शहरं
Join us  
Trending Stories
1
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
2
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
3
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
4
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
5
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
6
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
7
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
8
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
9
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
10
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
11
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
12
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
13
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
14
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
15
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
16
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
17
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
18
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
19
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
20
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत

"भाग्यश्री आत्राम अहेरीत पराभूत होतील"; शरद पवारांच्या उमेदवाराला काँग्रेसचाच विरोध

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2024 09:19 IST

Bhagyashri Atram Sharad Pawar : अहेरी विधानसभा मतदारसंघात शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला येण्याची शक्यता आहे. या जागेवरून भाग्यश्री आत्राम यांना उमेदवारी दिला जाणार असल्याची चर्चा आहे, पण त्याला आता काँग्रेसनेच विरोध केला आहे.

Bhagyashri Atram Vijay Wadettiwar aheri vidhan sabha 2024 : राष्ट्रवादीतील बंडानंतर साथ सोडून अजित पवारांसोबत गेलेल्या धर्मरावबाबा आत्राम यांच्या विरोधात त्यांची मुलगी भाग्यश्री आत्राम निवडणूक लढवणार असल्याचे जवळपास निश्चित मानले जात आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून त्या अहेरी विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरतील. पण, त्यांच्या उमेदवारीला आता काँग्रेसनेच विरोध केला आहे. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी भाग्यश्री आत्राम पराभूत होतील, असे म्हटले आहे. त्याचबरोबर विजय वडेट्टीवारांनी अहेरीच्या जागेवरही दावा केला आहे. 

अहेरी विधानसभा मतदारसंघात यावेळी बाप विरुद्ध मुलगी अशी लढत बघायला मिळण्याचीच शक्यता जास्त आहे. पण, जागावाटप आणि उमेदवारांच्या घोषणेनंतर त्यावर अधिकृतपणे शिक्कामोर्तब होईल. असे असले तरी भाग्यश्री आत्राम यांनी वडील धर्मरावबाबा आत्राम यांच्या विरोधात निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. पण, त्यांची उमेदवारी घोषित होण्याआधीच काँग्रेसने  विरोध केला आहे. 

काँग्रेसचा विरोध का? विजय वडेट्टीवार काय म्हणाले? माध्यमांशी बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले, "काँग्रेसने ही जागा लढली पाहिजे. कारण, धर्मरावबाबा आणि मुलींमध्ये जर ही निवडणूक झाली, तर मुलीचा पराभव होईल आणि धर्मरावबाबा सहज निवडून येतील. महाविकास आघाडीचं एका जागेचं नुकसान होईल. हे आम्ही आमच्या पक्षश्रेष्ठींना आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांना सांगितले आहे."

"लोकांमध्ये ही चर्चा आहे की, मुलीला (भाग्यश्री आत्राम) १०-१५ हजार मते पडतील. ती जास्त मते घेणार नाही. धर्मरावबाबांचा मार्ग सुकर करण्यासाठीच मुलीने विरोधात भूमिका घेतली अशी पण चर्चा आहे", असा दावा वडेट्टीवार यांनी केला. 

अहेरी विधानसभा मतदारसंघावर काँग्रेसने केला दावा

ते पुढे बोलताना म्हणाले की, "त्यामुळे आम्ही मित्रपक्षाकडे सांगितले आहे की, एक जागा वाढवण्यासाठी ही जागा काँग्रेसच्या कोट्यात द्या", असे सांगत वडेट्टीवार यांनी अहेरी विधानसभा मतदारसंघावर दावा केला आहे. 

धर्मरावबाबा आत्राम १५ हजारांच्या मताधिक्याने झाले होते विजयी

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत धर्मरावबाबा आत्राम यांनी १५ हजारांच्या मताधिक्याने विजय मिळवला होता. त्यांनी भाजपाचे त्यावेळेचे विद्यमान आमदार अंबरीशराव आत्राम यांचा पराभव केला होता. धर्मरावबाबा आत्राम यांना ६०,०१३ मते मिळाली होती, तर अंबरीश आत्राम यांना ४४,५५५ मते मिळाली होती.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारaheri-acअहेरीmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४NCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेस