शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
2
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
3
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
4
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
5
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
6
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
7
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
8
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
9
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
10
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
11
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
12
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
13
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
14
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
15
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
16
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
17
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
18
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
19
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
20
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?

राज ठाकरेंचे लक्ष्य मुंबई, पुणे, नाशिक!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2019 07:01 IST

विधानसभा निवडणुकीसाठी नव्या समीकरणांची तयारी

- अतुल कुलकर्णी मुंबई : एकही उमेदवार उभा न करता राज ठाकरे यांच्या मनसे पक्षाने राज्यभर भाजपच्या विरोधात तयार केलेल्या वातावरणामुळे राज्यात विरोधी पक्ष नेमका कोण? असा प्रश्न निर्माण झाला आहे. ज्या ठिकाणी आम्हाला मतं चांगली मिळाली होती, आमचे आमदार होते, त्या ठिकाणीच आम्ही सभा घेतल्या आहेत, असे मनसेकडून सांगितले जात असले, तरी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मुंबई, पुणे, नाशिक या पट्ट्यात राज यांनी लक्ष्य केंद्रित केल्याचे स्पष्ट आहे.

आत्तापर्यंत त्यांनी राज्यात ७ सभा घेतल्या असून, चार सभा उद्यापासून सुरू होणार आहेत. २०१४मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींची तारीफ करणाºया राज ठाकरे यांनी अचानक मोदी व अमित शहा यांच्याविरोधी भूमिका घेत, राज्यात विरोधी वातावरण तयार केले आहे. क्लिप दाखवून भाजपचा फोलपणा समोर आणत आहेत. एकही उमेदवार उभा न करता राज्यभर चर्चेत राहण्यात ते यशस्वी झाले असून, विधानसभेसाठी राष्ट्रवादीने मनसेला सोबत घेतल्यास आश्चर्य वाटू नये, असे राष्ट्रवादीच्या एका ज्येष्ठ नेत्याने स्पष्ट केले. राज यांच्या सभांमुळे अपेक्षा न केलेल्या जागाही आघाडीला मिळतील, अशी चर्चा आहे.
विधानसभेत राज यांना सोबत घेऊन निवडणुकांना सामोरे जाण्याची तयारी आत्ताच सुरू झाली आहे. राज यांच्या सभांमुळे भाजप शिवसेनेला राज्यात ४८ पैकी ३०चा आकडा गाठता येणे कठीण आहे, असे रिपोर्टस् आहेत. मुंबईतही दोन जागा युतीला गमवाव्या लागतील, असे चित्र आज आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी २०१४ मध्ये ६ जागी विजयी झाली होती. त्यांनी आता २० पर्यंत जाणे म्हणजे तिप्पट यश मिळविणे आहे, असे बोलले जात आहे. त्यामुळे लोकसभेच्या निकालानंतर विधानसभेसाठी राज्यात नवीन राजकीय समीकरणे दिसतील, असे बोलले जात आहे.
जागांचे नवे गणितगेल्या वेळी मुंबई, पुण्यात राष्ट्रवादीच्या औषधालाही जागा आल्या नव्हत्या. नाशिक जिल्ह्यात छगन भुजबळ सोडले, तर पक्षाला यश मिळाले नव्हते. राज यांनाही हेच तीन जिल्हे हवे आहेत. त्यासोबत नांदेड, सोलापूरमधूनही काही जागा मिळाल्या, तर त्याही त्यांना हव्याच आहेत.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019Raj Thackerayराज ठाकरेMNSमनसेNCPराष्ट्रवादी काँग्रेसMumbaiमुंबईthaneठाणेNashikनाशिक