शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

"तुम मुझे वोट दो, मैं तुम्हें वैक्सीन...", भाजपाच्या 'त्या' आश्वासनावर काँग्रेस नेत्याचा निशाणा

By ravalnath.patil | Published: October 22, 2020 6:21 PM

shashi tharoor : गुरुवारी  भाजपाने बिहार विधानसभा निवडणुकीसाठी जाहीरनामा घोषित केला. 

ठळक मुद्दे बिहारमधील नागरिकांना कोरोनावरील लस मोफत दिली जाईल, असे आश्वासन भाजपाने दिले आहे. त्यामुळे विरोधी पक्षांनी भाजपाच्या या आश्वासनावर निशाणा साधला.

नवी दिल्ली : कोरोना संकट काळात आगामी बिहार विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला वेग आला आहे. बिहारमध्ये भाजपा आणि जेडीयू एकत्र निवडणूक लढवत आहेत. गुरुवारी  भाजपाने बिहार विधानसभा निवडणुकीसाठी जाहीरनामा घोषित केला. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि भाजपा नेत्यांच्या उपस्थितीत भाजपाने संकल्प पत्र प्रसिद्ध केले आहे. यामध्ये बिहारमधील नागरिकांना कोरोनावरील लस मोफत दिली जाईल, असे आश्वासन भाजपाने दिले आहे. त्यामुळे विरोधी पक्षांनी भाजपाच्या या आश्वासनावर निशाणा साधला.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री शशी थरूर यांनीही या आश्वासनावरून भाजपावर हल्लाबोल केला आहे. शशी थरूर यांनी यासंदर्भात ट्विट केले आहे. "तुम्ही मला मत द्या, मी तुम्हाला लस... काय भयंकर कुटिलपणा! निवडणूक आयोग त्यांना आणि त्यांच्या काठावर लटकणाऱ्या निर्लज्ज सरकारला रोखणार का?" असे ट्विट शशी थरून यांनी केले आहे.

याचबरोबर, भाजपाच्या या आश्वासनावर आरजेडीने सुद्धा निशाणा साधला आहे."कोरोना लस भाजपाची नव्हे तर देशाची आहे! लसीचा राजकीय वापर दिसून येत असून त्यांच्याजवळ आजार आणि मृत्यूची भीती विकण्याशिवाय पर्याय नाही! बिहारी स्वाभिमानी आहेत, काही पैशातआपल्या मुलांचे भविष्य विकत नाहीत!," असे ट्विट आरजेडीकडून करण्यात आले आहे.

दरम्यान, भाजपाच्या या जाहीरनाम्यात ११ मोठे संकल्प करण्यात आले असून सत्तेत आल्यानंतर अनेक आश्वासने पूर्ण करण्याचा दावा केला. यावेळी "भाजपा है तो भरोसा है" असा भाजपाने नवीन नाराही दिला आहे.

भाजपाच्या जाहिरनाम्यातील ११ मुख्य संकल्प १. बिहारच्या प्रत्येक रहिवाशांना कोरोनाची लस मोफत देणार. २. वैद्यकीय, अभियांत्रिकी व इतर तांत्रिक शिक्षण हिंदी भाषेत उपलब्ध करुन देणे. ३. एका वर्षात संपूर्ण राज्यात तीन लाख नवीन शिक्षकांची भरती होईल. ४. पुढील पिढीसाठी आयटी हब येथे पाच वर्षात पाच लाख रोजगार निर्मिती. ५. एक कोटी महिला स्वावलंबी बनवणार. ६. आरोग्य विभागात एक लाख लोकांना नोकर्‍या मिळतील तसेच २०२४ पर्यंत दरभंगा एम्स सुरू करणार. ७. धान आणि गहू नंतर डाळींची खरेदीही एमएसपी दराने केली जाईल. ८. २०२२ पर्यंत ३० लाख लोकांना पक्के घर देण्याचं आश्वासन. ९. २ वर्षात १५ नवीन प्रक्रिया उद्योग स्थापन करण्याचे वचन. १०. गोड्या पाण्यातील माशांचे उत्पादन वाढवणार. ११. शेतकरी उत्पादक संघटनेची पुरवठा साखळी तयार करणार, ज्यामुळे १० लाख रोजगार निर्माण होतील. 

टॅग्स :Shashi Tharoorशशी थरूरBihar Assembly Election 2020बिहार विधानसभा निवडणूकcongressकाँग्रेसBJPभाजपा