शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार हे महाराष्ट्रातील कट कारस्थानाचा कारखाना, त्यांच्यावर..."; गोपीचंद पडळकरांची बोचरी टीका
2
दिल्ली-मुंबई हल्ल्यात मसूद अजहरचा हात; जैश कमांडर इलियासचा आणखी एक कबुलीजबाब
3
साखर कारखान्याच्या टँकरमध्ये सापडले दोन तरुणांचे मृतदेह, गार्ड आणि अधिकारी गायब  
4
मंत्र्यांच्या बंगल्यांच्या दुरुस्तीसाठी कोटींची उधळपट्टी? कंत्राटदाराने २१ टक्के 'बिलो'ने काम घेतल्याने प्रकार उघडकीस
5
इनरवेअर बनवणाऱ्या शेअरचा जलवा! १०० स्टॉक्समधून एकाच महिन्यात २ लाख रुपयांची कमाई
6
राज्यात ३९४ ठिकाणी 'नमो उद्यान' विकसित करणार; नरेंद्र मोदींच्या वाढदिवशी एकनाथ शिंदे यांची घोषणा
7
"आमचे प्रेरणास्रोत..."; पंतप्रधान नरेंद्र मोदींना इटलीच्या जॉर्जिया मेलोनी यांच्याकडून खास शुभेच्छा
8
अशक्यही होईल शक्य फक्त जिद्द हवी; १५ वर्षीय दृष्टीहीन करुणाने मिळवलं भारतीय संघात स्थान
9
५% व्याजावर ३ लाख रुपयांपर्यंतचं लोन; 'या' लोकांसाठी आहे मोदी सरकारचं मोठं गिफ्ट
10
माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग फेकला, ठाकरे गट आक्रमक, दादरमध्ये तणाव
11
कंपन्या जीएसटी रिकव्हरीच्या मुडमध्ये! २२ सप्टेंबरआधीच शाम्पू, साबण २० टक्के डिस्काऊंटवर विकू लागल्या... 
12
"महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांना  हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत द्या’’, काँग्रेसची मागणी   
13
पत्नीचं अफेअर, पतीला लागली कुणकुण; जळफळाट झाला अन् खुनी खेळ रंगला!
14
सॉवरेन गोल्ड बॉंड गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! ६ वर्षांत १८३% परतावा, RBI ने जाहीर केली मुदतीपूर्वीची किंमत
15
WiFi कनेक्शन बंद केल्याने पोटच्या लेकानेच केली आईची हत्या; वडील म्हणाले, "मुलाला फाशी द्या"
16
"अमेरिका, युरोपमधून इस्लाम संपुष्टात आणणार’’, ट्रम्प समर्थक महिला नेत्याचं वादग्रस्त विधान  
17
आता जेवढा जीएसटी कमी झालाय ना, तेवढ्याला १९८६ मध्ये बुलेट मिळत होती...
18
बोल्ड लूकसह स्मार्ट फीचर्स! होन्डाची पहिली इलेक्ट्रिक बाईक लॉन्च, एका चार्जवर १३० किमी धावणार
19
लग्नाच्या अवघ्या २०व्या दिवशी नवरी झाली फरार; नवऱ्याला म्हणाली लवकर जाऊन येते अन्...
20
पंतप्रधान नरेंद्र मोदींवरील बायोपिकची घोषणा, हा अभिनेता साकारणार भूमिका, पोस्टर रिलीज

राऊत इज बॅक! ...तोपर्यंत तुम्ही काहीही करू शकत नाही; राऊतांचा फडणवीसांवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2021 21:49 IST

shiv sena mp sanjay raut hits back at bjp leader devendra fadnavis: संजय राऊतांचा पुन्हा आक्रमक अंदाजात; दोन दिवसांत सूर बदलला

नवी दिल्ली: गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर मुंबई पोलीस दलाचे माजी आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपांमुळे एकच खळबळ उडाली आहे. गृहमंत्री देशमुखांनी सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझेंना दर महिन्याला १०० कोटी गोळा करण्याचं टार्गेट दिलं होतं, असा गंभीर आरोप परमबीर सिंग यांनी केला. या संदर्भात त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना एक पत्र लिहिलं. या पत्राचे पडसाद थेट संसदेपर्यंत उमटले. त्यातच आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत केंद्रीय गृहसचिवांची भेट घेऊन पोलीस बदल्यांच्या रॅकेटचे पुरावे दिले. यावरून शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी फडणवीसांना लक्ष्य केलं आहे.अहो आश्चर्यम्... देवेंद्र फडणवीस अन् संजय राऊत यांचा 'ठाकरे सरकार'ला एकसारखाच सल्लातुम्ही कागदपत्रं घेऊन फिरत राहा. मात्र जोपर्यंत आमच्याकडे बहुमत आहे, तोपर्यंत तुम्ही आमच्या केसालादेखील धक्का लावू शकत नाही, अशा शब्दांत राऊत यांनी फडणवीसांवर निशाणा साधला. फडणवीस यांनी दिल्लीत गृह सचिवांची भेट घेतल्याबद्दल राऊत यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांना यातून आनंद मिळत असल्यास त्यांना आनंद घेऊ द्या. काही जण कागदपत्रं घेऊन येतात. काही जण फाईल आणतात. ठाकरे सरकारला काम करू द्या. हे सर्व करून सरकार कोसळणार नाही, असं राऊत पुढे म्हणाले."महाविकास आघाडी ही शिवसेनेची राजकीय मजबुरी", संजय राऊतांनी दिली कबुली ते जे कागद फडफडवताहेत त्या कागदपत्रांमध्ये काहीच नाही. गृह सचिवांना त्याचा अभ्यास करायचा असल्यास करू द्या. आम्हाला कोणतीही अडचण नाही, असा टोला त्यांनी लगावला. 'लोकशाहीत अनेकांना दुसऱ्यांदा मुख्यमंत्री व्हावंसं वाटतं. कोणाला पंतप्रधान व्हावंसं वाटतं. कोणाला गृहमंत्री व्हायचं असतं तर कोणाला राष्ट्रपती,' असा चिमटा राऊत यांनी काढला. विशेष म्हणजे राऊत यांनी गेल्या दिवसांपासून आक्रमक पवित्रा घेतला नव्हता. रविवारी तर त्यांनी थेट सरकारमधल्या सर्व घटक पक्षांना आत्मचिंतनाचा सल्ला दिला होता.आज महाराष्ट्रात आमचं सरकार आहे. आमच्याकडे बहुमत आहे. बहुमत असलेल्या सरकारला दिल्लीत येऊन पाडलं जाऊ शकत नाही. तुम्ही गृहमंत्र्यांकडे जा किंवा पंतप्रधानांकडे जा. जोपर्यंत तुमच्याकडे बहुमत नाही, तोपर्यंत तुम्ही आमच्या सरकारच्या केसालाही धक्का लावू शकत नाही. तुम्ही सध्या ज्या गोष्टी करत आहात, त्या घटनाविरोधी आहेत, अशा शब्दांत राऊतांनी फडणवीसांवर निशाणा साधला.राऊत इज बॅक! ...तोपर्यंत तुम्ही काहीही करू शकत नाही; राऊतांचा फडणवीसांवर हल्लाबोल

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसSanjay Rautसंजय राऊतBJPभाजपाAnil Deshmukhअनिल देशमुखParam Bir Singhपरम बीर सिंग