"उघड डोळे बघ नीट केशवा...", उपाध्येंना सचिन सावंतांचे काव्यात्मक शैलीत उत्तर 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2021 03:16 PM2021-01-07T15:16:19+5:302021-01-07T15:17:13+5:30

Sachin sawant : सचिन सावंत यांनी हे सरकार अजब नसून, गजब असल्याचा दावा केला आहे.  

Sachin sawant and keshav upadhye criticism to each other | "उघड डोळे बघ नीट केशवा...", उपाध्येंना सचिन सावंतांचे काव्यात्मक शैलीत उत्तर 

"उघड डोळे बघ नीट केशवा...", उपाध्येंना सचिन सावंतांचे काव्यात्मक शैलीत उत्तर 

Next
ठळक मुद्देयाआधी केशव उपाध्ये यांनी सरकार कंत्राटदार, आणि विकासक धार्जिणे असल्याची टीका केली आहे.

मुंबई : राज्यातील बांधकाम विकासकांना प्रीमियममध्ये 50% सवलत देण्याचा प्रस्ताव मंजूर केल्यानंतर महाविकास आघाडीवर भाजपाकडून टीका होत आहे. भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ट्विटरवरून 'उद्धवा अजब तुझे सरकार' म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारवर टीका केली.

यावर काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी उघड डोळे बघ नीट केशवा, तुझा शब्दच्छल आहे फसवा, समाधानी आज राज्यातला बापडा, म्हणतोय, महाविकास आघाडी ‘छे आपडा’ असे सांगत केशव उपाध्येंना उत्तर दिले आहे. तसेच, ट्विटरच्या माध्यामातून सचिन सावंत यांनी हे सरकार अजब नसून, गजब असल्याचा दावा केला आहे.  

"उघड डोळे बघ नीट केशवा,
तुझा शब्दच्छल आहे फसवा
अरे अजब नव्हे, गजब आहे हे सरकार,
नाठाळांच्या माथी धोंडा अन्
जनतेला मणिहार
मोदी कृपेने करोडो झाले बेरोजगार
भाजपासाठी बिल्डर असे मलिदा, आमच्यासाठी बांधकाम क्षेत्र जनतेला रोजगार
समाधानी आज राज्यातला बापडा,
म्हणतोय, मविआ छे आपडा", असे ट्विट सचिन सावंत यांनी केले आहे.

दरम्यान, याआधी केशव उपाध्ये यांनी सरकार कंत्राटदार, आणि विकासक धार्जिणे असल्याची टीका केली आहे. राज्यातील नागरिकांच्या नशिबी कोंडा आला असून कंत्राटदारांना मात्र मणीहार घातला जात आहे, असे केशव उपाध्ये यांनी काव्यमय शैलीत म्हटले आहे. 'उद्धवा अजब तुझे सरकार’ असे म्हणत त्यांनी मंत्र्यांच्या गाड्यांना सरकार पैसे देते. कंत्राटदारांची बिलं द्यायला सरकारकडे पैसै आहेत. मात्र, मुंबईकरांना मालमत्ता करात सवलत मिळत नाही. वेगवेगळ्या सामाजिक घटकांना मदत मिळत नसल्याची टीका केली आहे.

Web Title: Sachin sawant and keshav upadhye criticism to each other

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.