शहरं
Join us  
Trending Stories
1
आता उद्धव ठाकरेंनी सांगितले, मविआ राज्यात किती जागा जिंकणार; दोन आकड्यांतून संकेत...
2
हे बळी नव्हे तर खून...! घाटकोपर दुर्घटनेवरून देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
3
आज बरसणार शब्दबाण! महायुती दाखवेल शिवाजी पार्कवर दम; बीकेसीत ‘इंडिया’ करणार शक्तिप्रदर्शन
4
Diabetes पासून हार्ट डिजीज पर्यंतचे उपचार करणं होणार स्वस्त; सरकारनं ४१ औषधांच्या किंमती केल्या कमी
5
आजचे राशीभविष्य १७ मे २०२४; आजचा दिवस अनुकूल, आनंदाचे वातावरण राहिल
6
अखेर भावेश भिंडे जेरबंद, उदयपूरच्या रिसॉर्टमधून घेतले ताब्यात; ६० तासांनंतर बचावकार्य थांबले
7
"बच्चन घराण्याचे संस्कार", हात फ्रॅक्चर असलेल्या आईला सांभाळताना दिसली आराध्या, ऐश्वर्याच्या लेकीचं होतंय कौतुक
8
भावेश भिंडेची १०० कोटींची कमाई? निविदा १० वर्षांसाठी मंजूर, पण दिली ३० वर्षांची परवानगी
9
रेल्वेने मुंबई महापालिकेचे थकविले ५७२ कोटी; २२ वर्षे पाणीपट्टी, मालमत्ता कर भरलाच नाही
10
काँग्रेस आणि आपमध्ये दुरावा वाढला? राहुल गांधीच्या सभेचे केजरीवालांना निमंत्रण नाही
11
ज्यांना ‘नकली भाजप’ मान्य नाही त्यांनी आम्हाला मत द्यावे, हिंमत असेल तर...: उद्धव ठाकरे
12
बजेट धर्मावर आधारित कधीच नसते, जातींचा विचार करुन देश चालत नाही: शरद पवार
13
शरद पवार गटाच्या नेत्यांना जमावबंदीच्या नोटिसा; १५ ते १९ मे कुठेही फिरु नका, पोलिसांचा आदेश
14
...तर ईडी आरोपीला अटक करू शकत नाही; सुप्रीम कोर्टाचा निकाल, जामिनासाठी अर्ज अनावश्यक 
15
आज पंतप्रधान मोदींची शिवाजी पार्कवर सभा; वाहतूक वळविली, पाहा, महत्त्वाचे बदल
16
कोकण रेल्वेच्या मार्गातील अडथळे होणार दूर, तिन्ही मागण्या पूर्ण करु: रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव
17
काँग्रेसच्या धोरणांनी गरिबी वाढली; नितीन गडकरी यांची टीका
18
शक्तिप्रदर्शनाला महिला बचतगट लाभार्थींची ताकद; खासदारांबरोबरच आमदारांचीही कसोटी
19
निवडून आल्यावर काय करणार? नागरी प्रश्नांना वर्षा गायकवाड यांच्या ‘न्यायपत्रा’ने हमी
20
ढिगाऱ्याखाली कोणी उरले नाही, काम थांबले; महापालिका आयुक्तांची माहिती

Sharad Pawar : पावसातला सह्याद्री !

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2020 6:14 AM

Sharad Pawar Birthday : शरदचंद्रजी पवार साहेब... यांच्या सातारा येथील पावसातील ऐतिहासिक सभेच्या अनुषंगाने पुस्तक येत आहे, ही आनंदाची बाब आहे. महाराष्ट्राच्या राजकीय व सामाजिक जीवनातील एक महत्त्वाचा दस्तावेज यानिमित्ताने लोकांना वाचायला मिळणार आहे.

श्रीनिवास पाटील, खासदार((भा. प्र. से निवृत्त) माजी राज्यपाल सिक्किम)

