आजारपणातून सावरत शरद पवार पुन्हा सक्रिय; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना पत्र लिहून केली मोठी मागणी 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2021 06:40 PM2021-05-07T18:40:47+5:302021-05-07T18:46:00+5:30

Sharad Pawar News : राज्यातील कोरोनाची परिस्थिती आणि लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र लिहिले आहे.

Sharad Pawar wrote a letter to the Chief Minister Uddhav Thackeray and Deputy Chief Minister Ajit Pawar and made a big demand | आजारपणातून सावरत शरद पवार पुन्हा सक्रिय; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना पत्र लिहून केली मोठी मागणी 

आजारपणातून सावरत शरद पवार पुन्हा सक्रिय; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना पत्र लिहून केली मोठी मागणी 

googlenewsNext

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांना आजारपणामुळे गेल्या काही दिवसांपासून सक्रिय राजकारणापासून दूर राहावे लागले होते. (Sharad Pawar News) मधल्या काळात त्यांच्यावर शस्त्रक्रियाही झाल्या. मात्र आता आजारपणातून सावरत शरद पवार हे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात सक्रिय झाले आहेत. त्यांनी घरातूनच कामास सुरुवात केली असून, ते कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. यादरम्यान राज्यातील कोरोनाची परिस्थिती आणि लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र लिहिले आहे. (Sharad Pawar wrote a letter to the Chief Minister Uddhav Thackeray and Deputy Chief Minister Ajit Pawar )

या पत्रामध्ये शरद पवार यांनी कोरोना आणि लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर काही घटकांना मदत करण्याची आवश्यकता असल्याची सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना केली आहे. तसेच कोरोनाकाळात मोठे आर्थिक नुकसान सहन करत असलेल्या छोट्या हॉटेल व्यावसायिकांना मदत मिळणे आवश्यक असल्याचेही शरद पवार यांनी या पत्रामध्ये म्हटले आहे. 
 
दरम्यान, काही दिवसांपूर्वी हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाल्यानंतर शरद पवार यांनी  राज्यातील कोरोना स्थितीचा आढावा घेत कोरोनासोबतच्या लढाईत मृत्युमुखी पडलेल्या राज्यातील आरोग्य सेवा, पोलिस दल व शासकीय कर्मचाऱ्यांच्या मदतीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामार्फत आमदार-खासदारांचे एक महिन्याचे वेतन आणि राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्मधून निधी देण्याची सूचना केली होती. त्यानुसार राष्ट्रवादीने पक्षाच्या वेल्फेअर ट्रस्टतर्फे एक कोटी रुपये तर राज्यातील सर्व विधिमंडळ सदस्य व संसद सदस्यांचे एक महिन्याचे वेतन असे एकूण २ कोटी रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीस मदत दिले होते. 

Web Title: Sharad Pawar wrote a letter to the Chief Minister Uddhav Thackeray and Deputy Chief Minister Ajit Pawar and made a big demand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.