आदित्यनाथांवर देशद्रोहाचा गुन्हा नोंदवा - अशोक गेहलोत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2019 04:35 IST2019-04-15T04:34:03+5:302019-04-15T04:35:05+5:30

भारतीय लष्कर ही मोदींची सेना आहे असे वक्तव्य करणारे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी केली.

Report of sedition against Adityanath: Ashok Gehlot | आदित्यनाथांवर देशद्रोहाचा गुन्हा नोंदवा - अशोक गेहलोत

आदित्यनाथांवर देशद्रोहाचा गुन्हा नोंदवा - अशोक गेहलोत

जयपूर : भारतीय लष्कर ही मोदींची सेना आहे असे वक्तव्य करणारे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी केली.
ते म्हणाले की, मोदी सरकारवर टीका करणाऱ्यावर देशद्रोही असा शिक्का मारला जातो. मात्र भारतीय लष्करालाच मोदींची सेना ठरविणारी व्यक्तीच खरेतर देशद्रोही आहे. भारतात लष्कराला राजकारणापासून अलग ठेवले आहे. पाकिस्तानात काहीवेळा लष्करशहांनी सत्ता ताब्यात घेतली होती. भारतात तशी स्थिती उद्भवू नये म्हणून दक्षता घ्यायला हवी.

Web Title: Report of sedition against Adityanath: Ashok Gehlot