शहरं
Join us  
Trending Stories
1
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवार स्पष्टच बोलले
2
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
3
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
4
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
5
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
6
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
8
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
9
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
10
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
11
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
12
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
13
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
14
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
15
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
16
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
17
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
18
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
19
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
20
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका

घंटा बडवा, थाळ्या वाजवा, इतकेच तुमचे हिंदुत्व, उद्धव ठाकरेंचा भाजपाला टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2020 7:52 AM

Uddhav Thackeray : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचा दसरा मेळावा यंदा शिवाजी पार्कजवळील सावरकर राष्ट्रीय स्मारकात घेण्यात आला. उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रिपद स्वीकारल्यानंतरचा हा पहिला दसरा मेळावा  होता.

मुंबई -  मंदिर आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री  उद्धव ठाकरे यांनी रविवारी भाजपचा खरपूस समाचारघेतला. माय मरो पण गाय वाचो, असं आमचं हिंदुत्व नाही. इथं गोमाता आणि शेजारच्या गोव्यात खाता. असं आमचं हिंदुत्व नाही. पणघंटा बडवा, थाळ्या वाजवा इतकंच तुमचं हिंदुत्व आहे. फक्त काळ्या टोप्या घालू नका, त्याखाली मेंदू असेल तर  विचार करा, असा हल्लाबोल ठाकरे  यांनी केला.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचा दसरा मेळावा यंदा शिवाजी पार्कजवळील सावरकर राष्ट्रीय स्मारकात घेण्यात आला. उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रिपदस्वीकारल्यानंतरचा हा पहिला दसरा मेळावा  होता. शिवाय, कोरोनासह राज्यात विविध  मुद्यांवरून सरू असलेल्या राजकी्य  घमासानाबाबत ठाकरे काय  भूमिका घेतात, याबाबत उत्सुकता होती. राज्यपाल-मुख्यमंत्री संघर्ष, जीएसटी, बिहारचं राजकारण, सुशांतसिंह मृत्यू प्रकरण, कंगना रनौतवरूननिर्माण झालेला वादंग अशा विविध मुद्द्यांवर त्यांनी अत्यंत आक्रमक शैलीत समाचार घेतला. तर, मराठा, धनगर, ओबीसी आरक्षणाबाबतही नागरिकांना आश्वस्त  करण्याचा प्रयत्न केला. मोहन भागवत  यांनी नागपुरातील आपल भाषणात हिंदुत्वाबाबत भ्रम निर्माण केला जात आहे, पूजा अर्चेपुरता हिंदूधर्म सिमीत नाही,  राजकीय विरोधक म्हणजे शत्रू नाहीत. त्यामुळे राजकारणात विवेक बाळगावा.  असे विचार मांडले. तोच  धागा पकडत ठाकरे म्हणाले, संघाची  राजकीय संघटना असलेल्या भाजप आणि काळी टोपी घालणा-यांनी तरी तो विचार समजून घ्यायला हवा. शिवसेनाप्रमुखांनी  जे हिंदुत्व आम्हाला सांगितले तिच विचार आजसरसंघचालक मांडत आहेत. त्यामुळे  काळ्या टोपीखाली मेंदू असेल तर  विचार करावा आणि त्यानंतरच तुम्ही सेक्युलर झालात का, वगैरे खर्डेघाशीकरावी, असा टोला मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांचे नाव न घेता लगावला.  

नितीश कुमारांनी हिंदुत्वाची लस घेतली का?एनडीएतून सगळे बाहेर पडले. महाराष्ट्रात फक्त शिवसेनेविरोधात  एका नवख्या पक्षाचे उेमदवार उभे केले गेले. तसाच डाव बिहारातखेळला जात आहे. नितीश कुमार यांनी सावध व्हायला हवे. नितीश कुमारच मुख्यमंत्री  असतील, असं भाजपावाले आता म्हणताहेत. आता कुमारांनीहिंदुत्वाची लस घेतली की भाजप सेक्युलर झाली, असा प्रश्न ठाकरे यांनी केला.

 

 

 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेना