शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

पुण्याची प्रतिष्ठा कमी करणाऱ्या पालकमंत्री गिरीश बापटांनी राजीनामा द्यावा : राष्ट्रवादीची मागणी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2019 19:58 IST

पालकमंत्र्यांनी त्यांचा कार्यकाल कायम त्यांच्या चुकीच्या कामांमुळे चर्चेत ठेवला आहे आणि आता न्यायालयाने त्यांच्यावर ठपका ठेवला आहे याची लाज बाळगुन अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीष बापट यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी शहराध्यक्ष चेतन तुपे यांनी केली.

पुणे : अन्नपुरवठा मंत्री तसेच पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीष बापट यांनी आपल्या मंत्री पदाचा गैरवापर करुन कर्तव्यात कसुर केल्याप्रकरणी न्यायालयाने त्यांच्यावर ठपका ठेवला आहे.या सर्व प्रकारणातील दोषी गिरीष बापट यांच्या राजीनाम्याच्या  मागणीसाठी व त्यांच्या या कृत्याचा निषेध करण्यासाठी पुणे शहर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्यावतीने शहराध्यक्ष चेतन तुपे यांच्या नेतृत्वाखाली लोकमान्य टिळक पुतळा, महात्मा फुले मंडई येथे आंदोलन करण्यात आले.

यावेळी नगरसेवक वनराज आंदेकर , अशोक कांबळे, युवक अध्यक्ष राकेश कामठे, सामजिक न्याय विभागाचे अध्यक्ष विजय डाकले,ओ.बी.सी विभागाचे अध्यक्ष संतोष नांगरे, अल्पसंख्याक विभाग अध्यक्ष इक्बाल शेख पक्षाचे सर्व पदाधिकारी वा कार्यकर्ते उपस्थित होते.

 प्रवक्ते अंकुश काकडे म्हणाले की पुणे शहराचे नाव खाली  घालवण्याचे काम पालकमंत्र्यानी केले आहे तुरडाळ घोटाळा, रेशन घोटाळा, आणि आता तर कोर्टाने त्यांच्या कार्यपध्दतीवरच ठपका ठेवला आहे यासर्व गोष्टींची जबाबदारी स्विकारुन पालकमंत्री गिरीष बापट यांनी राजीनामा द्यावा. 

मुख्यमंत्री पारदर्शक कारभाराचा आव आणतात आणि त्यांचे मंत्रीमंडळातील मंत्र्यावर न्यायलय कर्तव्यात कसुर केल्याचा ठपका ठेवत आहे हा कसला पारदर्शक कारभार , मुख्यमंत्र्यानी त्यांच्या मंत्रीमंडळातील एका जेष्ठ मंत्र्यावर न्यायालयाने ठपका ठेवला म्हणून त्यांचा राजीनामा घेतात आता मुख्यमंत्री अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीष बापट यांचा राजीनामा घेणार का ? पालकमंत्र्यांनी त्यांचा कार्यकाल कायम त्यांच्या चुकीच्या कामांमुळे चर्चेत ठेवला आहे आणि आता न्यायालयाने त्यांच्यावर ठपका ठेवला आहे याची लाज बाळगुन अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीष बापट यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी शहराध्यक्ष चेतन तुपे यांनी केली.

टॅग्स :girish bapatगिरीष बापटPuneपुणेCourtन्यायालयBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेस