श्रेयवादाची लढाई! “हाफकिनला लसीची परवानगी राज ठाकरेंच्या पत्रामुळे आली; याला म्हणतात ठाकरे ब्रँड”

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2021 09:02 AM2021-04-17T09:02:47+5:302021-04-17T09:04:34+5:30

केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे राज्यात सत्ताधारी शिवसेना आणि मनसेत श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे

Raj Thackeray: MNS Target Shivsena & CM Uddhav Thackeray halfkin gets approval covaxin production | श्रेयवादाची लढाई! “हाफकिनला लसीची परवानगी राज ठाकरेंच्या पत्रामुळे आली; याला म्हणतात ठाकरे ब्रँड”

श्रेयवादाची लढाई! “हाफकिनला लसीची परवानगी राज ठाकरेंच्या पत्रामुळे आली; याला म्हणतात ठाकरे ब्रँड”

Next
ठळक मुद्देकोरोना काळात "राजकारण" नको म्हणण्याऱ्यानी आभार मानायला हरकत नव्हती राज्य सरकारने जानेवारीतच हाफकिंगला लस बनवण्याची परवानगी देण्याचा प्रस्ताव पाठवला होताकेंद्र सरकारने हाफकिन संस्थेस भारत बायोटेककडून तंत्रज्ञान हस्तांतर पद्धतीने कोव्हॅक्सिन बनवण्याची मान्यता दिल्याच्या निर्णयावरून श्रेयवाद

मुंबई – कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे देशभरात चिंतेचे वातावरण पसरलं आहे. तर राज्यातही कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत असल्याचं दिसून येत आहे. या संकटाच्या काळात कोरोना लसीकरणाची मोहिम जास्तीत जास्त वाढवण्याकडे सरकारचा कल आहे. त्यासाठी लस उत्पादन करण्यासाठी केंद्र सरकारने हाफकिन संस्थेस भारत बायोटेककडून तंत्रज्ञान हस्तांतर पद्धतीने कोव्हॅक्सिन बनवण्याची मान्यता दिली आहे.

केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे राज्यात सत्ताधारी शिवसेना आणि मनसेत श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून हाफकिनला लस उत्पादनाची परवानगी द्यावी अशी मागणी केली होती. त्यानंतर काही दिवसांत हा निर्णय झाल्याने मनसेने याचं श्रेय घेतलं. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ट्विट करत म्हटलं की, राज्य सरकारने जानेवारीतच हाफकिंगला लस बनवण्याची परवानगी देण्याचा प्रस्ताव पाठवला होता. पण त्याची परवानगी राजसाहेबांचं पत्र गेल्यावर आली याला म्हणतात "ठाकरे ब्रँड".कोरोना काळात "राजकारण" नको म्हणण्याऱ्यानी आभार मानायला हरकत नव्हती असं सांगत त्यांनी अप्रत्यक्षपणे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना चिमटा काढला आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनीही ट्विट करून १००% लसीकरणाचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी हाफकिन्ससारख्या संस्थेला लस उत्पादन करण्याची मुभा द्यावी ह्या माझ्या विनंतीला आपण मान्यता दिलीत ह्याबद्दल पंतप्रधानांचे मनापासून आभार मानले आहेत. केंद्र सरकारकडून असंच सहकार्य मिळत राहिल्यास एकत्रितपणे आपण ह्या संकटावर सहज मात करू हे नक्की असं राज यांनी सांगितले.

तर दुसरीकडे शिवसेनेचे नेते आणि कार्यकर्तेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रयत्नामुळेच केंद्र सरकारने हा निर्णय घेतल्याचं सांगत आहेत. काही महिन्यांपूर्वी उद्धव ठाकरेंनी हाफकिन संस्थेला भेट दिली होती. त्यानंतर राज्याने केंद्राकडे प्रस्ताव पाठवला म्हणून हाफकिनला लस उत्पादन करण्याची परवानगी मिळाली असल्याचं शिवसैनिक सांगत आहेत. त्यामुळे केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे राज्यात मनसे आणि शिवसेनेत श्रेयवादाची लढाई सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे.

Web Title: Raj Thackeray: MNS Target Shivsena & CM Uddhav Thackeray halfkin gets approval covaxin production

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.