शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
3
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
4
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
5
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
6
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
7
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
8
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
9
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
10
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
11
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
12
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
13
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
14
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
15
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
16
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
17
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
18
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
19
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
20
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य

शरद पवारांवरील टीकेचा शिवसेनेकडून समाचार; पडळकरांचा 'खास' शब्दात उल्लेख

By कुणाल गवाणकर | Published: November 23, 2020 5:11 PM

गोपीनाथ पडळकर यांच्यावर शिवसेना नेते अनिल परब यांची जोरदार टीका

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांवर टीका करणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांना राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं. यानंतर आता भाजपचे आमदार गोपीचंद पडळकरांनी पवारांवर शरसंधान साधलं आहे. ज्या पक्षाचे ४ खासदार निवडून येतात, त्यांना लोकनेता म्हणता. मग ३०३ खासदार निवडून देणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींना काय म्हणायचं, असा सवाल त्यांनी विचारला आहे. पडळकर यांच्या विधानाचा शिवसेना नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांनी समाचार घेतला आहे.आपण कोणावर टीका करतोय याचा अभ्यास चंद्रकांत पाटील आणि गोपीचंद पडळकर यांनी करायला हवा. त्यांनी शरद पवारांचं कर्तृत्व पाहायला हवं. वयाच्या ३६ व्या वर्षी ते मुख्यमंत्री झाले. गेल्या ५० वर्षांपासून ते संसदीय राजकारणात सक्रिय आहेत. त्यामुळे टीकाकारांनी एकदा स्वत:ला पवारांसमोर तपासून पाहायला हवं, असं परब म्हणाले. पडळकर यांच्यावर भाजपचे संस्कार नाहीत. भाजपमधील व्यक्ती अशी बोलणार नाहीत. हा भाजपमधील 'भेसळी'चा परिणाम आहे, असा सणसणीत टोला त्यांनी लगावला.वर्षभरापूर्वी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी पहाटेच शपथविधी उरकला होता. यावर भाष्य करताना पुढील शपथविधी पहाटेला नव्हे तर योग्य वेळी होईल, असं म्हटलं होतं. देवेंद्र फडणवीसांच्या विधानाचा अनिल परब यांनी समाचार घेतला. 'सत्ता नसल्यानं देवेंद्र फडणवीस अस्वस्थ आहेत. पुढील किमान ५ वर्षे तरी त्यांना सत्तेची स्वप्नं पाहतच काढावी लागणार आहेत. सत्ता नसल्यास पक्षात आलेले नेते सोडून जातील, अशी भीती असल्यानं सत्ता येईल अशी विधानं करावी लागतात,' असा चिमटा परब यांनी काढला. राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढू नये यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. कोरोनाची दुसरी लाट येऊ नये म्हणून आवश्यक पावलं उचलली जात आहेत. पुन्हा लॉकडाऊन करण्याचा सरकारचा विचार नाही. सरकार लॉकडाऊन करण्याच्या मताचं आहे. कोरोनाची दुसरी लाट आलीच, तर संपूर्ण यंत्रणा सज्ज आहे. कोरोनाची परिस्थिती कशी सांभाळायची याचा अनुभव आता प्रशासनाच्या गाठिशी आहे, असं परब म्हणाले. 

टॅग्स :Anil Parabअनिल परबShiv SenaशिवसेनाSharad Pawarशरद पवारGopichand Padalkarगोपीचंद पडळकरBJPभाजपाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस