"मी राज्यपालांचा लाडका मंत्री, कायम संपर्कात असतो"

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2021 07:07 PM2021-02-12T19:07:07+5:302021-02-12T19:09:25+5:30

आपण राज्यपालांचे लाडके मंत्री आहोत आणि त्यामुळे आपल्याला कोणतीही अडचण येत नाही असं वक्तव्यही त्या मंत्र्यांनी केलं.

shiv sena higher education minister uday samant said he is favorite minister of governor bhagat singh koshyari | "मी राज्यपालांचा लाडका मंत्री, कायम संपर्कात असतो"

"मी राज्यपालांचा लाडका मंत्री, कायम संपर्कात असतो"

googlenewsNext
ठळक मुद्दे१५ तारखेपासून राज्यातील महाविद्यालये होणार सुरूवर्षभराचा कार्यक्रम पाहिल्यास आमचे दोघांचेही संबंध उत्तम, सामंत यांची माहिती

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि ठाकरे सरकार यांच्यातील वादाबद्दल अनेकदा वृत्त समोर येत असतं. परंतु राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनीदेखील राज्यपालांशी असलेल्या त्यांच्या संबंधांबाबत भाष्य केलं आहे. "माझा राज्यपालांशी कायम संपर्क असतो. मी त्यांचा लाडका मंत्री आहे. त्यामुळे मला कोणत्याही प्रकारची अडचण येत नाही," असं उदय सामंत म्हणाले. सोलापुरात पत्रकारांशी बोलताना त्यांनी यावर भाष्य केलं. काही महिन्यांपूर्वी परीक्षांच्या मुद्द्यावरून उदय सामंत आणि राज्यपाल यांच्यातील वाद समोर आला होता. परंतु आता आपण त्यांचं लाडके मंत्री असल्याचं वक्तव्य त्यांनी केलं. 

"आठ दिवसांपूर्वीदेखील राज्यपालांशी माझी चर्चा झाली होती. राजकीय कार्यक्रम आणि राजकीय गोष्टी या वेगळ्या आहेत. परंतु आपलं खातं चालवत असताना राज्यपालांकडे आपल्याला जावं लागतं, त्यांची भेट घ्याी लागते. कुलपती म्हणून काही कामकाजही त्यांच्यासोबत करावं लागतं," असं उदय सामंत म्हणाले. 

"वर्षभराचा जर आमचा कार्यक्रम पाहिला असेल तर आमचे दोघांचेही चांगले संबंध आहेत," असंही ते म्हणाले. यावेळी त्यांनी शिवजयंतीवरही भाष्य केलं. यावेळी शिवजयंती आपल्याला साधेपणानं साजरी करावी लागणार आहे. आंगणेवाडीची यात्रदेखील कोरोनाचे नियम पाळूनच केली. महाराष्ट्राच्या सहनशीलतेमुळेच राज्य कोरोनामुक्त होण्याच्या मार्गावर आहे. जनता शिवजयंतीदेखील साधेपणानंच साजरी करेल याचा विश्वास आहे," असंही सामंत यावेळी म्हणाले. 

१५ तारखेपासून महाविद्यालये सुरू

१५ फेब्रुवारीपासून राज्यातील महाविद्यालयं सुरू करण्यात येतील. यंदाच्या वर्षी ७५ टक्के उपस्थितीचं बंधन नसेल, अशी महत्त्वाची माहिती यापूर्वी सामंत यांनी दिली होती. सध्या ५० टक्के विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत महाविद्यालयं सुरू केले जातील. तसंच परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना ऑनलाईन आणि ऑफलाईन असे दोन्ही पर्याय खुले असतील. महाविद्यालयात ७५ टक्के उपस्थिती बंधनकारक नसेल. मात्र महाविद्यालयांना आणि विद्यार्थ्यांना शासनानं घालून दिलेल्या कोरोना प्रतिबंधात्मक नियमावलीचं पालन करावं लागेल, असं सामंत म्हणाले होते.

Web Title: shiv sena higher education minister uday samant said he is favorite minister of governor bhagat singh koshyari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.