पंजाब काँग्रेसमधील तिढा सुटला; कॅप्टन मुख्यमंत्री, सिद्धूंना मिळणार त्याहून मोठे पद: हरीश रावत

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2021 01:40 PM2021-07-15T13:40:52+5:302021-07-15T13:42:10+5:30

Punjab Congress Politics: पंजाबमध्ये 2022 मध्ये विधानसभा निवडणूक आहे. यामुळे हे नाराजीचे वादळ शमविण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत. याचबरोबर कॅप्टन अमरिंदर सिंगांच्या कॅबिनेटमध्ये नवीन चेहरे दिसण्याची शक्यता आहे.

Punjab Congress Crisis: Captain Chief Minister, Sidhu will state president: Harish Rawat | पंजाब काँग्रेसमधील तिढा सुटला; कॅप्टन मुख्यमंत्री, सिद्धूंना मिळणार त्याहून मोठे पद: हरीश रावत

पंजाब काँग्रेसमधील तिढा सुटला; कॅप्टन मुख्यमंत्री, सिद्धूंना मिळणार त्याहून मोठे पद: हरीश रावत

Next

पंजाबकाँग्रेसमध्ये (Punjab congress crisis) उठलेले राजकीय संकट शमण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. हरीश रावत यांनी यावर मोठे संकेत दिले आहेत. नवज्योत सिंग सिद्धू (navjot singh sidhu) आणि कॅप्टन अमरिंदर सिंग (captain amrinder singh) यांच्यामधील कलह दूर करण्याचा फॉर्म्युला शोधण्यात आला आहे. यानुसार कॅप्टन मुख्यमंत्री पदी कायम राहणार आहेत, तर नाराज सिद्धूंना काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष बनविले जाणार आहे. (Navjot Singh Sidhu to be Punjab Congress president)

याचबरोबर दोन कार्यकारी अध्यक्ष देखील बनविले जाणार आहे. यापैकी एक हिंदू तर दुसरा दलित समाजाचा असणार आहे. याची अधिकृत घोषणादेखील लवकरच केली जाणार असल्याचे हरीश रावत यांनी सांगितले. सध्या पंजाब काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील जाखड़ आहेत. या दोघांच्या वादात जाखड यांचा बळी जाण्याची शक्यता वर्तविली जात होती. ती आता खरी ठरताना दिसत आहे. 

पंजाबमध्ये 2022 मध्ये विधानसभा निवडणूक आहे. यामुळे हे नाराजीचे वादळ शमविण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत. याचबरोबर कॅप्टन अमरिंदर सिंगांच्या कॅबिनेटमध्ये नवीन चेहरे दिसण्याची शक्यता आहे. पक्षात दोन अध्यक्ष बनविण्यामागे मताचे राजकारण असू शकते. पक्षात यावरून देखील मतभेद होते, की पक्षाचे नेतृत्व हिंदू नेत्याला की शीख नेत्याच्या हाती सोपविले जावे. यावरदेखील तोडगा काढण्यात आल्याचे बोलले जात आहे. 

पंजाबमधील गटबाजीमुळे काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी बुधवारी बैठक घेतली होती. या बैठकीत तोडगा निघण्याची शक्यता होती. या बैठकीत राहुल गांधी, महासचिव केसी वेणुगोपाल, प्रियंका गांधीआणि पंजाबचे प्रभारी हरीश रावत होते. चीन चार दिवसांत पंजाब काँग्रेससाठी चांगली बातमी मिळेल असे संकेत रावत यांनी दिले होते.

Web Title: Punjab Congress Crisis: Captain Chief Minister, Sidhu will state president: Harish Rawat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.