Sharad Pawar Target on opponents; government run in the hands of BJP means its worried to Shiv Sena | शरद पवारांचा विरोधकांवर घणाघात; भाजपाच्या हातात सरकार चालवायला देणं म्हणजे...

शरद पवारांचा विरोधकांवर घणाघात; भाजपाच्या हातात सरकार चालवायला देणं म्हणजे...

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची शिवसेना नेते संजय राऊत यांनी मुलाखत घेतली आहे. या मुलाखतीचे काही भाग संजय राऊत यांच्याकडून ट्विट केले जात असतात. यात मुलाखतीचा चौथा प्रोमो प्रसिद्ध करण्यात आला आहे. यात संजय राऊतांनी ठाकरे सरकारचं भविष्य काय? राष्ट्रवादी आणि भाजपाची सत्तेसाठी बोलणी झाली होती का? यावर प्रश्न विचारले आहेत.

यावेळी शरद पवार सांगतात की, उद्धव ठाकरेंच्या कामाची पद्धत ही शिवसेनेच्या कामाची पद्धत आहे. भाजपाच्या हातात सरकार चालवायला देणे हे शिवसेनेच्या हिताचं नाही, राज्यात सेंट्रल ऑफ पॉवर एकच असली पाहिजे असं पवारांनी सांगितले. तसेच पार्लांमेटमध्ये नरेंद्र मोदींच्या चेंबरमध्ये जाऊन काय संवाद झाला याबाबतही पवारांनी मुलाखतीत खुलासा केला आहे.

ठाकरे सरकारचे आपण रिमोट कंट्रोल आहात की हेडमास्तर? संजय राऊतांचा शरद पवारांना प्रश्न

उद्यापासून ही बहुचर्चित मुलाखत प्रसिद्ध होणार आहे. शरद पवारांच्या या मुलाखतीच्या प्रोमोमुळे उत्कंठा वाढली आहे. दरम्यान, बुधवारी या मुलाखतीचा पहिला टिझर प्रसिद्ध झाला. त्यात महाराष्ट्रातील सत्ता बदल हा अपघात होता काय?' असा मथळा असलेला हा व्हिडिओ उत्कंठा वाढवणारा ठरला. शरद पवारांची मुलाखत ऐतिहासिक ठरेल. अशी मुलाखत होणे नाही, असा दावा राऊत यांनी केला आहे. 'शरद पवार यांची मुलाखत घेण्याचं आधीच ठरलं होतं. शरद पवार हे राज्यातील देशातील प्रमुख नेते आहेत. लोकांनी बघितलेले आणि मी पाहिलेले पवार वेगळे आहेत. त्यांच्याविषयी गैरसमज पसरवण्यात आले, बदनामीकारक विधानं केली गेली. जेव्हा पहाटेचा शपथविधी झाला, तेव्हा लोकांनी पवारांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं होतं. पण मी म्हटलं होतं की, शरद पवार सरकार स्थापन करतील. त्यांनी बसलेली खीळ तोडून सरकार स्थापन केलं,' असं राऊत यांनी म्हटलं होतं.

 एक नारद, शिवसेना गारद... पवारांच्या मुलाखत टीझरवरुन फडणवीसांचा टोला 

तर संजय राऊत यांची एक मुलाखत घ्या आणि त्याला ‘एक नारद, शिवसेना गारद’ असे नाव द्या अशा संदेश मला व्हाट्सअप आल्याचा चिमटा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काढला. तसेच, सामना हे सध्या बाळासाहेबांचा सामना राहिला नाही. सामना सध्या वाचतंच, कोण? असे म्हणत सामना वर्तमानपत्र आपण वाचत नसल्याचेही फडणवीस यांनी म्हटलं आहे.

अन्य महत्त्वाच्या बातम्या

छत्रपती शिवाजी महाराजांची थट्टा खपवून घेणार नाही; ‘लोकमत’च्या बातमीची सरकारकडून दखल

स्टँडअप कॉमेडियनने केली छत्रपती शिवाजी महाराजांची थट्टा; सोशल मीडियात संतापाची लाट

गँगस्टर विकास दुबेचा खात्मा, जप्त केलेल्या ‘त्या’काळ्या बॅगेतून उलगडणार अनेक रहस्य

जम्मू काश्मीर हा भारताचा अविभाज्य घटक आहे, होता आणि यापुढेही राहील; पाकला सुनावलं

Read in English

Web Title: Sharad Pawar Target on opponents; government run in the hands of BJP means its worried to Shiv Sena

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.