शहरं
Join us  
Trending Stories
1
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
2
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
3
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, वाघा बॉर्डरवर रांगा...
4
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
5
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
6
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
7
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
8
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
9
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
10
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
11
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
12
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
13
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
14
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
15
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
16
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
17
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
18
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
19
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
20
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?

“तुम्ही कोल्हापूर सोडून कोथरुडला आलात, तेव्हा काही बोललो का? आम्ही आमचं बघू”

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2021 11:08 IST

चंद्रकांत पाटील यांनी दिलेल्या एका खुल्या आव्हानाला शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

नवी दिल्ली: गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील राजकारण अनेकविध कारणांमुळे तापल्याचे पाहायला मिळत आहे. तसेच आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीही जोरदार झडत असल्याचे पाहायला मिळत आहे. विविध मुद्द्यांवरून एकमेकांवर टीकास्त्र सोडण्याची एकही संधी सत्ताधारी ठाकरे सरकार आणि विरोधक सोडत नसल्याचे दिसत आहे. यातच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतल्यापासून भाजप-मनसेच्या युतीची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. यावेळी चंद्रकांत पाटील यांनी दिलेल्या एका खुल्या आव्हानाला शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिले असून, आम्ही आमचं बघू, असे म्हटले आहे. (shiv sena sanjay raut replied bjp chandrakant patil over bmc election criticism)

“तुम्ही राजीनामा द्यावा, अशीही जनतेची मागणी”; PM मोदींना राष्ट्रवादीचा टोला

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची मुंबईत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भेट घेतली. यानंतर माध्यमांशी बोलताना, जर मुंबईत शिवसेनेची ताकद असेल, तर संजय राऊत यांनी येणाऱ्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत सेफ जागेवरुन निवडणूक लढवून दाखवावी. संजय राऊतांनी निवडणुकीत उतरुन आपले दंडही चेक करावेत आणि क्षमताही पाहावी, असे खुले चॅलेंज चंद्रकांत पाटील यांनी दिले. यावर संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिले आहे. 

“मेजर ध्यानचंद महान खेळाडू, हॉकीचे जादूगार होते, पण...”; संजय राऊतांनी दिली प्रतिक्रिया

आम्ही तेव्हा काही बोललो का?

मी काय करावं हा प्रश्न येतो कुठे? त्यांनी त्यांचं पहावं, माझ्याकडून त्रास होत आहे मान्य आहे. पण अशाही परिस्थितीत माझ्या पक्षाने मला जबाबदारी दिली, तिकडे मी असणारच  आणि ती नेटाने पार पाडणार. तुम्ही विधानसभा निवडणुकीला कोल्हापूर सोडून कोथरुडला आले, आम्ही तुम्हाला काही बोललो का? आम्ही आमचं बघू, तुम्ही तुमच बघा, असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे. यापूर्वी, भाजप आणि मनसेने एकत्र येऊन लढून दाखवावे, असे संजय राऊत यांनी राज ठाकरे-चंद्रकांत पाटील यांच्या भेटीसंदर्भात म्हटले होते. त्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी संजय राऊत यांच्यावर पलटवार करत खुले आव्हान दिल्याचे बोलले जात आहे. 

अरे देवा! Vi मुळे ‘या’ तीन बँकांची चिंता वाढली; कंपनी बुडल्यास बसणार मोठा फटका

दरम्यान, राज यांच्यासोबत राजकीय मुद्द्यांवर चर्चा झाली. राज्याचे नेते म्हणून तुम्ही मोठ्या भूमिकेत यायला हवे, असे त्यांना सांगितले. यावेळी युतीबद्दल चर्चा झाली नाही. तसा कोणताही प्रस्ताव नाही. राज यांच्या मनात परप्रांतियांच्या मनात कोणतीही कटुता नाही. त्यांचे मन वळवण्याचा प्रयत्न केला. एकत्र येण्याचा प्रस्ताव नाही. त्यासाठी वेळ यावी लागते, असे चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले. नाशिकमध्ये काही दिवसांपूर्वी आमची अचानक भेट झाली होती. त्यावेळीच मुंबईत भेटायचे ठरले होते, असे पाटील म्हणाले. राज यांच्या परप्रांतीयांबद्दलच्या भूमिकेबद्दल माझ्या मनात काही प्रश्न होते. ते मी नाशिकच्या भेटीत बोलून दाखवले. त्यानंतर राज यांच्या परप्रांतीयांबद्दलच्या भाषणाची एक क्लिप मी पाहिली. ती उत्तर प्रदेश, बिहारमध्ये व्हायरल झाली होती. त्यातून माझ्या काही शंका दूर झाल्या. तर इतर काही शंकांबद्दल आमची चर्चा झाली, असे पाटील यांनी सांगितले.  

टॅग्स :Politicsराजकारणchandrakant patilचंद्रकांत पाटीलBJPभाजपाShiv SenaशिवसेनाSanjay Rautसंजय राऊतMNSमनसेRaj Thackerayराज ठाकरेMumbaiमुंबई