शिवसेना नेते संजय राऊतांची भाजपावर बोचरी टीका; “तुमच्या १०० पिढ्या आल्या तरी मुंबई महापालिकेवर...”

By प्रविण मरगळे | Published: November 19, 2020 10:41 AM2020-11-19T10:41:21+5:302020-11-19T10:53:40+5:30

Shiv Sena Sanjay Raut, BJP Devendra Fadanvis News: तुमच्या पक्षाचा नेते महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांवर खोटा आरोप करत असेल तर आमच्या पक्षातील नेते इशाराच देणार, ही लोकशाहीची महत्त्वाची भूमिका आहे असं सांगत राऊतांनी देवेंद्र फडणवीसांना टोला लगावला.

Shiv Sena leader Sanjay Raut Target BJP Devendra Fadanvis over Upcoming BMC Election | शिवसेना नेते संजय राऊतांची भाजपावर बोचरी टीका; “तुमच्या १०० पिढ्या आल्या तरी मुंबई महापालिकेवर...”

शिवसेना नेते संजय राऊतांची भाजपावर बोचरी टीका; “तुमच्या १०० पिढ्या आल्या तरी मुंबई महापालिकेवर...”

Next
ठळक मुद्देराजकारणात एकमेकांना इशारे दिले जातात. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा प्रत्येक भाषणात इशारा देतातया लोकांना मुंबई महाराष्ट्रात ठेवायची नाही. मुंबईत येणाऱ्या उद्योगपतींना हुसकावून त्यांच्या राज्यात नेतातआमच्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचा एकच भगवा आहे. तो भगवा गेल्या ५० वर्षापासून मुंबई महापालिकेवर जनतेने फडकवला आहे.

मुंबई – राज्यातील विरोधी पक्ष भाजपाने मुंबई महापालिकेवर सत्ता मिळवण्यासाठी कंबर कसली आहे. या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मुंबईत पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत मुंबई महापालिकेवर भाजपाचा भगवा फडकवणार असा निर्धार देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. मात्र भाजपाच्या रणनीतीवर शिवसेनेनेही आक्रमक पवित्रा घेतला आहे.

याबाबत शिवसेना नेते संजय राऊत म्हणाले की, देवेंद्र फडणवीस राज्याचे विरोधी पक्षनेते आहेत, त्यामुळे कार्यकर्त्यांसमोर अशी विधाने करु शकतात, भाजपाला वाटत असेल आता जो छत्रपतींचा भगवा फडकत आहे तो शुद्ध नाही आणि ते जे कोणता भगवा फडकवणार असेल तो शुद्ध आहे याचा निर्णय जनता ठरवेल, मुंबई महाराष्ट्राची राजधानी आहे. मुंबई महाराष्ट्राला मिळवण्यासाठी राज्यात १०५ हुतात्म्यांनी बलिदान दिलं आहे. जेव्हा जेव्हा दिल्लीकडून मुंबईची कुंचबणा झाली आहे तेव्हा तेव्हा मराठी माणूस रस्त्यावर उतरला आहे, त्यात शिवसैनिक आघाडीवर आहे. हा इतिहास भाजपाने चाळला पाहिजे असं त्यांनी सांगितले.

तसेच आमच्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचा एकच भगवा आहे. तो भगवा गेल्या ५० वर्षापासून मुंबई महापालिकेवर जनतेने फडकवला आहे. मुंबईला दिल्लीची पायपुसणी करण्याचा घाट भाजपाचा आहे. मुंबईला वेगळं करण्याचं राजकारण भाजपाचा आहे. मुंबई पोलिसांना माफिया बोलली, मुंबईला पीओके म्हंटली, ती नटी भाजपाची कार्यकर्तीच आहे. तिच्या समर्थनार्थ असणाऱ्यांना मुंबई देणार का? असा सवालही संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.

