Join us  

एक था राजा, एक थी रानी...! 'धडक 2' ची घोषणा, ही फ्रेश जोडी मुख्य भूमिकेत दिसणार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2024 1:24 PM

'सैराट 2' आधीच करण जोहरने केली 'धडक 2' ची घोषणा

'धडक' हा 2018 साली आलेला सिनेमा शशांक खेतानने दिग्दर्शित केला होता. यामधून जान्हवी कपूर आणि ईशान खट्टरने पदार्पण केले होते. सिनेमाला जेमतेमच प्रतिसाद मिळाला होता. त्यातच आता करण जोहरने 6 वर्षांनी या सिनेमाच्या सीक्वेलची घोषणा केली आहे. विशेष म्हणजे 'धडक 2' (Dhadak 2)  मध्ये फ्रेश जोडी बघायला मिळणार आहे. तसंच शशांक खेतान यांच्या जागी नवीन दिग्दर्शक असणार आहे. कोण आहे धडक २ मध्ये वाचा. 

बॉलिवूड निर्माता करण जोहरच्या आगामी सिनेमाची घोषणा झाली आहे. 'धडक 2' सिनेमा यावर्षी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. विशेष म्हणजे यामध्ये सिद्धांत चतुर्वेदी आणि तृप्ती डिमरी मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. ईशान खट्टर आणि जान्हवी कपूरला त्यांनी रिप्लेस केलंय. सिनेमाची घोषणा करत मेकर्सने व्हिडिओ शेअर केला आहे. शाजिया इक्बाल सिनेमाच्या दिग्दर्शिका आहेत. एक राजा, एक रानी, एक कहानी - २ धडकने! असं कॅप्शन देण्यात आलं आहे.

एकमेकांवर प्रेम करणाऱ्या या राजा राणीमध्ये जात आडवी येते आणि कहाणी संपते अशी सिनेमाची लाईन आहे. सिद्धांत आणि तृप्ती यांचा फोटो शेअर करत सिनेमाची घोषणा करण्यात आली आहे. याचवर्षी २२ नोव्हेंबरला सिनेमा रिलीज होणार आहे. दरम्यान गेल्या वर्षी करण जोहरने सोशल मीडियावरुन 'धडक 2' च्या अफवा असल्याचं म्हटलं होतं. मात्र आता त्याचंच म्हणणं खोटं ठरलं आहे. 

'धडक' हा सिनेमा मराठीतील सुपरहिट 'सैराट'चा हिंदी रिमेक होता. नागराज मंजुळेंच्या सैराटने रेकॉर्डब्रेक कामगिरी केली होती. आता सैराट 2 च्या आधीच 'धडक 2' ची घोषणा झाली आहे.

टॅग्स :धडक चित्रपटकरण जोहरसिद्धांत चतुर्वेदीतृप्ती डिमरीसिनेमा