मुंबई माझी कर्मभूमी, तिने मला यशोदामाईसारखं सांभाळलं; विवादानंतर कंगनाला उपरती

By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2020 05:47 AM2020-09-05T05:47:23+5:302020-09-05T05:47:41+5:30

सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणावरून सध्या आक्रमकपणे बोलत असलेल्या कंगना शिवसेना आणि संजय राऊत यांच्यात शाब्दिक चकमकी होत असून, त्याचदरम्यान कंगनाने मुंबईची तुलना पीओकेशी केल्याने वादाला तोंड फुटले होते.

Mumbai is my karma bhoomi, she treated me like Yashodamai; After the controversy, Kangana Ranaut was overwhelmed | मुंबई माझी कर्मभूमी, तिने मला यशोदामाईसारखं सांभाळलं; विवादानंतर कंगनाला उपरती

मुंबई माझी कर्मभूमी, तिने मला यशोदामाईसारखं सांभाळलं; विवादानंतर कंगनाला उपरती

Next

मुंबई - अभिनेती कंगना राणौत हिने मुंबईूबाबत केलेल्या विधानामुळे सध्या मुंबई आणि राज्यातील वातावरण ढवळून निघालेले आहे. विविध क्षेत्रातून कंगनाच्या या विधानावर जोरदार आक्षेप घेऊन टीका करण्यात येत आहे. दरम्यान, काल मुंबईची तुलना पीओकेशी करणाऱ्या कंगना राणौतला रात्री उपरती झाली असून, तिने मुंबई ही आपली कर्मभूमी असून, मुंबईने मला यशोदामाईसारखे सांभाळले आहे, असे विधान केले आहे.

सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणावरून सध्या आक्रमकपणे बोलत असलेल्या कंगना शिवसेना आणि संजय राऊत यांच्यात शाब्दिक चकमकी होत असून, त्याचदरम्यान कंगनाने मुंबईची तुलना पीओकेशी केल्याने वादाला तोंड फुटले होते. दरम्यान, चहुबाजूंनी टीकेची झोड उठल्यानंतर कंगनाने मुंबईबाबतची आपली भावना ट्विट करून व्यक्त केली आहे. त्यात ती म्हणते की, महाराष्टामधील माझ्या मित्रांचे आभार माणण्यासाठी माझ्याकडे शब्द अपुरे आहेत. त्यांना माझ्या बोलण्याचा रोख माहिती आहे. तसेच माझी कर्मभूमी असलेल्या मुंबईवर असलेल्या माझ्या प्रेमाचा पुरावा देण्याचीही मला गरज वाटत नाही. मुंबईने मला नेहमीच यशोदामाईप्रमाणे सांभाळले आहे. 



काय म्हणाली होती कंगना?
संजय राऊत यांनी आपल्याला धमकी दिल्याचा दावादेखील तिनं केला आहे. 'मुंबई पोलिसांची भीती वाटत असल्यास पुन्हा शहरात येऊ नकोस, असं म्हणत मला राऊत यांनी धमकी दिली. आधी झळकलेले आझादीचे फलक आणि आता मिळत असलेल्या उघड धमक्या यामुळे मुंबई पाकिस्तानव्याप्त काश्मीरसारखी का वाटू लागली आहे?,' असा सवाल कंगनानं ट्विटच्या माध्यमातून उपस्थित केला होता.
 
शुक्रवारी कशावरून सुरू झाला वाद?

"मला अनेक जण मुंबईला परत न येण्याची धमकी देत आहेत, म्हणून मी ठरवले आहे की, येत्या आठवड्यात 9 सप्टेंबरला मुंबईला जाण्याचा निर्णय घेतला आहे. मी मुंबई विमानतळावर किती वाजता उतरणार, याची वेळ लवकरच सांगेन. कोणाच्या बापात हिंमत असेल तर थांबवा", असा एल्गार कंगनाने केला. भाजपा नेते परवेश साहिब सिंह यांच्या ट्विटला रिट्विट करत कंगनाने असे म्हटले आहे. "कुणाच्या वडिलांची जहागीर आहे का मुंबई? महाराष्ट्रात काय होत आहे उद्धव ठाकरे?" असा सवाल परवेश साहिब सिंह यांनी केला होता.

Web Title: Mumbai is my karma bhoomi, she treated me like Yashodamai; After the controversy, Kangana Ranaut was overwhelmed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.