त्याचसोबत मराठी माणसाने ज्याच्यामुळे आत्महत्या केली, त्या अँकरसाठी रस्त्यावर उतरतात, त्यांना मराठी माणूस धडा शिकवेल. आम्ही सगळे अन्वय नाईक यांच्यामागे उभे आहोत, पण हे लोक अँकरसाठी रस्त्यावर येतात, भाजपाचा भेसळयुक्त भगवा आहे. तो कधीच मुंबई महापालिकेवर फडकणार नाही. भाजपानं मिशन, कमिशन जे काही असेल ते सुरु करावं, त्यांना बीएमसीमध्ये रस आहे कारण मुंबईतील आर्थिक उलाढाल, शेअर बाजार यावर भाजपाचं लक्ष्य आहे, मुंबईला दिल्लीचं गुलाम, पायपुसणी  बनवायचं आहे, मुंबई विकायची आहे. मुंबई ही मराठी माणसाची, श्रमिकांची, कष्टकऱ्यांची आहे, या लोकांना मुंबई महाराष्ट्रात ठेवायची नाही. मुंबईत येणाऱ्या उद्योगपतींना हुसकावून त्यांच्या राज्यात नेतात, मुंबईचं महत्त्व कमी करतायेत त्यावर भाजपा नेते बोलत नाही, मुंबई ओरबडायची असेल तर त्याला आमचा विरोध आहे, १०० पिढ्या आल्या तरी मुंबई महापालिकेवर भगवा उतरवायचं सोडा पण हात लावण्याचीही हिंमत नाही नाही, कारण या भगव्यात आग आहे असा घणाघात शिवसेनेने भाजपा नेत्यांवर केला आहे.

जंगल वाचवणं हीच शिवसेनेची भूमिका

आरे मेट्रो कारशेड कांजूरला हलवल्यामुळे मुंबईकरांना मेट्रो सेवा मिळण्यास उशीर होणार आहे, पण स्वत:च्या हट्टापायी असा निर्णय घेतल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला. परंतु कांजूरला मेट्रो हलवण्याची भूमिका शिवसेनेची देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असल्यापासून होती, जंगल वाचवण्याची भूमिका शिवसेनेची आहे. आरेत मेट्रो नेऊ नका यासाठी शिवसेनेचा विरोध होताच, सरकार आलं तेव्हा भूमिका घेतली नाही असं संजय राऊत म्हणाले.

राजकारणात इशारे देणं ही लोकशाहीत महत्त्वाची भूमिका

राजकारणात एकमेकांना इशारे दिले जातात. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा प्रत्येक भाषणात इशारा देतात, काँग्रेस देतात, इतर पक्षांना देतात, राजकारणात वॉर्निंग हा शब्द इशारा म्हणून वापरतो, एखादी गोष्ट चुकीची होत असेल तर इशारा दिला जातो, लोकशाही संदर्भात आपली भूमिका असेल तर या गोष्टी सहजपणे घेतल्या पाहिजे, तुमच्या पक्षाचा नेते महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांवर खोटा आरोप करत असेल तर आमच्या पक्षातील नेते इशाराच देणार, ही लोकशाहीची महत्त्वाची भूमिका आहे असं सांगत राऊतांनी देवेंद्र फडणवीसांना टोला लगावला.

बाळासाहेबांबाबत सगळ्यांच्या मनात श्रद्धा

बाळासाहेबांबाबत श्रद्धा सगळ्यांच्या मनात आहे, पंडित जवाहरलाल नेहरु यांचे देशासाठी योगदान मोठे आहे, शिवसेनेला त्याचा आदर आहे, परंतु त्यांच्यासोबत राजकीय मतभेद असू शकतात. बाळासाहेबांबद्दल श्रद्धा सगळ्या नेत्यांच्या मनात आहे, त्यामुळे कोणी ट्विट केले नसेल तर ट्विटवरुन श्रद्धेचे प्रमाण ठरवलं जाऊ शकत नाही असं सांगत संजय राऊतांनी आमदार नितेश राणेंच्या टीकेला उत्तर दिलं आहे.  

Web Title: Shiv Sena leader Sanjay Raut Target BJP Devendra Fadanvis over Upcoming BMC Election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.