शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
3
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
4
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
5
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
6
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
7
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
8
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
9
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
10
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
11
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
12
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
13
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
14
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
15
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
16
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
17
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
18
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
19
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
20
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश

रस्त्यावर शांतता, पण सोशल मीडियात घमासान सुरूच; ‘ते’ शिवसैनिक पोहोचले ‘वर्षा’वर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2021 07:52 IST

राड्यात आघाडीवर असलेल्या शिवसैनिकांनी वर्षा निवासस्थानी  गुरुवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. राजनंदा चॅरिटेबल ट्रस्टला मुख्यमंत्री सहाय्यता निधीस एक लाखांचा चेक द्यायचा होता, त्यासाठी ही भेट होती, असा दावा स्थानिक आमदार सदा सरवणकर यांनी  केला.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राम मंदिराच्या प्रश्नावर शिवसेना भवन परिसरात भाजप,  शिवसैनिकांत झालेल्या राड्यानंतर गुरुवारी दोन्ही पक्ष कार्यालयांवर तणावपूर्ण शांतता होती. पोलिसांनी दोन्ही कार्यालयांसह संवेदनशील ठिकाणांवरील बंदोबस्त वाढविला. रस्त्यावर शांतता असली तरी सोशल मीडियात मात्र दोन्ही बाजूने घमासान सुरू आहे. 

मुंबईतील शिवसेना नेत्यांनी या घटनेच्या निषेधाचे व्हिडिओ प्रसारित केले. भाजपच्या शिवसेना भवनवर मोर्चा आणण्याच्या भूमिकेवर आक्षेप घेतानाच पुन्हा असे प्रकार घडल्यास तीव्र प्रतिक्रियेचा इशारा दिला, तर बुधवारी जशास तसे उत्तर देण्याची भाषा करणारे भाजप नेते काहीसे बॅकफूटवर गेलेले पाहायला मिळाले.सेना पदाधिकाऱ्यांच्या आक्रमक भाषेला उत्तर देताना गुरुवारी भाजपने कायदा सुव्यवस्था, विकासाचा मुद्दा मांडला. राडेबाजी शिवसेनेची संस्कृती आहे. आता महिलांवरील हल्ल्याची भर पडली. तुम्ही राड्याची तारीख सांगा, आम्ही विकासकामांच्या तारखा सांगतो, अशी भूमिका भाजपच्या मुंबई महिला अध्यक्षा, स्थानिक नगरसेविका शीतल गंभीर यांनी मांडली.

राड्यात आघाडीवर असलेल्या शिवसैनिकांनी वर्षा निवासस्थानी  गुरुवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. राजनंदा चॅरिटेबल ट्रस्टला मुख्यमंत्री सहाय्यता निधीस एक लाखांचा चेक द्यायचा होता, त्यासाठी ही भेट होती, असा दावा स्थानिक आमदार सदा सरवणकर यांनी  केला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी बुधवारच्या घटनेची चौकशी केली. आपण शांतता राखायला हवी, असे ते म्हणाले. यापेक्षा जास्त भाष्य या विषयावर त्यांनी केले नसल्याचे सरवणकर म्हणाले.

पाेलीस तपासणार सीसीटीव्ही फूटेज राड्याप्रकरणी गुन्हे दाखल झाले आहेत. आता, सीसीटीव्ही फूटेज तपासून या प्रकरणात कोण कोण सहभागी आहेत, हे पाहून त्यानुसार कारवाई केली जाईल, अशी माहिती पोलीस उपायुक्त प्रणय अशोक यांनी दिली.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाBJPभाजपा