शहरं
Join us  
Trending Stories
1
नरेंद्र मोदींनी 'हा' जावईशोध कुठून लावला?; शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला
2
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
3
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
4
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
5
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
6
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
7
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
8
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
9
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
10
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
11
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
12
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
13
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
14
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
15
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
16
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
17
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
18
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
19
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
20
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र

एकेकाळी गांधी कुटुंबाला म्हटलं होतं देशाची 'फर्स्ट फॅमिली'; आता दोष देत चाको यांनी दिला राजीनामा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2021 4:51 PM

केरळच्या निवडणुकांपूर्वी काँग्रेसला मोठा धक्का

ठळक मुद्देचाको यांनी एकेकाळी गांधी कुटुंबीयांची केली होती खुप स्तुतीकेरळच्या निवडणुकांपूर्वी काँग्रेसला मोठा धक्का

केरळमध्ये विधानसभा निवडणुकांपूर्वी काँग्रेसला मोठा झटका बसला आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि गांधी कुटुंबीयांचे निकटवर्तीय समजले जाणारे पीसी चाको यांनी राजीनामा दिला आहे. चाको यांनी बुधवारी आपल्या राजीनाम्याची घोषणा केली. चाको यांनी पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना आपला राजीनामा दिल्याचं वृत्त एएनआयनं दिलं आहे. दरम्यान, केरळमध्ये पक्ष दोन भागांमध्ये विभागला गेला आहे. तसंच याबद्दल पक्ष नेतृत्वाला दखल घेण्यास सांगून आपण थकलो असल्याचं चाको म्हणाले. "केरळमध्ये काँग्रेस पक्ष कमी होत आहे आणि पक्ष नेतृत्व त्याकडे शांतपणे पाहत आहे," असं चाको म्हणाले. चाको हे तेच नेते आहेत ज्यांनी दोन वर्षांपूर्वी गांधी कुटुंब हे देशातील पहिलं कुटुंब असल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर त्यांच्या या वक्तव्यावर अनेकांनी टीकाही केली होती. "मी केरळमधून येतो ज्या ठिकाणी काँग्रेससारखा कोणताही पक्ष नाही. तिकडे दोन पक्ष आहेत. काँग्रेस (I) आणि काँग्रेस (A). या दोन्ही पक्षांची एक समन्वय समिती आहे जी KPCC प्रमाणे काम करते. केरळमध्ये आता महत्त्वाच्या निवडणुका पार पडणार आहेत. लोकांना काँग्रेस हवी आहे. परंतु ज्येष्ठ नेत्यांकडून गटबाजी केली जात आहे. मी पक्ष नेतृत्वाला याची कल्पना दिली आणि हे सर्व संपवण्याची विनंती केली. परंतु पक्ष नेतृत्व दोन्ही गटांच्या प्रस्तावांना सहमती देत आहे," अंसं ते म्हणाले. एकेकाळी गांधी कुटुंबाला म्हटलं होतं फर्स्ट फॅमिलीदोन वर्षांपूर्वी चाको यांनी गांधी कुटुंबाला देशाची फर्स्ट फॅमिली असं संबोधलं होतं. "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे देशाच्या पहिल्या कुटुंबाबद्दल नकारात्मक विचार आहेत. ते खरंच भारतातील पहिलं कुटुंब आहे. भारत त्यांचा आभारी आहे. भारत आज जो काही आहे तो पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या योजना आणि नेतृत्वांमुळेच आहे," असं ते म्हणाले होते.विधानसभेच्या निवडणुकाकेरळममध्ये ६ एप्रिलला एकाच टप्प्यात निवडणुका पार पडणार आहेत. तसंच या निवडणुकांचे निकाल २ मे रोजी घोषित केले जातील. यापूर्वी मागील आठवड्यात राहुल गांधींच्या वायनाड या क्षेत्रातील ४ नेत्यांनी राजीनामा दिला होता.

टॅग्स :congressकाँग्रेसSonia Gandhiसोनिया गांधीRahul Gandhiराहुल गांधीKeralaकेरळKerala Assembly Elections 2021केरळ विधानसभा निवडणूक २०२१