शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
3
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
4
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
5
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
6
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
7
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
8
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
9
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
10
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
11
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
12
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
13
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
14
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
15
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
16
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
17
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
18
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
19
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
20
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू

Sachin Vaze: गृहमंत्री अनिल देशमुखांच्या राजीनाम्याची भाजपाची मागणी; जयंत पाटलांनी दिलं चोख उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2021 16:28 IST

BJP Demand for Anil Deshmukh Resignation in Sachin Vaze Case:शरद पवार हे जाणते राजे म्हणून ओळखले जातात.  त्यांचा पक्षाचा गृहमंत्री गुन्हेगार प्रवृत्तीच्या माणसाला पाठिशी घालण्याचा प्रयत्न करत असेल तर ते खेदजनक आहे

ठळक मुद्देमुंबई पोलिसांची नाचक्की करणारे कोण? सचिन वाझे यांना पाठिशी घालणाऱ्या गृहमंत्री अनिल देशमुखांचा राजीनामा घ्यावापक्षाचा गृहमंत्री गुन्हेगार प्रवृत्तीच्या माणसाला पाठिशी घालण्याचा प्रयत्न करत असेल तर ते खेदजनक आहेसचिन वाझे प्रकरणात गृहमंत्री अनिल देशमुखांनीही कोणतीही चूक केली नाही

मुंबई – उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी सापडली होती, या प्रकरणाचा तपास NIA कडून केला जात आहे, यात पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्यावर गंभीर आरोप असून त्यांना अटक करण्यात आली आहे, आता या प्रकरणात गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी केली आहे.(BJP MLC Prasad Lad Demand for Anil Deshmukh Resigination in Sachin Vaze Case)

याबाबत प्रसाद लाड म्हणाले की, सचिन वाझे प्रकरणात रोज नवीन नवीन गोष्टी बाहेर येतात, या प्रकरणात दोन डीसीपींची नावेही बाहेर पडणार आहे, या प्रकारामुळे मुंबई पोलिसांची नाचक्की होत आहे, मुंबई पोलिसांची नाचक्की करणारे कोण? सचिन वाझे यांना पाठिशी घालणाऱ्या गृहमंत्री अनिल देशमुखांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी विधान परिषदेत केली होती, जोपर्यंत गृहमंत्री राजीनामा देत नाही तोवर या प्रकरणाचा छडा लागणार नाही असं त्यांनी सांगितले आहे.

तसेच शरद पवार हे जाणते राजे म्हणून ओळखले जातात.  त्यांचा पक्षाचा गृहमंत्री गुन्हेगार प्रवृत्तीच्या माणसाला पाठिशी घालण्याचा प्रयत्न करत असेल तर ते खेदजनक आहे, त्यामुळे गृहमंत्री अनिल देशमुखांचा राजीनामा घेतला पाहिजे किंवा नैतिक जबाबदारी स्वीकारून गृहमंत्री अनिल देशमुखांनी स्वत:हून राजीनामा दिला पाहिजे अशी मागणी भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी केली.

गृहमंत्र्याच्या राजीनाम्याची गरज नाही – जयंत पाटील

सचिन वाझे प्रकरणात गृहमंत्री अनिल देशमुखांनीही कोणतीही चूक केली नाही, सचिन वाझे प्रकरणाचा तपास NIA करत आहेत. सरकार कोणालाही पाठिशी घालत नाही, जे कोणी चुकीचे वागले असतील तर त्यांना शिक्षा होईल असं सांगत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अनिल देशमुखांची पाठराखण केली आहे. अनिल देशमुखांच्या राजीनाम्याची गरज नाही असं त्यांनी स्पष्ट सांगितलं आहे. . (NCP state president Jayant Patil has Supported Home Minister Anil Deshmukh)

मंत्रिमंडळ फेरबदल नाही

मंत्रिमंडळात खांदेपालट करण्याची कोणतीही चर्चा नाही, कोणी कितीही संकेत दिले तरी ते राष्ट्रवादी पक्षांतर्गंत मंत्रिमंडळ खातेबदलावर चर्चा नाही असं सांगत जयंत पाटील यांनी मंत्रिमंडळ फेरबदलाची चर्चा फेटाळली.

टॅग्स :sachin Vazeसचिन वाझेMansukh Hirenमनसुख हिरणHome Ministryगृह मंत्रालयAnil Deshmukhअनिल देशमुखJayant Patilजयंत पाटीलSharad Pawarशरद पवारUddhav Thackerayउद्धव ठाकरेBJPभाजपाPrasad Ladप्रसाद लाड