वयाच्या 3७ व्या वर्षी सर्वात तरुण मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राची राज्यकारभाराची सूत्रे ज्यांनी स्वीकारली ते आमचे ‘साहेब’ चारवेळा कठीण प्रसंगी महाराष्ट्राचा कारभार सांभाळण्यासाठी पदारूढ झाले. कठोर प्रशासक सुसंस्कृत व्यक्तिमत्त्व, पुलोद सरकारचे मुख्यमंत्री म्हणून कारभाराला सुरुवात झाली ती मुंबईत पावसाळी अधिवेशन काळात. वेगवेगळ्या पक्षांंचे चार-पाच सहकारी, कोणालाच विधिमंडळात मंत्री म्हणून पूर्वीचा अनुभव नव्हता, प्रश्नाची उत्तरे पहिला पूर्ण आठवडा एकट्यानेच साहेबांनी समर्थपणे दिली. आबासाहेब खासदार किसनवीर आणि खासदार आबासाहेब कुलकर्णी प्रेक्षकांच्या गॅलरीत दिवसभर या तरुणाच्या कामाचा उरक,  प्रश्नांची अचूक उत्तरे, विरोधकांना नम्र उत्तराने नामोहरम करण्याचे कसब, अभ्यासू समयसूचक सडेतोड विवेचन आणि स्वकीय आमदारांना सांभाळण्याचे कौशल्य ज्यांनी दाखविले त्या साहेबांचे कौतुक रोज दोन ‘आबासाहेब’ दिवंगत यशवंतराव चव्हाण यांना दिल्लीला फोन करून कळवित असत. अचूक वेळ म्हणजेच १० वाजून १० मिनिटे दाखवणारे गजराचे घड्याळ ज्यांनी चिन्ह म्हणून निवडले त्यांना राष्ट्र समजते आणि ‘टाईमिंग’ जमतेच. अचूक निर्णय घेऊनच जनमाणसात जे घोषणांचा व त्यांच्या पूर्ततेचा गजर करवतात, असे मराठी जनतेच्या मनात घर केलेले खरे लोकनेते,  ‘पावसातला सह्याद्री’ म्हणून लोकांच्या प्रसंशेला पात्र ठरलेले दूरदृष्टीचे आमचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब... यांच्या सातारा येथील पावसातील ऐतिहासिक सभेच्या अनुषंगाने पुस्तक येत आहे, ही आनंदाची बाब आहे. महाराष्ट्राच्या राजकीय व सामाजिक जीवनातील एक महत्त्वाचा दस्तावेज यानिमित्ताने लोकांना वाचायला मिळणार आहे.

पवार साहेबांच्या बाबतीत खूप काही लिहिलं गेलंय, यापुढेही लिहिलं जाईल. वेधशाळेचा अंदाज बराच वेळा खोटा ठरतो व बराच वेळा खरा ठरत नाही. वारा कसा फिरेल किंवा कसा फिरवावा, याची खात्री व कसब साहेबांना नेमके आहे. अनेक सामाजिक-राजकीय आंदोलनाच्या वाऱ्याला अंगावर घेऊन जे झेपावतात. शरदचंद्र पवार साहेब उजव्या हाताचा वापर करून अनेक गरजूंना भरभरून देतात; पण त्यांच्याच डाव्या हाताला ते दान कधीच माहीत होऊ देत नाहीत. किती दिले उजव्या हाताने याची गणती नाही. सगळ्यांचे म्हणणे आणि टिकाटिपण्णी ते डाव्या कानाने ऐकून मनात साठवितात आणि वेळ येताच सेकंदाच्या आत बैठकीत त्यावरचे आपले मत ठामपणे मांडतात व जाहीर सभांत ठणकावून सांगतात देखील... तो आमचा खणखणीत आवाज म्हणजे, शरदचंद्रजी पवार साहेब...गडगडणाऱ्या पावसात अचानक हवेचा जोर वाढतो, ढगांची नभात दाटी होते, असा वळवाचा जोरदार, धुवाँधार भिजणाऱ्याला आनंद देणारा आणि उकाड्याने हैराण झालेल्यांना भिजवून गार करणारा हवाहवासा पाऊस म्हणजे आमचे साहेब शरदचंद्रजी पवार. साहेबांनी १८ ऑक्टोबर २०१९ रोजी मराठा समाजाच्या राजधानीत अर्थात साताऱ्यात इतिहास रचला. थेंबांनी दिवस मावळता-मावळता सुरू झालेला आमचा जाणता राजा व्यासपीठावर जाऊन उभा राहून लोकांना अभिवादन करीत असतानाच, तालावर पडघम वाजावे आणि ढोलांनी त्याला जोरदार साथ द्यावी, तसा जोरदार पाऊस आला. तो नित्यनियमाचा मोसमी पाऊस नव्हता तर सह्याद्रीचे बळ वाढविणारा होता. छत्र्या आणल्याच नव्हत्या म्हणून बसायला दिलेल्या खुर्च्या डोक्यावर घेऊन सह्याद्रीच्या वाघाची डरकाळी ऐकताना भान विसरलेला श्रोता चिखलात उभा राहून त्यांना अभूतपूर्व अशी साथ देत होता. जोरदार पाऊस पडतोय; पण त्यातूनही चेहऱ्यावर पडणाऱ्या बोराएवढ्या थेंबांनी भिजलेला चेहरा अशा स्थितीत, एका हाताने खुर्ची सावरत तर दुसऱ्या हाताने चेहऱ्यावरील पाणी पुसणारा श्रोता... समोर पावसात उभा असलेल्या आपल्या नेत्याचे भाषण ऐकत असताना समोरची जनताही प्रचंड अशी भावूक झाली होती. मलाही पवार साहेबांच्या डाव्या हाताला त्याच व्यासपीठावर उभा राहून त्यांचे शब्द उमेदीने ऐकता आले, हे माझे भाग्यच... पवार साहेबांच्या रुपाने हा ‘पावसातला सह्याद्री’ दिल्लीच्या दिशेने तालकटोरा मैदानावर मुक्काम ठोकायला निघाला आहे. त्यांना खूप-खूप शुभेच्छा...!जय शिवराय, जय जवान, जय किसान..

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारShrinivas Patilश्रीनिवास पाटील