शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत उत्तर द्या, अन्यथा...; विजय वडेट्टीवार यांना न्यायालयाचा अवमान केल्याची नोटीस
2
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
3
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
4
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
5
४,४,४,४,४,४,६,४,६,६! जॅक फ्रेझर मॅकगर्कची वादळी फिफ्टी; आर अश्विनने RR मिळवून दिली पहिली विकेट 
6
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
7
रिषभची विकेट घेऊन युझवेंद्र चहलने इतिहास घडवला; IPL अन् ट्वेंटी-२०त पराक्रम करणारा पहिला भारतीय
8
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
9
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
10
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात ५४.०९ टक्के मतदान
11
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
12
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
13
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
14
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
15
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
16
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
17
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
18
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
19
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
20
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला

राजू शेट्टी यांची वाटचाल पुन्हा भाजपच्या दिशेने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 7:29 PM

Politics Bjp Raju Shetty Kolhapur : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांची वाटचाल पुन्हा भाजपच्या दिशेने सुरू असल्याचे त्यांनी अलीकडील काही दिवसांत घेतलेल्या भूमिकेवरून दिसत आहे. हातकणंगले लोकसभा मतदारसंघात त्यांना आगामी निवडणुकीत लढायचे असेल तर महाविकास आघाडीतून त्यांना संधी मिळणेच शक्य दिसत नाही.

ठळक मुद्देराजू शेट्टी यांची वाटचाल पुन्हा भाजपच्या दिशेने लोकसभेचे राजकारण : महाविकास आघाडीपासून दिवसेंदिवस दूर

विश्र्वास पाटीलकोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांची वाटचाल पुन्हा भाजपच्या दिशेने सुरू असल्याचे त्यांनी अलीकडील काही दिवसांत घेतलेल्या भूमिकेवरून दिसत आहे. हातकणंगले लोकसभा मतदारसंघात त्यांना आगामी निवडणुकीत लढायचे असेल तर महाविकास आघाडीतून त्यांना संधी मिळणेच शक्य दिसत नाही.

विधानपरिषदेच्या आमदारकीसाठीच्या यादीला राज्यपालांनी मंजुरी न दिल्याने लटकली आहे. त्यामुळे ते एकेक पाऊल महाविकास आघाडीपासून दूर जात असल्याचे दिसत आहे. आज महाराष्ट्रात ज्यांच्या मागे जनमत आहे, ज्यांची प्रतिमा चांगली आहे, असे ते एकमेव शेतकरी नेते आहेत. त्यामुळे त्यांच्या भूमिकेला कायमच महत्त्व राहिले आहे.कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक (गोकुळ) संघाच्या निवडणुकीत त्यांनी पारंपरिक भूमिका बदलून सत्तारूढ आघाडीस पाठिंबा दिला. गेली काही वर्षे ते ज्यांना दुधातील काळे बोके म्हणून हिणवत होते, दूध दरवाढीसाठी ज्यांच्या विरुद्ध संघर्ष करत होते, त्यांनाच पाठिंबा देऊन गोकुळच्या कामकाजाबद्दल त्यांनी प्रमाणपत्र देऊन टाकले आहे. त्यामुळे शेट्टी यांच्या बदललेल्या भूमिकेबद्दल तर्क-वितर्क लढविले जात आहेत परंतु गोकुळला पाठिंबा ही त्यांचा तत्कालिक निर्णय नसून तो लोकसभा निवडणुकीची पूर्वतयारी म्हणून त्याकडे पाहिले पाहिजे.

गेल्या निवडणुकीत दोन्ही काँग्रेसच्या पाठबळावर त्यांनी ही निवडणूक लढविली. ज्यांना आयुष्यभर चाबकाचे फटकारे देण्याची भाषा केली त्या साखर कारखानदारांच्या मांडीला मांडी लावून तुम्ही कसे बसला? अशा भूमिकेतील विरोधाभास तयार झाल्याने त्याचा फटका बसून त्यांचा पराभव झाला. तिथे शिवसेनेकडून धैर्यशील माने निवडून आले. त्यानंतरच्या घडामोडीत दोन्ही काँग्रेससह शिवसेनाही सत्तेत एकत्र आली. त्यामुळे जेव्हा केव्हा लोकसभा निवडणुका होतील तेव्हा विद्यमान खासदारांच्या जागा त्या-त्या पक्षाकडे राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या मतदारसंघात शेट्टी यांना उमेदवारी मिळणे दुरापास्त होणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांना विधानसभेच्या निवडणुकीत विधान परिषदेच्या एका जागेचा ह्यशब्दह्ण दिला होता. त्यानुसार राजू शेट्टी यांचे नाव महाविकास आघाडीकडून राज्यपालांकडे मंजुरीसाठी पाठविले; परंतु ते राजभवनात लटकले आहे. त्या अस्वस्थतेतून त्यांनी पंढरपूर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत स्वाभिमानीचा स्वतंत्र उमेदवार उभा केला. त्यानंतर त्यांनी एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात हारा नहीं हूँ मैं... बस, खेल समझ रहा था...! इसके बाद खेल भी मेरा होगा और खिलाडी भी मेरा..! असे ट्वीट करून आपण वेगळा विचार करत असल्याचे सुचित केले होते.

चारच दिवसांपूर्वी एकरकमी एफआरपी देण्याची पद्धत बदलण्याच्या हालचाली केंद्र सरकारकडून सुरू असताना त्यांनी तसे कराल तर राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळेल, अशी टीका केली होती. या प्रश्नांवर सरकारशी संघर्ष करण्याची त्यांची भूमिका आहे. या सगळ्या घडामोडी ते महाविकास आघाडीपासून दिवसेंदिवस बाजूला जात असल्याचे प्रत्यंतर आणून देणाऱ्या आहेत....भाजप ते भाजप वर्तुळ पूर्णगोकुळच्या निवडणुकीत सत्तारूढ आघाडीस पाठिंबा देण्यापूर्वी त्यांनी कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांच्या विरोधात घरफाळाप्रकरणी जाहीर टीका केली. त्यानंतर पालकमंत्री पाटील यांचे विरोधक असलेल्या महाडिक गटाला पूरक होईल, अशी भूमिका त्यांनी घेतली. आगामी निवडणुकीत ह्यस्वाभिमानीह्णच्या चिन्हावरच परंतु भाजपपुरस्कृत उमेदवार म्हणून ते रिंगणात येऊ शकतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे राजकारण संपविण्याच्या नादात त्यांची स्वत:ची खासदारकी गेली. दोन्ही काँग्रेसच्या सोबत जावून फायदा कमी व नुकसानच जास्त झाल्याने ते पुन्हा राज्याच्या राजकारणात भाजपसोबत जाण्याची चिन्हे आहेत तसे झाले तर त्यांचेही राजकीय भूमिका बदलण्याचे वर्तुळ पूर्ण होईल.

टॅग्स :PoliticsराजकारणRaju Shettyराजू शेट्टीkolhapurकोल्हापूरBJPभाजपाSwabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटना