शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
2
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
3
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
4
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
5
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
6
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
7
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
8
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
9
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
10
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
11
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
12
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
13
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
14
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
15
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
16
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
17
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
18
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
19
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
20
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा

Jitin Prasad: प्रियंका गांधींमुळे जितिन प्रसादनी काँग्रेसला 'टाटा' केला; 2019 मध्येच बीजे रोवली गेली होती...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 09, 2021 5:30 PM

jitin Prasad left congress: जितिन प्रसाद 2019 मध्येच काँग्रेस सोडून भाजपात जाणार असल्याची चर्चा होती. दोन वर्षांपासून त्यांच्या मनात एक सल होता. सुरजेवाला यांनीच समोर येत प्रसारमाध्यमांना जितिन काँग्रेस सोडत नसल्याचे सांगितले होते. परंतू जितिन काही काँग्रेस सोडत नसल्याचे सांगण्यासाठी कधीच समोर आले नाहीत. 

माजी केंद्रीय मंत्री राहिलेल्या जितिन प्रसाद (Jitin Prasad) यांनी काँग्रेसला टाटा करत आज भाजपात प्रवेश केला. राहुल गांधींचे (Rahul Gandhi) अत्यंत जवळचे असलेले आणि उत्तर प्रदेशमध्ये मोठी राजकीय ताकद असलेले जितिन यांनी प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) यांच्यामुळे काँग्रेस सोडल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. यामुळे 2022 मधील उत्तर प्रदेश निवडणुकीमध्ये काँग्रेसला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. (Why Jitin Prasad left congress? because of Priyanka Gandhi.)

Jitin Prasad: ... म्हणून काँग्रेससोबतचा तीन पिढ्यांचा संबंध तोडला; जितिन प्रसाद यांचा भाजपात प्रवेश

जितिन प्रसाद 2019 मध्येच काँग्रेस सोडून भाजपात जाणार असल्याची चर्चा होती. दोन वर्षांपासून त्यांच्या मनात एक सल होता. सुरजेवाला यांनीच समोर येत प्रसारमाध्यमांना जितिन काँग्रेस सोडत नसल्याचे सांगितले होते. परंतू जितिन काही काँग्रेस सोडत नसल्याचे सांगण्यासाठी कधीच समोर आले नाहीत. 

उत्तर प्रदेशच्या राजकारणातील एक बडे प्रस्थ म्हणून जितिन यांना ओळखले जाते. परंतू प्रियंका गांधी यांनी जेव्हा उत्तर प्रदेशमध्य़े राजकीय हस्तक्षेपास सुरुवात केली तेव्हाच जितिन यांच्या नाराजीची बिजे रोवली गेली होती. तेव्हापासून जितिन यांना पक्षाच्या निर्णयांमध्ये बाजुला केले जाऊ लागले होते. राहुल गांधी त्यांना जेवढे महत्व देत होते, तेवढे त्यांना मिळत नव्हते. तेव्हा ज्योतिरादित्य शिंदे, सचिन पाय़लट आणि जितिन प्रसाद असे काही मोजकेच तरुण नेते गांधी घराण्याच्या जवळ होते.  उत्तर प्रदेशच्या सर्व निर्णयांमध्ये जितिन असायचे. 

Jitin Prasad News: ज्योतिरादित्य शिंदेंनंतर भाजपाने पुन्हा काँग्रेस फोडली; उत्तर प्रदेशचा हा बडा नेता लागला गळाला

2019 मध्ये लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवामुळे राज बब्बर यांनी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता. यानंतर जितिन प्रसाद यांना अध्यक्ष बनविण्याची चर्चा सुरु होती. मात्र, प्रियंका यांनी जितिनना बाजुला सारून अजय लल्लूंकडे पक्षाचे नेतृत्व सोपविले होते. एवढेच नाही तर प्रसाद यांना उत्तर प्रदेशच्या निर्णयप्रक्रियेपासून दूर ठेवले जात होते. त्यांच्या जवळच्या नेत्यांनाही जिल्हा संघटनेतून बाहेरचा रस्ता दाखविण्यात आला होता. जितिन यांना दूर ठेवण्यासाठी काँग्रेसने त्यांना पश्चिम बंगालचा निवडणूक प्रभारी म्हणून पाठविले होते. या साऱ्या प्रकारामुळे जितिन प्रसाद नाराज होते. 

टॅग्स :Priyanka Gandhiप्रियंका गांधीUttar Pradeshउत्तर प्रदेशRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसBJPभाजपा