शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपला आताच सांगा...! लोकसभेच्या निकालापूर्वीच भुजबळांनी विधानसभेच्या जागावाटपाची ठिणगी टाकली
2
“यूपीत एनडीएला ७५ प्लस जागा मिळतील, महाराष्ट्रात...”; रामदास आठवलेंनी थेट आकडा सांगितला
3
राहुल गांधी-अखिलेश यादव यांच्या पक्षाला किती जागा मिळतील? अमित शाहंनी केली भविष्यवाणी
4
सेम टू सेम! जुळ्या भावांचे यशही जुळं; सार्थक अन् स्वप्नीलने दहावीत मिळविले १०० टक्के गुण
5
१९९१ साली जे घडलं ते पुन्हा नको म्हणून २००४ ला CM पद नाकारलं; अजित पवारांचा दावा
6
पाकिस्तानचे पुन्हा एकदा दोन तुकडे होतील; माजी PM इम्रान खान यांनी व्यक्त केली चिंता
7
SRH च्या पराभवानंतर काव्या मारन रडली; आता संघातील 'या' खेळाडूंची होणार गच्छंती...
8
"कितीही मोठी किंमत मोजावी लागली तरी..."; मनु्स्मृतीबाबत बोलताना अजित पवारांचे मोठं विधान
9
Gold-Silver Price Today : सोन्या-चांदीच्या दरानं वाढवली सराफा बाजारातली गरमी, घसरणीनंतर पुन्हा वाढले दर
10
भारतात पहिल्यांदाच आले सर्वात मोठे जहाज; चार फुटबॉलचे मैदान होतील एवढी आहे जागा
11
SSC Result 2024: दहावी निकालात लातूर पॅटर्नचा दबदबा; १२३ विद्यार्थ्यांना १०० टक्के गुण
12
"स्वाती मालीवाल जबरदस्तीने मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानात घुसल्या", विभव कुमारांच्या वकिलाचा न्यायालयात युक्तिवाद! 
13
Anurag Thakur : "काँग्रेसचं पाकिस्तानवर प्रेम, भारताच्या भागाला PoK बनवलं"; अनुराग ठाकूर कडाडले
14
एक ठिणगी आणि..., राजकोट टीआरपी गेम झोनमध्ये कशी भडकली आग? CCTV फुटेज आलं समोर
15
Pune Porsche Accident News : 'बाळा'च्या रक्ताचे नमुने कचऱ्यात फेकले; दुसऱ्याचे लॅबला पाठवले, डॉक्टरांचे बिंग फुटले
16
Maharashtra SSC 10th Result 2024 : दहावीचा निकाल ९५.८१ टक्के; 'कोकण-कन्या' अव्वल, १८७ विद्यार्थ्यांना 'शत-प्रतिशत'
17
“रवींद्र धंगेकरांनी माफी मागावी, नाहीतर मानहानीचा दावा करणार”: हसन मुश्रीफ, पण प्रकरण काय?
18
मनसे कार्यकर्ते थेट राज ठाकरेंनाच व्हिडिओ पाठवणार; मनातील भावना व्यक्त करणार
19
शरद पवारांचे २ युवा शिलेदार अजित पवारांकडे; 'तुतारी' खाली ठेवत हाती 'घड्याळ' बांधणार
20
Dhadak 2: एक था राजा, एक थी रानी...! 'धडक 2' ची घोषणा, ही फ्रेश जोडी मुख्य भूमिकेत दिसणार

सनी देओल पंजाबमधून भाजपाच्या तिकीटावर लढणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2019 3:53 AM

भाजप अध्यक्ष अमित शहा व चित्रपट अभिनेते सनी देओल यांच्या भेटीचे एक छायाचित्र सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून, त्यामुळे सनी-भाजप संबंधांची पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.

- नितीन अग्रवाल नवी दिल्ली : भाजप अध्यक्ष अमित शहा व चित्रपट अभिनेते सनी देओल यांच्या भेटीचे एक छायाचित्र सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून, त्यामुळे सनी-भाजप संबंधांची पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. त्यांना पंजाबमधून भाजपतर्फे लोकसभेची उमेदवारी दिली जाऊ शकते, अशीही चर्चा या निमित्ताने सुरू झाली आहे.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सनी देओल यांची राष्ट्रवादी व देशभक्ताची प्रतिमा पाहून भाजप त्यांना पंजाबमधून निवडणुकीच्या मैदानात उतरवू शकतो. तथापि, त्यांच्याकडून निवडणूक लढवण्याबाबत फारशी उत्सुकता दाखवलेली नाही; परंतु भाजप अध्यक्ष अमित शहा व सनी यांची नव्याने झालेली भेट पाहता या चर्चेला अद्याप पूर्णविराम मिळालेला नाही, असे दिसते.

सनी देओल यांचे वडील व ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र हे भाजपशी जोडले गेलेले आहेत. २००४ मध्ये भाजपच्या तिकिटावर त्यांनी राजस्थानच्या बिकानेरमधून निवडणूक लढवली होती. त्यांनी खासदार म्हणून निवडून गेल्यानंतर स्वत:ला राजकारणापासून वेगळे केले होते; परंतु ते मागील काही दिवसांपासून मथुरेत पत्नी हेमामालिनी यांच्यासाठी जो निवडणूक प्रचार करीत आहेत, ते पाहता राजकारणाबाबत त्यांचे मन बदलत आहे की काय, अशी चर्चा सुरू झाली आहे. त्याचाच परिणाम त्यांचे पुत्र सनी देओलवरही होण्याची शक्यता आहे.
जाबमधील एका भाजप नेत्याने सांगितले की, सनी देओल यांनी पंजाबमधून निवडणूक लढवल्यास भाजप मजबूत होईल. सनी देओल यांच्या देशभक्ताच्या प्रतिमेमुळे निवडणूक जिंकण्यास त्यांना चांगलीच मदत होणार आहे. 2017 मध्ये पंजाबमध्ये विधानसभा निवडणूक झाली. त्यात अकाली दलासह लढणाऱ्या भाजपाला पराभव पत्करावा लागला होता. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकPunjab Lok Sabha Election 2019पंजाब लोकसभा निवडणूक 2019Amit Shahअमित शहाSunny Deolसनी देओलBJPभाजपा