Sanjay Raut: संजय राऊतांची राहुल गांधींसोबत बैठक; नेमकं कशावर चर्चा झाली? राऊतांनी सांगितलं...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2021 21:41 IST2021-08-02T21:41:00+5:302021-08-02T21:41:40+5:30

Sanjay Raut: शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी आज नवी दिल्लीत काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली.

Sanjay Raut meeting with Rahul Gandhi in navi delhi | Sanjay Raut: संजय राऊतांची राहुल गांधींसोबत बैठक; नेमकं कशावर चर्चा झाली? राऊतांनी सांगितलं...

Sanjay Raut: संजय राऊतांची राहुल गांधींसोबत बैठक; नेमकं कशावर चर्चा झाली? राऊतांनी सांगितलं...

Sanjay Raut: शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी आज नवी दिल्लीत काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये बराच वेळ चर्चा झाली. या भेटीची माहिती खुद्द संजय राऊत यांनीच त्यांच्या ट्विटर हँडलवरून दिली आहे.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याशी आज भेट झाली असून त्यांच्यासोबत महाराष्ट्र तसेच राष्ट्रीय राजकारणावर सविस्तर चर्चा झाल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. यासोबत राज्य सरकारच्या कामाबाबत राहुल गांधी यांनी समाधान व्यक्त केल्याचंही राऊत यांनी नमूद केलं आहे. विशेष म्हणजे राहुल गांधी यांनी यावेळी शिवसेनेची जडणघडण आणि एकंदर कार्यपद्धतीची माहिती त्यांनी जाणून घेतल्याचं राऊत यांनी म्हटलं आहे. 

Web Title: Sanjay Raut meeting with Rahul Gandhi in navi delhi