मुंबई: अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणावर सातत्यानं बोलणाऱ्या, बॉलिवूडमधील अनेक प्रस्थापितांना लक्ष्य करणाऱ्या अभिनेत्री कंगना राणौतनं आता राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. शिवसेना आणि कंगना यांच्यात गेल्या काही दिवसांपासून वाकयुद्ध सुरू आहे. मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केल्यानंतर शिवसेना नेते आक्रमक झाले आहेत. कंगनाला मुंबईत राहण्याचा अधिकार नसल्याचं शिवसेनेनं म्हटलं आहे. तर मुंबईत येणारच. हिंमत असेल तर अडवून दाखवा, असं आव्हान कंगनानं दिलं आहे. शिवसेना विरुद्घ कंगना वादावर आता मनसेनं भाष्य केलं आहे.अमृता फडणवीस यांच्याकडून कंगना राणौतची पाठराखण, म्हणाल्या...शिवसेना आणि कंगना वादामागे वेगळेचं कारण असल्याचं मनसेचे नेते संदीप देशपांडेंनी सांगितलं आहे. सध्या राज्यात विविध प्रश्न आहेत. लोकांचे हाल होत आहेत. त्यापासून लोकांचं लक्ष विचलित करण्यासाठी शिवसेना नेते कंगनाला इतकं महत्त्व देत आहेत, असा दावा त्यांनी केला. 'सध्या मंदिरात प्रवेशाला बंदी आहे. लाखो लोक बेरोजगार झाले आहेत. आरोग्य व्यवस्थेचा बोऱ्या वाजल्यानं हजारो लोकांचे बळी गेले आहेत. मुख्यमंत्री घरात बसल्यानं जनतेत नाराजी आहे. रेल्वेसेवा सुरू नसल्यानं लोकांचे प्रचंड हाल सुरू आहेत,' अशा शब्दांत देशपांडेंनी राज्यातील समस्यांची यादीच वाचून दाखवली.
VIDEO: शिवसेना-कंगना वादामागे 'वेगळं'च कारण; मनसेनं सांगितलं राजकारण
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2020 10:21 IST