शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही तर रक्ताचे होतात, मग का असं केलं?; छगन भुजबळांचा राज ठाकरेंवर पलटवार
2
मोदी जे बोलतात, त्यातलं १ टक्काही खरं नाही, त्यांचा आत्मविश्वास ढळलाय"; शरद पवारांची टीका
3
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
4
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
5
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
6
'भाजपचे सरकार कायम राहणार नाही, आज ना उद्या नक्की बदला घेईन', ममता बॅनर्जींचा इशारा
7
सनरायझर्स हैदराबादविरुद्ध गुजरात टायटन्स सामना रद्द? समोर आले मोठे अपडेट्स
8
स्वत: फुटबॉलपटू असलेली आईच बनली लेकाची कोच आणि म्हणून.. सुनील छेत्रीच्या फुटबॉलप्रेमाची खास गोष्ट!
9
मुलगी हरवल्याप्रकरणी चौकशीसाठी नेलं अन् कोठडीतच तरूणाचा मृत्यू, नेमकं काय झालं?
10
"मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, गोहत्या करणाऱ्यांना उलटे लटकवून सरळ करू", अमित शाहांचा इशारा
11
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
12
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान
13
"यासारखी अमानुष गोष्ट नाही..."; पंतप्रधान मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
14
‘मी त्यांच्यासोबत, जर स्वाती मालिवाल यांना वाटलं तर…’ गैरवर्तन प्रकरणी प्रियंका गांधी यांचं मोठं विधान 
15
विकी कौशलची 'ही' इच्छा अजूनही अपूर्णच! म्हणाला, 'कधी करेन माहित नाही पण...'
16
Hina Khan : "40 डिग्रीत वेदनादायक पीरियड क्रॅम्प्सने त्रस्त असताना..."; हिना खानने सांगितला अनुभव
17
आमनेसामने Video: ठाकरे गटाकडून 50 खोकेची घोषणाबाजी; एकनाथ शिंदेंकडून धनुष्यबाणाचा इशारा
18
‘पृथ्वीराज चव्हाण यांनी पोपट घेऊन भविष्यवाणी सांगण्यास बसावे’, अजित पवार गटाचा टोला 
19
‘मोदींनी एकदा मला फोन केला आणि म्हणाले, माझा अमेरिकेचा व्हिसा फेटाळलाय, तेव्हा मीच…’ शरद पवार यांनी सांगितली आठवण
20
मराठमोळ्या अभिनेत्रीसोबत रिलेशनशीपमध्ये होता 'हीरामंडी'चा अभिनेता, आता ब्रेकअपबाबत केला खुलासा

शरद पवारांचे आता ‘मिशन कोकण’!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 07, 2021 6:32 AM

कोकणातील तीन जिल्ह्यांचा नवोन्मेष विभाग म्‍हणून विकास होणार

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आता कोकणावर विशेष लक्ष केंद्रित केले असून कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हे तीन जिल्हे ‘इंटरनॅशनल ग्रीनफिल्ड इनोव्हेटिव्ह रिजन’ म्हणून विकसित करण्याची सूचना बैठकीत केली आहे.

कोकणात नैसर्गिक साधनसंपत्तीबरोबर ‘इनोव्हेटीव्ह’ संशोधनासाठी अनुकूल वातावरण व क्षमता आहे. हे लक्षात घेऊन कोकण विभागास आंतरराष्ट्रीय नवोन्मेष (इनोव्हेशन) विभाग म्हणून विकसित करण्यासंदर्भात मुंबईतील राज्य सह्याद्री अतिथीगृहात विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीत पुण्याच्या विज्ञान व तंत्रज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ. राजेंद्र जगदाळे यांनी ‘इंटरनॅशनल ग्रीनफिल्ड इनोव्हेटिव्ह रिजन’ संदर्भात सादरीकरण केले. ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांनीही इनोव्हेटीव्ह रिजनच्या संकल्पनेला पाठिंबा दर्शवत कोकणच्या व राज्याच्या विकासासाठी संकल्पनेची अंमलबजावणी आवश्यक असल्याचे सांगितले.

बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, उद्योगमंत्री सुभाष देसाई, कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, परिवहनमंत्री अनिल परब, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, पर्यावरण राज्यमंत्री अदिती तटकरे, ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिक काकोडकर, पुण्याच्या विज्ञान व तंत्रज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ. राजेंद्र जगदाळे आदींसह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

पुढील पन्नास–शंभर वर्षांचा विचार करुन निर्णय घ्यावा n शरद पवार यावेळी म्‍हणाले, महाराष्ट्राला अनेक क्षेत्रात पुढे नेण्याचे प्रयत्न होत असताना कोकणला ‘इंटरनॅशनल ग्रीनफिल्ड इनोव्हेटिव्ह रिजन’ म्हणून विकसित करण्याची मोठी संधी आहे. कोकणात त्यासाठी अनुकूल वातावरण आहे. कोकणात बुद्धिमत्ता, सर्जनशीलता प्रचंड आहे. मुंबई विद्यापीठ, कृषी विद्यापीठ, मत्स्यविज्ञान संस्था याठिकाणी आहेत. 

n कोकणातील नैसर्गिक साधनसंपत्तीचा उपयोग करुन घेत तेथील निसर्गाला हानी न पोचवता या विभागाचा विकास करणे शक्य आहे. पुढील पन्नास–शंभर वर्षांचा विचार करुन यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेतला पाहिजे, असेही शरद पवार यांनी सांगितले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोरही या संकल्पनेचे सादरीकरण करुन त्यांच्या मान्यतेनंतर पुढे जावे, अशी सूचनाही शरद पवार यांनी केली.

तिन्ही मंत्री आणि राज्य सरकार कोकणचा ‘इंटरनॅशनल ग्रीनफिल्ड इनोव्हेटिव्ह रिजन’ विकास करण्यासाठी सकारात्मक आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर सादरीकरणानंतर यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेण्यात येईल.- अजित पवार,  उपमुख्यमंत्री  

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेस