शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाक अंतिम सामना: सूर्यकुमार पाकिस्तानी मंत्री मोहसिन नकवी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारणार?
2
IND vs PAK Final, Asia Cup 2025 Marathi : आज 'ऑपरेशन पाकिस्तान'! फायनलमध्ये भारतीय संघात दोन मोठे बदल होणार; अशी असेल प्लेइंग 11 
3
लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी स्वामी चैतन्यानंद यांना अटक; पोलिसांनी आग्र्यातून ताब्यात घेतले
4
केंद्रीय गृह मंत्रालयाने तामिळनाडूतील चेंगराचेंगरीचा अहवाल मागितला; अभिनेता विजयचीही चौकशी होणार
5
BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
6
आजचे राशीभविष्य, २८ सप्टेंबर २०२५: अचानक धनलाभ होईल; आनंददायी बातमी मिळेल
7
"एकेकाळी कौतुक करणारे लोक आज...", सलमान खानचा अप्रत्यक्षपणे अभिनव कश्यपवर निशाणा
8
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
9
स्वतःच्या पायावर धोंडा, अमेरिकेच्या व्हिसा धोरणावरून भयकंप; पुढे काय अन् निर्णयामागे काय? जाणून घ्या
10
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
11
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
12
कामाचा जास्त ताण घेता? हेल्थ कोण सांभाळणार? आतापासूनच घ्या 'या' गोष्टींची काळजी
13
सामान्य माणसाला न्याय हे बळकट लोकशाहीचे प्रतिक - सरन्यायाधीश भूषण गवई
14
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
15
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
16
२०३० पर्यंत मुंबई रेबिजमुक्त करणार; पालिकेचा संकल्प, जनजागृती करणार
17
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
18
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
19
सबकुछ मोहनलाल!'वानप्रस्थम्'मधील कथकली नर्तक ते 'दृश्यम'मधील सामान्य माणूस-अभिनयाचा हा आवाका कसा शक्य झाला?
20
बाबांचे पुस्तकप्रेम, आईची शिस्त अन् धैर्याची शिखरवारी! १३ वर्षांची धैर्या पोहोचली माउंट एलब्रुसवर

ईडीमधील अधिकारी राजेश्वर सिंह भाजपाच्या वाटेवर, निवृत्तीसाठी दिला अर्ज, उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक लढवण्याची शक्यता 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2021 10:30 IST

Rajeshwar Singh News Update: राजेश्वर सिंह हे सध्या लखनौमध्ये ईडीच्या विभागीय कार्यालयात संयुक्त संचालक म्हणून काम पाहत आहेत. बी.टेक, पोलीस, मानवाधिकार आणि सामाजिक न्याय या विषयांमध्ये त्यांनी पीएचडी केली आहे.

नवी दिल्ली - ईडीचे अधिकारी राजेश्वर सिंह यांनी सरकारी सेवेमधून निवृत्तीसाठी अर्ज दाखल केला आहे. ते भाजपामध्ये दाखल होऊन पुढील वर्षी होणारी उत्तर प्रदेश विधानसभेची निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. राजेश्वर सिंह (Rajeshwar Singh) हे सध्या लखनौमध्ये ईडीच्या विभागीय कार्यालयात संयुक्त संचालक म्हणून काम पाहत आहेत. बी.टेक, पोलीस, मानवाधिकार आणि सामाजिक न्याय या विषयांमध्ये त्यांनी पीएचडी केली आहे. राजेश्वर सिंह २००९ मद्ये उत्तर प्रदेशमधून प्रतिनियुक्तीवर ईडीमध्ये दाखल झाले होते. उत्तर प्रदेशमध्ये ते राज्य पोलीस सेवेमध्ये काम करत होते. (Rajeshwar Singh, an officer in the ED, on the way to the BJP, applied for retirement, the possibility of contesting the Uttar Pradesh Assembly elections)

सूत्रांनी सांगितले की, राजेश्वर सिंह यांनी सरकारी सेवेमधून सेवानिवृत्तीसाठी अर्ज दाखल केला आहे. ते उत्तर प्रदेशमध्ये भाजपात प्रवेश करू शकतात. तसेच पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भाजपाकडून लढू शकतात. मात्र त्यांचा निवृत्ती अर्ज अद्याप स्वीकारण्यात आलेला नाही, असेही सूत्रांनी सांगितले.

दरम्यान, राजेश्वर सिंह यांची बहीण आभा सिंह यांनी ट्विट करत आपल्या भावाला शुभेच्छा दिल्या आहेत. त्या म्हणाल्या की, देशाची सेवा करण्यासाठी लवकर सेवानिवृत्ती स्वीकारण्यासाठी माझा भाऊ राजेश्वर सिंह याला शुभेच्छा देशाला त्यांची गरज आहे. आभा सिंह ह्या सध्या मुंबईत राहतात.

दरम्यान, उत्तर प्रदेशमधील सुल्तानपूर येथील रहिवासी असलेल्या राजेश्वर सिंह यांना २०१५ मध्ये स्थायी स्वरूपात ईडीच्या कॅडरमध्ये सहभागी करून घेण्यात आले होते. त्यांनी २जी स्पेक्ट्रम वाटप घोटाळ, २०१० मध्ये झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या आयोजनामधील अनियमितता आणि पी. चिदंबरम व त्यांचे पुत्र कार्ती चिदंबरम यांच्यावरील भ्रष्टाचाराचे आरोप, आंध्र प्रदेशचे  मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी आणि झारखंडचे माजी मुख्यमंत्री मधू कोडा यांच्याविरोधातील आरोपांच्या चौकशीचे नेतृत्व केले होते.

दरम्यान, राजेश्वर सिंह यांच्यावर काही आरोपही झालेले आहेत. त्यांच्यावरील अनियमिततेच्या आरोपाची ईडी, सीबीआय आणि सीव्हीसीकडून चौकशी झाली होती. तसेच त्यासंदर्भात न्यायालयाला एक रिपोर्टही पाठवण्यात आला होता. या रिपोर्टमध्ये राजेश्वर सिंह यांच्याविरोधातील आरोपांमध्ये फारसे बळ नसल्याचे सांगण्यात आले होते. तसेच या प्रकरणाचा तपासही बंद करण्यात आला होता. राजेश्वस सिंह यांचा विवाह पोलीस अधिकारी लक्ष्मी सिंह यांच्याशी झाला होता. त्या सध्या लखनौ रेंजमध्ये महानिरीक्षक पदावर कार्यरत आहेत.  

टॅग्स :Enforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयPoliticsराजकारणBJPभाजपाUttar Pradeshउत्तर प्रदेश