शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

"होळीवर बंदी अन् शब-ए-बारातला परवानगी; राज्यात सरकार उद्धव ठाकरेंचं आहे की, मुस्लिम लीगचं?"

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2021 4:43 PM

bjp leaders atul bhatkhalkar, ram kadam slams thackeray govt : सार्वजनिक ठिकाणी सण साजरा करण्यावर सरकारने निर्बंध घातल्यामुळे याविरोधात भाजपाने आक्रमक पवित्रा घेतला आहे.

ठळक मुद्देहोळीवर बंदी अन् शब-ए-बारातला परवानगी, हिंदू विरोधी ठाकरे सरकारचा निषेध, अशी टीका अतुल भातखळकर यांनी केली.

मुंबई: महाराष्ट्रात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्य सरकारने होळी (Holi 2021) आणि धुलीवंदनाच्या सणावर लादलेल्या निर्बंधांमुळे राजकीय वातावरण तापले आहे. सार्वजनिक ठिकाणी सण साजरा करण्यावर सरकारने निर्बंध घातल्यामुळे याविरोधात भाजपाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. यावरून भाजपाचे नेते अतुल भातखळकर, राम कदम यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. (restrictions for holi dhulivandan celebration; bjp leaders atul bhatkhalkar, ram kadam slams thackeray govt)

होळीवर बंदी अन् शब-ए-बारातला परवानगी, हिंदू विरोधी ठाकरे सरकारचा निषेध, अशी टीका अतुल भातखळकर यांनी केली. तर हिंदू विरोधी ठाकरे सरकार म्हणतंय होळी घराच्या दारासमोर पेटवायची नाही. तर मग काय घरात पेटवायची? असा सवाल राम कदम यांनी केला आहे. त्यामुळे होळी आणि धूलिवंदनाच्या सणावरून पुन्हा एकदा भाजपा-शिवसेना आमने-सामने आली आहे. 

भाजपाचे आमदार अतुल भातखळकर यांनी ट्विटरवर एक व्हीडिओ शेअर करत यासंदर्भात भाष्य केले आहे. शब-ए-बारातला नियमांसह परवानगी पण होळीच्या सणावर कडक निर्बंध, ठाकरे सरकारच्या या हिंदू विरोधी फतव्याला भारतीय जनता पार्टीचा पूर्ण विरोध असून मुंबईतील हिंदू बांधवांनी कोरोनाचे सर्व नियम पाळत आपापल्या श्रद्धेनुसार होळी साजरी करावी, असे आवाहन अतुल भातखळकर यांनी केले.

याचबरोबर, गेल्या वर्षभरापासून कोरोनाचे कारण पुढे करत हिंदू सणांवर निर्बंध लादणाऱ्या ठाकरे सरकारने इतर धर्मियांच्या उत्सवांना मात्र खुली सूट दिली आहे. ठाकरे सरकारच्या अशा हिंदू विरोधी कृत्यांचा जाहीर निषेध करून आम्ही होळी साजरी करणारचं, ठाकरे सरकार मध्ये जर हिम्मत असेल तर त्यांनी आमच्यावर कारवाई करून दाखवावी, असे आव्हानही अतुल भातखळकर यांनी दिले.

"महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंचं सरकार आहे की मुस्लिम लीगचं? शब्बे बारातला परवानगी देऊन ठाकरे सरकारनं होळीवर बंदी घातली आहे. हा हिंदू विरोध खपवून घेणार नाही. हिंदूनों जनाब सेनेचा फतवा धाब्यावर बसवा. सोशल डिस्टन्सिगचे नियम पाळून होळी दणक्यात साजरी करा. चिल्लर औरंगजेबी मानसिकतेचा धिक्कार," असेही ट्विट करत अतुल भातखळकर यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे.

घरात होळी पेटवायची का?"हिंदू विरोधी ठाकरे सरकार म्हणतंय होळी घराच्या दारासमोर पेटवायची नाही. तर मग काय घरात पेटवायची? लोक रंगपंचमी समजू शकतात गर्दी होईल. एकमेकांना स्पर्श होईल मात्र नियमांचं पालन करत होळी पेटवली आणि हिंदू बांधवांनी आपला सण साजरा केला, तर त्याला ठाकरे सरकारचा विरोध का? अन्य धर्मांना तातडीनं परवानगी दिली जाते ते काय कोविडचे नातेवाईक लागतात की वसुली सरकारचे?", असा सवाल करत भाजपाचे आमदार राम कदम यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.

होळीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे नागरिकांना आवाहनमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील नागरिकांना होळीनिमित्त आवाहन केले आहे. "परस्परांची आणि पर्यावरणाची काळजी घेत येणारं होळी, धूलिवंदन आणि रंगपंचमी हे सण साधेपणानं साजरे करावेत. सण-उत्सवाचा आनंद हा परस्परांविषयी व निसर्गाविषयी आदर वाढवण्यासाठी असतो. या सणांकडून प्रेरणा घेऊन करोना विषाणूला रोखण्याच्या नियमांचं काटेकोर पालन करूया", असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला केले आहे. याशिवाय, होळी, धुळवडीच्या हार्दिक शुभेच्छाही त्यांनी यावेळी दिल्या आहेत. 

टॅग्स :HoliहोळीUddhav Thackerayउद्धव ठाकरेAtul Bhatkalkarअतुल भातखळकरRam Kadamराम कदमBJPभाजपा