शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
2
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
3
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
4
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
5
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
6
'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन
7
PPF मध्ये काय असतो ५ तारखेचा फंडा, एक दिवस उशिर आणि होऊ शकतं १० हजारांपर्यंतचं नुकसान; समजून घ्या गणित
8
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
9
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
10
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."
11
सर्व दहशतवाद्यांचा शोध घेऊ, पहलगाम हल्ल्यानंतर अमित शहांचा मोठा इशारा; दहशतवादाविरोधात कठोर कारवाई
12
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
13
वैदिक मंत्रोच्चाराने उघडले केदारनाथ मंदिराचे दार; सर्वत्र 'बम बम भोले'चा जयजयकार
14
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
15
देशाची आर्थिक राजधानी, डिजिटल शर्यतीत मागे; मुंबईत फायबर टाकणे सर्वात महाग
16
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
17
तीन महिन्यांत ३६ हजार पर्यटकांकडून नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची सफारी; सिमेंट काँक्रीटच्या जंगलाला कंटाळलेल्या नागरिकांचा आता वन पर्यटनाकडे वाढता कल
18
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले
19
देशावर संकट, पण शत्रू भारताचे वाकडे करू शकणार नाहीत; भेंडवळ घटमांडणीचे भाकीत
20
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात

राज ठाकरे विधानसभेला आघाडीसोबत; मुख्यमंत्र्यांचे भाकीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2019 06:21 IST

शहरांप्रमाणेच ग्रामीण भागातही सर्वत्र मोदी लाट असल्याचा दावा

मुंबई : सध्या लोकांची करमणूक करणारे आणि राजकीय अस्तित्व शोधणारे राज ठाकरे हे पाच महिन्यांनी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीसोबत जातील आणि निवडणूक लढवतील, असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी वर्षा निवासस्थानी निवडक पत्रकारांशी बोलताना केला. राज्यातील पहिल्या दोन टप्प्यातील १७ पैकी १३ लोकसभा जागा भाजप-शिवसेनाच जिंकेल आणि अन्य चार जागांवर आम्हालाच ‘अ‍ॅडव्हान्टेज’ आहे, असे भाकीत त्यांनी ठामपणे वर्तविले. शहरी व ग्रामीण भागातही पंतप्रधान मोदींची सुप्त लाट आहे आणि निकालात ती तुम्हाला दिसेल, असे ते म्हणाले.‘जी गोष्ट बोलताना लाज वाटायला पाहिजे ती ते अभिमानाने सांगतात. सभेच्या सुरुवातीलाच माझा पक्ष कोणतीही निवडणूक लढवित नसल्याचे बोलतात. एखाद्या राजकीय पक्षासाठी एवढी लाजिरवाणी बाब दुसरी असू शकते का, असा सवाल मुख्यमंत्र्यांनी यावेळी केला. २०१४ मध्ये लाटेत मोदी जिंकले, असे राज म्हणाले होते पण नंतर महापालिकेपासून सगळीकडेच मनसे धुतली गेली. त्यामुळे म्हणा किंवा कदाचित नोटाबंदीचा फटका बसल्यामुळे राज हे मोदींबद्दल इतके अस्वस्थ असावेत, असा टोलाही मुख्यमंत्र्यांनी हाणला. ते स्व:त या निवडणुकीत ‘नॉन प्लेअर’ असल्यामुळे आम्ही त्यांना फारशी उत्तरे देत नाही. स्वत: खेळायला आले की पाहू, असे मुख्यमंत्री म्हणाले.विदर्भ आणि मराठवाड्यात पहिल्या दोन टप्प्यात झालेल्या लोकसभेच्या १७ जागांपैकी भाजप-शिवसेना युती १३ जागा निश्चितपणे जिंकेल. उर्वरित चार जागांवरही युतीलाच ‘अ‍ॅडव्हान्टेज’ आहे. आमचे नेते नितीन गडकरी यांचा विजय हा विरोधकांची तोंडे बंद करणारा असेल. मुंबई, ठाण्यातील दहाही जागा आम्ही जिंकू, असा दावा मुख्यमंत्र्यांनी केला. एअर स्ट्राइक, सर्जिकल स्ट्राइकपासून देशाला सक्षम नेतृत्व देण्याची क्षमता या मुद्यांवर राज्यात मोदी लाट असल्याचे आपल्याला प्रचारादरम्यान जाणवते. त्यामुळे गेल्यावेळपेक्षा युतीला अधिक जागा मिळतील, असे मुख्यमंत्री म्हणाले. युतीने गेल्यावेळी ४२ जागा जिंकल्या होत्या.आतापर्यंत राज्यात झालेल्या १७ जागांच्या निवडणुकीचा संभाव्य निकाल आपल्या मते काय असेल?मी लोकांमध्ये जातोय, पंतप्रधान मोदी यांच्या बाजूने प्रचंड सुप्त लाट मला जागोजागी दिसते. पहिल्या व दुसऱ्या टप्प्यात विदर्भात दहा जागांची निवडणूक झाली. त्यातील आठ जागा युती एकतर्फी जिंकेल. अन्य दोन जागांवर वेगवेगळे रिपोर्ट्स येताहेत पण त्यानुसारही युती पुढे दिसते. मराठवाड्यात सहापैकी चार जागा आम्ही नक्कीच जिंकू. इतर दोन ठिकाणी ‘अ‍ॅडव्हान्टेज युती’ आहे. कुठलेही मुद्दे नसले की जातीपातीचे राजकारण केले जाते. तसे काही ठिकाणी झाले पण जनतेने त्याला भीक घातली नाही, हे निकालात दिसेल.सोलापूरच्या तिहेरी लढतीबाबत उत्सुकता आहे, आपल्याला काय वाटते?सोलापुरात भाजपच जिंकेल. तिथे आम्हाला ५० टक्क्यांपेक्षा अधिक मते मिळतील. इतर टप्प्यांमध्ये विशेषत: पश्चिम महाराष्ट्रात माढासह राष्ट्रवादीचे बुरुज ढासळलेले दिसतील. धक्कादायक निकालांची नोंद आम्ही केल्याशिवाय राहणार नाही. मुंबई, ठाण्यातील सर्व दहाही जागा युती जिंकेल. शरद पवार यांच्या पायाखालची वाळू सरकत असल्याने ते वाट्टेल बोलत सुटले आहेत, अशी टीकाही मुख्यमंत्र्यांनी केली.साध्वींचे वक्तव्य अयोग्यचसाध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी शहीद हेमंत करकरे यांच्याविषयी काढलेलेउद्गार अत्यंत अयोग्यच होते. देशासाठी हौतात्म्य पत्करलेल्या व्यक्तीबाबत त्यांनी तसे बोलायला नको होते, अशी स्पष्ट भूमिका मुख्यमंत्र्यांनी या वेळी मांडली. मात्र, प्रज्ञासिंह यांना भाजपने भोपाळमधून दिलेल्या उमेदवारीचे त्यांनी समर्थन केले. राहुल गांधी तर नॅशनल हेरॉल्ड प्रकरणात आरोपी आहेत तरीही काँग्रेसने त्यांना उमेदवारी दिलेली आहे. प्रज्ञासिंह यांना एनआयएने क्लीनचिट दिलेली होती, असे मुख्यमंत्री म्हणाले.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसRaj Thackerayराज ठाकरेcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेसMNSमनसे