"जोपर्यंत राज्यपाल नियुक्त सदस्यांची नियुक्ती होत नाही, तोपर्यंत राज्यपालांवर टीका करणारच", संजय राऊतांचा निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2021 01:12 PM2021-03-24T13:12:14+5:302021-03-24T13:15:11+5:30

Sanjay Raut criticized on Governor :राज्यपाल हे पद संवैधानिक आहेत. त्या पदाचा मान राखला पाहिजे, हे मला सुद्धा कळतं. पण राज्यपालांचा मान विरोधकांनीच ठेवला नाही, असे संजय राऊत म्हणाले.

Shiv Sena leader Sanjay Raut criticized on Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari over appointment of 12 MLC | "जोपर्यंत राज्यपाल नियुक्त सदस्यांची नियुक्ती होत नाही, तोपर्यंत राज्यपालांवर टीका करणारच", संजय राऊतांचा निशाणा

"जोपर्यंत राज्यपाल नियुक्त सदस्यांची नियुक्ती होत नाही, तोपर्यंत राज्यपालांवर टीका करणारच", संजय राऊतांचा निशाणा

Next
ठळक मुद्देविरोधी पक्षनेत्याने गृहसचिवांना दिलेल्या अहवालात काडीचाही दम नाही, असे म्हणत संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली

नवी दिल्ली : राजभवन हा राजकारणाचा अड्डा झाला आहे. त्यामुळे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर टीका होणारच, असे सांगत जोपर्यंत राज्यपाल नियुक्त सदस्यांची नियुक्ती होत नाही, तोपर्यंत राज्यपालांवर आम्ही टीका करणारच, असे शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी सांगितले. (Shiv Sena leader Sanjay Raut criticized on Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari over appointment of 12 MLC)

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantivar) यांच्या नेतृत्वाखालील एका शिष्टमंडळाने आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन भ्रष्टाचार, बदल्यांचे रॅकेट अशी सरकारविरोधातील 100 प्रकरणे सादर केली. याबाबत संजय राऊत यांनी विचारले असता त्यांनी थेट राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर निशाणा साधला. 

"राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे भाजपाचे कार्यकर्ते आहेत. त्यामुळे त्यांना भेटायला विरोधक गेले असतील. राज्यपालांना भाजपाचे कार्यकर्ते म्हणण्यात गैर काय? राज्यपाल कोश्यारी हे संघात होते. भाजपाचे मुख्यमंत्रीही होते. त्यामुळे त्यांना भाजपाचे कार्यकर्ते म्हटले तर वावगं काय? मलाही कुणी शिवसेनेचा कार्यकर्ता म्हटले तर मला त्याचा अभिमानच वाटेल", अशा शब्दांत संजय राऊत यांनी राज्यपालांवर हल्लाबोल केला.

(राज्यपाल साहेब, महाराष्ट्रात हस्तक्षेप करा, राज्य वाचवा; भाजपाच्या शिष्टमंडळाकडून 100 प्रकरणांची तक्रार)

राज्यपाल हे पद संवैधानिक आहेत. त्या पदाचा मान राखला पाहिजे, हे मला सुद्धा कळतं. पण राज्यपालांचा मान विरोधकांनीच ठेवला नाही. राजभवन हा राजकारणाचा अड्डा झाला आहे. त्यामुळे त्यांच्यावर टीका होणारच. जोपर्यंत राज्यपाल 12 सदस्यांच्या नावाला मंजुरी देत नाही. तोपर्यंत आम्ही टीका करतच राहणार. राज्यपाल भाजपाच्या दबावाखाली या फायलींवर सही करत नाहीत, असे म्हणत या फाईलमध्ये असं काय आहे? त्यामुळे राज्यपाल या फायलीवर का सही करत नाही? असा  सवालही संजय राऊत यांनी केला.

याचबरोबर, संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावरही निशाणा साधला. दिल्लीत महाराष्ट्राच्या नेत्यांनी येत राहिले पाहिजे. दिल्लीवर महाराष्ट्राचा प्रभाव असला पाहिजे. त्यामुळे महाराष्ट्रातील विरोधी पक्षनेते काल दिल्लीत आल्याचे कळले. काही कागद घेऊन ते आले होते. ते कागदपत्रे काही गंभीर नव्हते. ते गंभीर आहेत की नाही हे सरकार ठरवेल. विरोधी पक्षनेत्याने गृहसचिवांना दिलेल्या अहवालात काडीचाही दम नाही, असे म्हणत संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली.

(फडणवीसांचा अहवाल 'भिजलेला लवंगी फटाका', संजय राऊतांनी उडवली खिल्ली)

Web Title: Shiv Sena leader Sanjay Raut criticized on Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari over appointment of 12 MLC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.