शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
5
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
6
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
7
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
8
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
9
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
10
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
11
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
12
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
13
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
14
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
15
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
16
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
17
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

१०० कोटी रुपये म्हणजे काही गोळ्या, बिस्किटं नाहीत, पडळकरांचा शशिकांत शिंदेंना टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2021 23:25 IST

Politics News : भाजपाचे नेते गोपिचंद पडळकर यांनी १०० कोटींच्या ऑफरच्या दाव्यावरून शशिकांत शिंदे यांना टोला लगावला आहे.

पिंपरी-चिंचवड - भाजपाकडून पक्षात प्रवेश करण्यासाठी आपल्याला १०० कोटी रुपये आणि मंत्रिपदाची ऑफर देण्याच आली होती, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शशिकांत शिंदे यांनी केल्याने राज्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. या दाव्यावरून भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधून उलट-सुलट प्रतिक्रिया उमटत आहेत. दरम्यान, भाजपाचे नेते गोपिचंद पडळकर यांनी १०० कोटींच्या ऑफरच्या दाव्यावरून शशिकांत शिंदे यांना टोला लगावला आहे.शशिकांत शिंदेंनी केलेल्या दाव्यावर प्रतिक्रिया देताना पडळकर म्हणाले की, काही लोकांकडून बोलून बडबड करून पक्षातील स्थान भक्कम करायचा प्रयत्न सुरू आहे. हे निवडणूक हरलेले आहे. यांना कोण कशासाठी १०० कोटी रुपये देईल. १०० कोटी म्हणजे काय गोळ्या बिस्किटं नाहीत. यांना घोटाळे करायची सवय झाली आहे. त्यामुळे त्यांच्या डोक्यात मोठे आकडे येतात, असा टोल पडळकर यांनी लगावला.राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार शशिकांत शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना आपल्याला भाजपाकडून पक्षात प्रवेश करण्याची ऑफर आली होती. त्यावेळी मला १०० कोटी रुपये तसेच मंत्रिपद देण्याची ऑफर दिली गेली होती. मात्र मी पक्ष सोडला नाही, असा दावा केला होता.दरम्यान, भाजपाची सत्ता असताना काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधून भाजपामध्ये मोठ्या प्रमाणात पक्षांतर झाले होते. मात्र प्रत्यक्षात निवडणूक झाल्यानंतर राज्यातील राजकीय समीकरणे बदलल्याने भाजपाला विरोधात बसावे लागले आहे. त्यामुळे भाजपात गेलेल्यांची निराशा झाली आहे.

 

 

टॅग्स :Shashikant Shindeशशिकांत शिंदेGopichand Padalkarगोपीचंद पडळकरNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपाPoliticsराजकारण