांगितलं. आम्ही राज्यातील २० विधानसभा क्षेत्रांमध्ये निवडणूक लढवणार आहे. प्रदेशाध्यक्ष एल. मुरूगन हे धारापुरम मधून निवडणूक लढवणार आहेत. तर ज्येष्ठ नेते एच राजा कराईकुडी येथून निवडणूक लढवतील. आज भाजपनं १७ उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे.

केरळमध्ये भाजप ११५ जागा लढवणारकेरळमध्ये भाजप ११५ जागांवर निवडणूक लढवणाक आहे. तर अन्य २५ जागा या ४ पक्षांसाठी सोडण्यात आल्या आहेत. मेट्रो मॅन ई श्रीधरन हे पलक्कडमधून निवडणूक लढवणार आहेत. तर माजी राज्य भाजप प्रमुख कुम्मनम राजशेखरन हे नेमोम येथून निवडणूक लढवतील. याव्यतिरिक्त भाजपकडून आसाम आणि पडुचेरीमधील उमेदवरांच्या नावांचीही घोषणा करण्यात आली.

टॅग्स :BJPभाजपाWest Bengal Assembly Elections 2021पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२१Tamil Nadu Assembly Elections 2021तामिळनाडू विधानसभा निवडणूक २०२१Assam Assembly Elections 2021आसाम विधानसभा निवडणूक २०२१Puducherry Assembly Elections 2021पुदुचेरी विधानसभा निवडणूक २०२१Kerala Assembly Elections 2021केरळ विधानसभा निवडणूक २०२१Babul Supriyoबाबुल सुप्रियो