Raosaheb Danve's father is in Delhi, my father is not a rented; Uddhav Thackeray's blow | रावसाहेब दानवेंचा बाप दिल्लीत, आहेराची पाकिटे घेऊन पळाला; उद्धव ठाकरेंचा घणाघात

रावसाहेब दानवेंचा बाप दिल्लीत, आहेराची पाकिटे घेऊन पळाला; उद्धव ठाकरेंचा घणाघात

देश संकटात आहे आणि भाजपा राजकारण करत आहे. कोरोना आहे, संकटं आहेत, जीएसटी नाही, पैसे येणार कुठून? आमचा जीएसटीचा निधी केंद्र सरकार का देत नाही. जवळपास ३८ हजार कोटी रुपये केंद्राकडे आहेत. जीएसटी सदोष असेल तर मोदींनी मागे घ्यावा आणि माफी मागावी, अशी टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. माझे काम पुढील महिन्यात तुमच्यापुढे ठेवणार असल्याचे ठाकरे यांनी सांगितले.

आज शिवसेनेचा दसरा मेळावा कोरोनामुळे 50 पदाधिकारी यांच्या उपस्थितीत ऑनलाईन घेण्यात आला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली.  तसेच आमच्यावर टीका करणाऱ्या रावसाहेब दानवेंचा बाप दिल्लीत असेल माझा बाप भाडोत्री नाही, अशा शब्दांत फटकारले. रावसाहेब दानवेंनी लग्न तुम्ही केले आणि बापाकडे मागताय असा सवाल केला होता. यावर ठाकरे यांनी समाचार घेतला. तुमचा बाप आहेराची पाकिटे घेऊन मोजतो असे सांगून गेला, त्याने ते पैसे खाल्ले का माहिती नाही, असा टोला लगावला.  मी आज मुख्यमंत्रीपदाचा मास्क काढून टाकलाय. मला संयमचा महत्त्व कळतं. महाराष्टाच्या हिताच्या आड येणाऱ्यांच्या छाताडावर गुढी पाडवा साजरा करेन. वाघाची अवलाद आहे, डिवचाल तर पस्तवाल असा इशारा त्यांनी भाजपाला दिला. 


घंटा बडवा थाळ्या बडवा हे तुमचं हिंदुत्व, आमचं हिंदुत्व असलं नाही, हिंदुत्व हे आमचं राष्ट्रीयत्व. बाबरी वेळी शेपट्या घालणारे हिंदुत्त्वावर बोलत आहेत. आम्हाला विचारत आहेत तुमचे हिंदुत्व कुठे गेले? इथे गाय म्हणजे माता, पलिकडे जाऊन खाता . गोव्यात गोवंश बंदी का नाही. सरसंघचालकांकडून हिंदुत्व शिकून घ्या, असा सल्लाही त्यांनी भाजपाच्या नेत्यांना दिला. 


आमच्या अंगावरती येत आहात, महाराष्ट्र द्वेष पाहिल्यानंतर मी महाराष्ट्राच्या जनतेला आवाहन करतो, सावध रहा. आदित्य, ठाकरे कुटुंबावर चिखलफेक झाली हे भयंकर होतं. बिहारच्या सुपुत्रार चिखलफेक करणारे महाराष्ट्राच्या सुपुत्रावर चिखलफेक करतायेत. तुम्ही रातोरात झाडांची कत्तल करत होता, आम्ही ८०८ एकराचं जंगल वाचवलं, एक रुपया खर्च न करता मेट्रो कारशेड उभारतोय. बेडूक आणि त्याची पिल्लं वाघ पाहून ओरडत सुटलेत, असा टोला राणे कुटुंबाला लगावला.


केवळ पाडापाडी करण्यात भाजपा रस आहे, ही अराजकता आहे. विरोधक म्हणजे अहंकारी राजा आणि कळसुत्री बाहुल्या आहेत. महाराष्ट्र आता कळसुत्री बाहुल्यांचा खेळ होणार नाही, असा इशारा देताना सरकार पाडून दाखवा असा इशाराही उद्धव ठाकरेंनी दिला. 

Web Title: Raosaheb Danve's father is in Delhi, my father is not a rented; Uddhav Thackeray's blow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.