आरक्षणाचे अस्त्र भाजपावरच उलटेल - तेजस्वी यादव

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2019 05:44 IST2019-01-24T05:44:30+5:302019-01-24T05:44:57+5:30

आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना मोदी सरकारने दिलेले दहा टक्के आरक्षणाचे अस्त्र भाजपाच्याच अंगावर उलटेल, अशी टीका राष्ट्रीय जनता दलाचे नेते व लालूप्रसाद यादव यांचे पुत्र तेजस्वी यादव यांनी केली.

Resistance vetoed on BJP - Stunning Yadav | आरक्षणाचे अस्त्र भाजपावरच उलटेल - तेजस्वी यादव

आरक्षणाचे अस्त्र भाजपावरच उलटेल - तेजस्वी यादव

नवी दिल्ली : आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना मोदी सरकारने दिलेले दहा टक्के आरक्षणाचे अस्त्र भाजपाच्याच अंगावर उलटेल, अशी टीका राष्ट्रीय जनता दलाचे नेते व लालूप्रसाद यादव यांचे पुत्र तेजस्वी यादव यांनी केली. भाजपाने फसविल्याची जाणीव बहुजन समाजामध्ये प्रबळ झाल्याचेही त्यांनी सांगितले.
ते म्हणाले की, नोटाबंदीप्रमाणेच हाही निर्णय सरकारने अत्यंत घाईगर्दीत घेतला. आरक्षण म्हणजे गरिबी निर्मूलनाचा कार्यक्रम नव्हे. हे आरक्षण देण्याआधी सरकारने कोणतेही सामाजिक, आर्थिक सर्वेक्षण केले नाही किंवा आयोग नेमून त्याचा अहवाल मागविला नाही. अशा निर्णयांसाठी सबळ आकडेवारीची गरज असते. पण ती गरज भाजपाला वाटली नाही.

Web Title: Resistance vetoed on BJP - Stunning Yadav