शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारने पहिल्याच दिवशी डाव टाकला; मनोज जरांगे बच्चू कडूंच्या शेतकरी लढ्याच्या आंदोलनात सहभागी
2
पोलिसांचे पोस्टमार्टेम कारनामे फलटणमध्येच नाहीत, शामलीमध्ये तर...; घरात चोरी झाली अन् डॉक्टर आंदोलनालाच बसले
3
बॉलिंग मशीनने घेतला युवा क्रिकेटपटूचा बळी, सराव करताना चेंडू डोक्याला लागला आणि...
4
डिजिटल इनव्हेस्टमेंट प्लॅटफॉर्म Groww चा आयपीओ येणार; कधीपासून आणि किती करावी लागणार गुंतवणूक?
5
आधी भर रस्त्यात कोयता नाचवला, गाडी चालकांना धमकावलं, आता पोलिसांनी त्याच ठिकाणी गुडघ्यावर बसवलं; व्हिडीओ व्हायरल
6
देवळात गेल्यावर तुम्ही योग्य पद्धतीने देवाचे दर्शन घेता का? १० महत्त्वाच्या गोष्टी पाळाच!
7
बिहारच्या राजकारणात Gen Z उमेदवारांची चर्चा; मैथिली ठाकूरसह कोण-कोण मैदानात? पाहा...
8
'बारामतीला जायचंय; एक रात्र राहू द्या..', पीडितेची हॉटेलमधील 'ती' रात्र; पीडितेचा हॉटेलमधील घटनाक्रम..
9
Video - चमत्कार! ३ वर्षीय मुलीच्या अंगावरून गेली कार, पुढे जे झालं ते पाहून सर्वच हैराण
10
२३ वर्षांच्या मुलाला संपवलं अन् हायवेवर फेकला मृतदेह; तपासात आईच निघाली आरोपी! नेमकं काय झालं?
11
श्रेयस अय्यरची दुखापत ठरली टीम इंडियासाठी मोठा धक्का, इतके महिने तो राहणार क्रिकेटपासून दूर
12
शायनी आहुजा कुठे गायब झाला? व्हायरल होतोय अभिनेत्याचा फोटो; ओळखणंही झालं कठीण
13
रॉबर्ट कियोसाकी यांनी सांगितला श्रीमंत बनण्याचा मार्ग; म्हणाले, "आपल्या भावनांवर नियंत्रण...."
14
"दाऊद इब्राहिम दहशतवादी नाही...", ममता कुलकर्णीचं अंडरवर्ल्ड डॉनवर वादग्रस्त विधान
15
सोन्याच्या वाढलेल्या दरांवर ग्रामपंचायतीने तोडगा काढला! महिलांना केवळ तीनच दागिन्यांची परवानगी, अन्यथा...
16
लाडकी बहीण योजना: २६ लाख अपात्र महिला, ४ हजार कोटींची खैरात; सरकारी तिजोरीवर मोठा आर्थिक भार
17
ऑनर किंलिंग प्रकरणात २० वर्षांची शिक्षा, तुरुंगातून सुटला, आता दोषी आरोपीचा अपघाती मृत्यू
18
स्वप्न साकार! नोकरी नाकारली अन् शेती केली; आता कमावते १ कोटी, ३० जणांना दिला रोजगार
19
तुमच्या पगारात किती महागडे घर खरेदी करावे? तज्ज्ञांनी सांगितले 'हे' ४ महत्त्वाचे नियम; EMI किती असावा?
20
२५ नोव्हेंबरला राम मंदिरात दर्शन बंद राहणार, PM मोदी अयोध्येला जाणार; ८ हजार निमंत्रणे गेली

शिवसेनेचं ठरलं! कॅबिनेट मंत्रिपदी अरविंद सावंत शपथ घेणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2019 21:46 IST

दुसऱ्या टप्प्यात संजय राऊत, गजानन कीर्तिकर, भावना गवळी, विनायक राऊत, प्रताप जाधव यांची नावं आघाडीवर

- मनोहर कुंभेजकरमुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नव्या केंद्रीय मंत्रिमंडळाचा शपथविधी उद्या दिल्लीतील राष्ट्रपती भवनात सायंकाळी 7 वाजता संपन्न होणार आहे. काल सुमारे 5 तास आणि आज सुमारे 4 तास मोदी व भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्यात केंद्रातील मंत्रिमंडळाबाबत चर्चा झाली. उद्या पंतप्रधानांसह महत्वाच्या कॅबिनेट मंत्र्यांचा शपथविधी होईल. यामध्ये दक्षिण मुंबईचे खासदार आणि शिवसेना उपनेते अरविंद सावंत यांच्या नावाचा समावेश आहे.

अरविंद सावंत यांनी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष व माजी केंद्रीय राज्यमंत्री मिलिंद देवरा यांना दक्षिण मुंबई मतदारसंघात पराभूत केलं. गेल्या निवडणुकीतही त्यांनी देवरांचा पराभव केला होता. अरविंद सावंत यांनी गेल्या टर्ममध्ये एक अभासू खासदार म्हणून ठसा उमटवला होता. त्यांची संसदेतील भाषणेदेखील गाजली होती. विशेष म्हणजे अरविंद सावंत हे मातोश्रीच्या जवळचे समजले जातात.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दोन कॅबिनेट, दोन राज्यमंत्री, एक उपसभापती व एक राज्यपालपद अशी मागणी मोदी व शाह यांच्याकडे केल्याचे समजते. जूनच्या पहिल्या आठवड्यात होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेच्या वाटेला अजून एक कॅबिनेट मंत्रीपद आल्यास शिवसेनेतील जेष्ठ नेते व उत्तर पश्चिम लोकसभा मतदार संघातील खासदार गजानन कीर्तिकर यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. शिवसेनेच्या वाटेला येणाऱ्या दोन राज्यमंत्री पदासाठी शिवसेनेतील एकमेव महिला खासदार असलेल्या यवतमाळच्या भावना गवळी, बुलढाण्याचे खासदार प्रताप जाधव यांची नावे आघाडीवर आहेत. आगामी विधानसभा निवडणूक लक्षात घेता, कोकणात शिवसेना मजबूत करून नारायण राणे यांना शह देण्यासाठी सिंधुदुर्गचे खासदार विनायक राऊत यांची राज्यमंत्रीपदी वर्णी लागू शकते. 

टॅग्स :pm modi swearing-in ceremonyनरेंद्र मोदी शपथविधीNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाShiv SenaशिवसेनाArvind Sawantअरविंद सावंतUddhav Thackerayउद्धव ठाकरे