पंतप्रधान मोदी असो वा शरद पवार, दोघांचीही भाषा एकच; राजू शेट्टी यांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2021 07:29 IST2021-11-12T07:28:52+5:302021-11-12T07:29:12+5:30

चिखली : सध्या राज्यात राजकीय टोळीयुद्ध सुरू आहे. कोणाला शाहरूख खानचा मुलगा काय पितो यात स्वारस्य आहे, तर कोणाला ...

Prime Minister Narendra Modi or NCP Chief Sharad Pawar, both have the same language; Criticism of Raju Shetty | पंतप्रधान मोदी असो वा शरद पवार, दोघांचीही भाषा एकच; राजू शेट्टी यांची टीका

पंतप्रधान मोदी असो वा शरद पवार, दोघांचीही भाषा एकच; राजू शेट्टी यांची टीका

चिखली : सध्या राज्यात राजकीय टोळीयुद्ध सुरू आहे. कोणाला शाहरूख खानचा मुलगा काय पितो यात स्वारस्य आहे, तर कोणाला समीर वानखेडेंमध्ये. यांच्या या सुंदोपसुंदीमध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष द्यायला कोणालाही वेळ नाही. शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा तीव्र फटका बसलेला असतानाही मोदींनी केवळ गुजरातला मदत देणे पसंत केले तर शरद पवारांनादेखील पश्चिम महाराष्ट्राच्या पलीकडे काही दिसत नाही. शेतकऱ्यांसाठी मोदी असो वा पवार, दोघांची भाषा एकच असल्याची टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी येथे केली. माजी खासदार शेट्टी गुरुवारी बुलडाणा दौऱ्यावर आले होते तेव्हा पत्रकारांशी बोलत होते.

Web Title: Prime Minister Narendra Modi or NCP Chief Sharad Pawar, both have the same language; Criticism of Raju Shetty