शहरं
Join us  
Trending Stories
1
लाजीरवाण्या पराभवानंतर LSG चे मालक संतापले; कॅप्टन KL Rahul ला झापताना दिसले, Video
2
Fact Check: भारतात ३०० दहशतवादी घुसणार असल्याचे भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा खरंच बोलले? जाणून घ्या सत्य
3
नागपूर मेडिकलच्या अधिष्ठात्यांसह ११ डॉक्टरांविरोधात गुन्हा, निष्काळजीपणाचा ठपका!
4
ना कोहली... ना रोहित...; ब्रायन लाराला वाटतं, हा युवा फलंदाज मोडू शकतो त्याचा 400 धावांचा रेकॉर्ड
5
Chandrayaan-3 नं इतिहास रचला; आता चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी! जाणून घ्या, काय सापडलं?
6
सनरायझर्स हैदराबादने ९.४ षटकांत कुटल्या विजयी १६७ धावा, Mumbai Indians चे आव्हान संपुष्टात आणले
7
१६७ धावा, ९.४ षटकं, १६ चौकार, १४ षटकार! SRH चा चमत्कार, अभिषेक-ट्रॅव्हिस यांनी मोडला १६ वर्षांपूर्वीचा विक्रम
8
शरद पवारांकडे पक्ष विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांची खरमरीत टीका
9
माझे शब्दच हरवले आहेत, ही काल्पनिक फलंदाजी; बेक्कार हरल्यानंतर KL Rahul ला काहीच सूचेना
10
आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी ट्रकचालकास अटक व सुटका
11
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
12
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
13
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
14
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
15
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
16
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
17
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
18
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
19
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज
20
लखनौला बसले धक्के; भुवीच्या चेंडूवर नितीश रेड्डी, सनवीर सिंग यांनी अविश्वसनीय झेल टिपले 

त्या २५ जागांनी बदलले होते सत्तेचे गणित, अण्णा द्रमुकला मिळाली दुसऱ्यांदा संधी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2021 5:08 AM

Tamil Nadu Assembly Elections 2021 : तमिळनाडूच्या राजकारणात गेल्या ३० वर्षांत दुसऱ्यांदा सत्ता मिळवण्याची संधी २०१६ मध्ये अण्णा द्रमुकला मिळाली होती. दर पाच वर्षांनी सत्तेची सूत्रे बदलणाऱ्या तमिळी जनतेचा २०१६ मध्ये पण तसाच मूड होता. पण...

- असिफ कुरणे चेन्नई : तमिळनाडूच्या राजकारणात गेल्या ३० वर्षांत दुसऱ्यांदा सत्ता मिळवण्याची संधी २०१६ मध्ये अण्णा द्रमुकला मिळाली होती. दर पाच वर्षांनी सत्तेची सूत्रे बदलणाऱ्या तमिळी जनतेचा २०१६ मध्ये पण तसाच मूड होता. पण, निवडणूक मैदानात उतरलेल्या काही नव्या पक्ष आणि आघाड्यांमुळे अटी-तटीच्या लढती होत २५ जागांचा निकाल अवघ्या काहीशे मतात लागला. त्यातील १७ जागा अण्णा द्रमुकने पटकावल्या आणि जे. जयललिता यांना मुख्यमंत्रिपदाची सलग दुसऱ्यांदा संधी मिळाली होती.२०१६च्या निवडणुकीतीत सत्ताधारी अण्णाद्रमूक आघाडी विरुद्ध द्रमुक आघाडी असाच प्रमुख सामना होता, पण त्यावेळी इतर दोन आघाड्या आणि काही प्रादेशिक पक्षांनी सत्तेची गणिते बिघडवली होती. अण्णा द्रमुक आघाडीला १३६ जागांवर समाधान मानावे लागले. २०११ च्या तुलनेत त्यांच्या १४ जागा कमी झाल्या होत्या. द्रमुक आघाडीने जोरदार पुनरागमन करत ९८ जागांपर्यंत मजल मारली. पण सत्तेत पोहोचण्यासाठी २० जागा कमी पडल्या.अण्णा द्रमुक तब्बल १७ जागा या एक हजारांपेक्षा कमी मताधिक्याने जिंकल्या होत्या. इतर आघाडीच्या उमेदवारांनी घेतलेल्या मतांमुळे अण्णा द्रमुकला सत्तेत पोहोचण्यासाठी मदत झाली होती. द्रमूकला देखील कमी मताधिक्याने पाच जागा मिळाल्या होत्या.  राधापूरम मतदारसंघातून अण्णा द्रमुकच्या आय. इन्बादुराई यांनी अवघ्या ४९ मतांनी विजय मिळवला होता. त्याचप्रमाणे कथ्थूमन्नारकोई मतदारसंघातून एन. मरुगूमारन यांनी ८७ मतांच्या मताधिक्याने विजय मिळवला होता. व्हीसीकेचे थिरूमलवूलन हे दुसऱ्या स्थानावर तर काँग्रेस उमेदवार तिसऱ्या स्थानांवर राहिले होते.कमी मतांनी निकाल लागलेले मतदारसंघ (कंसात मताधिक्य) अण्णा द्रमुकने जिंकलेले मतदारसंघ१. पून्नामल्ली (७६३), २. अवडी (१०५) ३. पेराम्बूरू (१२४), ४. रोयापूरम (१०३१) ५. थिरूपिरूर (९५०) ६. वारगूर (९८२) ७. अंथीयूर (१०७) ८. करूर (४४१) ९. चिदंबरम (२६५), १०. कथ्थूमन्नारकोई (८७), ११ नन्नीलम (५७६), १२. पेरावूरानी (९९५) , १३. विरालीमलाय (९८६), १४. औट्टापिडारम (४९३), १५. कोविलपट्टी (४२८), १६. तेनकासी (४६२), १७ राधापुरम (४९) द्रमुकने जिंकलेले मतदारसंघ१. चेयूर (३०४) २. तिंडीवनम (१०१) ३. परामरीचेलूर (८१८) ४. थिरुमयम (७६६)५. थिरुनेलवेल्ली (६०१)

टॅग्स :Tamil Nadu Assembly Elections 2021तामिळनाडू विधानसभा निवडणूक २०२१All India Anna Dravida Munnetra Kazhagamआॅल इंडिया अण्णा द्रविड मुनेत्र कझगमDravid Munnetra Kazhagamद्रविड मुनेत्र कझागम