राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यामुळे हिंदुत्वाच्या भूमिकेला बळकटीच मिळेल - प्रवीण दरेकर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2021 10:03 PM2021-01-29T22:03:49+5:302021-01-29T22:05:11+5:30

Pravin Darekar : राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यावरून भाजपाने प्रवीण दरेकर यांनी मोठं विधान केले आहे.

Raj Thackeray's visit to Ayodhya will strengthen Hindutva's role - Pravin Darekar | राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यामुळे हिंदुत्वाच्या भूमिकेला बळकटीच मिळेल - प्रवीण दरेकर

राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यामुळे हिंदुत्वाच्या भूमिकेला बळकटीच मिळेल - प्रवीण दरेकर

Next

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे अयोध्या दौरा करणार असल्याचे समजते. यावरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यावरून भाजपाने प्रवीण दरेकर यांनी मोठं विधान केले आहे. राज ठाकरेंच्या या दौऱ्यामुळे हिंदुत्वाच्या भूमिकेला बळकटीच मिळेल, अशी प्रतिक्रिया प्रवीण दरेकर यांनी दिली आहे.

येत्या १ ते ९ मार्च दरम्यान राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याचे नियोजन सुरु आहे. याबाबतची माहिती मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी दिली आहे. याविषयी TV9 या वृत्तवाहिनीशी बोलताना भाजपाचे नेते प्रवीण दरेकर म्हणाले की, शिवसेनेत असतानाही राज ठाकरेंची हिंदुत्वाची भूमिका राहिलेली आहे. अयोध्येत जाऊन राज ठाकरेंच्या हिंदुत्वाच्या भूमिकेला बळकटीच मिळेल. 

याचबरोबर, मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत भाजपा आणि मनसे युती करणार असल्याच्या चर्चा सुरु आहे. यावरही प्रवीण दरेकर यांनी भाष्य केले. यावेळी "युती ही समविचारी घटकांची होत असतो. वैचारिक विचारधारावर होत असते किंवा तशाप्रकारचे वातावरण असते. हिंदुत्वाची भूमिका त्यांनी घेतली किंवा तशाप्रकारचे काही वातावरण आले तर हिंदुत्ववादी विचारांचे पक्ष व संघटना एकत्र येण्यास निश्चितपणे चांगले वातावरण निर्माण होईल, असे मला वाटत असल्याचे प्रवीण दरेकर म्हणाले.

दरम्यान, राज ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी एकाचवेळी अयोध्या दौऱ्याची घोषणा केल्याने आता राज्यात पुन्हा एकदा मनसे आणि भाजपाच्या युतीची चर्चा सुरु झाली आहे. मुंबई महानगरपालिकेसाठी मनसे भाजपासोबत जाणार असल्याची चर्चा सध्या सुरु आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच भाजपाचे आमदार प्रसाद लाड यांनीही राज ठाकरे यांची भेट घेतली होती.

(नुसतं अयोध्येत जाऊन चालत नाही, हिंदू धर्मात चारधाम आहेत - नवाब मलिक)

राज्यात भाजपा- मनसे युती? 
राज्यात भाजपाशी फारकत घेतल्यानंतर शिवसेना ही काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत सत्तेत सहभागी झाली आहे. त्यामुळे शिवसेनेने हिंदुत्व सोडल्याची टीकाही वेळोवेळी होत आहे. याच गोष्टीचा फायदा उचलत मनसेने हिंदुत्वाकडे वाटेने मार्गक्रमण सुरु केले आहे. त्याचवेळी भाजपा आणि मनसेची एकत्र येण्याच्या चर्चांना देखील मोठे उधाण आहे . 
 

Web Title: Raj Thackeray's visit to Ayodhya will strengthen Hindutva's role - Pravin Darekar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.