शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

“मेजर ध्यानचंद महान खेळाडू, हॉकीचे जादूगार होते, पण...”; संजय राऊतांनी दिली प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2021 16:30 IST

काँग्रेस आक्रमक होत केंद्रातील मोदी सरकार, भाजप आणि RSS वर निशाणा साधत असताना संजय राऊत यांनी सूचक प्रतिक्रिया दिली आहे.

नवी दिल्ली: टोकियो ऑलिम्पिकच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशभरात उत्साहाचे वातावरण आहे. यातच केंद्र सरकारने खेलरत्न पुरस्कारचे नाव बदलण्याचे ठरवले आहे. राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे नाव बदलून मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार असे करण्याची मोठी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली आहे. यावरून आता आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली असून, शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मेजर ध्यानचंद हे महान खेळाडू आहेत. ते हॉकीचे जादूगार होते, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. (shiv sena sanjay raut reacted over centre govt rajiv gandhi khel ratna award renamed)

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी याबाबत ट्विट करून माहिती दिली आहे. पंतप्रधान म्हणाले की, मला संपूर्ण भारतातील नागरिकांकडून खेलरत्न पुरस्काराचे नाव मेजर ध्यानचंद ठेवण्याबाबत आग्रह केला जात होता. लोकांच्या या भावनेचा सन्मान राखत खेलरत्न पुरस्काराचे नाव मेजर ध्यानचंद पुरस्कारने यापुढे ओळखले जाईल, असे त्यांनी सांगितले. यानंतर पुरस्काराच्या नामांतरासंदर्भात काँग्रेसने आक्रमक होत केंद्रातील मोदी सरकार, भाजप आणि RSS वर निशाणा साधला आहे. या एकूण प्रकरणावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. 

“अहमदाबाद स्टेडिअमला दिलेले तुमचे नाव हटवावे, जनतेची मोठी मागणी”; PM मोदींना टोला

मेजर ध्यानचंद महान खेळाडू, हॉकीचे जादूगार होते

मेजर ध्यानचंद हे महान खेळाडू आहेत. ते हॉकीचे जादूगार होते. सरकारने त्यांचे नाव दिले आहे. पण वारंवार एखाद्या योजनेची नावे बदलणे आणि त्यातून काय मिळवायचे आहे हे सरकारला माहिती आहे. ध्यानचंद यांच्या नावाला विरोध करण्याचा प्रश्नच येत नाही. त्याच्यावर टीका टिपणी होऊ नये, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. ते एका वृत्तवाहिनीशी बोलत होते. 

केवळ गांधी द्वेषातूनच ‘राजीव गांधी खेलरत्न’ पुरस्काराच्या नावात बदल; काँग्रेसची टीका

काँग्रेसची आक्रमक भूमिका

पुरस्काराच्या नामांतरावरून काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी आक्रमक पवित्रा घेत केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे. प्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, जनतेची अशी मोठी मागणी आहे की, अहमदाबादच्या नव्या स्टेडिअमला दिलेले तुमचे नाव हटवून एखाद्या खेळाडूचे नाव तिथे दिले जावे. खेळाडूंच्या सन्मानामध्ये देखील राजकीय डावपेच का?, अशी विचारणा करत हा निर्णय चुकीचा असून माझा त्याला विरोध आहे, असे ट्विट काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी केले आहे. 

“संजय राऊत यांची भेट नेहमीच पर्वणी असते”; अमोल कोल्हेंचे खास ट्विट

दरम्यान, राजीव गांधी यांच्या नावालाच विरोध असेल तर मग नरेंद्र मोदी यांचे क्रीडा क्षेत्रातील योगदान तरी काय, अशी विचारणा करत केवळ गांधी द्वेषातून नाव बदलणे हे हीन पातळीच्या राजकारणाचे दर्शन घडवते. केंद्रातील भाजप सरकार व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला नेहरु-गांधी नावाचा प्रचंड तिरस्कार आहे. या तिरस्काराच्या मानसिकतेतूनच त्यांच्या नावाने असलेल्या योजना, प्रकल्पाची नावे बदलण्याचे काम मोदी सरकार करत आहे. देशातील सर्वोच्च क्रीडा पुरस्कार असलेल्या ‘राजीव गांधी खेलरत्न’ पुरस्काराचे नाव बदलण्याची कृतीसुद्धा त्याच गांधी नावाच्या द्वेषातूनच आलेली आहे. मोदी सरकारच्या या कोत्या मनोवृत्तीचा काँग्रेस पक्ष तीव्र निषेध करत आहे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे. 

टॅग्स :PoliticsराजकारणShiv SenaशिवसेनाSanjay Rautसंजय राऊतBJPभाजपाCentral Governmentकेंद्र सरकारNarendra Modiनरेंद्र मोदीNarendra Modi Stadiumनरेंद्र मोदी स्टेडियम