Pooja Chavan Suicide Case: Shiv Sena minister Sanjay Rathod trobule, BJP Target CM Uddhav Thackeray | Pooja Chavan Suicide Case: मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला शिवसेना मंत्र्यांकडूनच हरताळ; पोहरादेवी गडावर सोशल डिस्टेंसिंगचा फज्जा

Pooja Chavan Suicide Case: मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला शिवसेना मंत्र्यांकडूनच हरताळ; पोहरादेवी गडावर सोशल डिस्टेंसिंगचा फज्जा

ठळक मुद्देमुख्यमंत्री किमान कोरोनाचे नियम मोडल्याचा गुन्हा दाखल तरी करणार का?भाजपाकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना प्रश्न पोहरादेवी गडावर मंत्री संजय राठोड यांचे शक्तीप्रदर्शन, मोठ्या प्रमाणात समर्थकांची गर्दी

मुंबई – पूजा चव्हाण आत्महत्या(Pooja Chavan Suicide Case) प्रकरणात शिवसेना मंत्री संजय राठोड (Shivsena Sanjay Rathod) अडचणीत सापडले. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात भाजपाने(BJP) थेट मंत्री संजय राठोड यांच्यावर आरोप केले होते, या प्रकरणाची पौलीस चौकशी करत आहेत, परंतु मागील १५ दिवसांपासून बेपत्ता असलेले वनमंत्री संजय राठोड हे पहिल्यांदाच सगळ्यांसमोर आले आहेत. राठोड आज पोहरादेवी गडावर पोहचले आहेत.

मात्र संजय राठोड यांच्या स्वागतासाठी पोहरादेवी गडावर मोठ्या प्रमाणात जय्यत तयारी करण्यात आली आहे, यातच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ठाकरे सरकारकडून आखण्यात आलेली नियमावलीला हरताळ फासण्याचं काम याठिकाणी होत असल्याचं दिसून येते, पोहरादेवी गडावर राठोड यांच्या हजारो समर्थकांनी मोठी गर्दी केली आहे, याठिकाणी मंदिरात धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन करून यज्ञ-हवन केले जात आहे, बंजारा समाजावर आलेले संकट दूर व्हावं यासाठी हा यज्ञ केला जात असल्याचं आयोजकांनी सांगितले.

यवतमाळमधून सकाळी ९ च्या सुमारात संजय राठोड हे पोहरादेवी गडावर येण्यासाठी निघाले, यावेळी त्यांच्यासोबत ८-१० गाड्यांचा ताफा होता, त्यानंतर दिग्रस शहरात पोहचताच ढोलताशांच्या गजरात संजय राठोड यांचे स्वागत करण्यात आले, येथे शासकीय विश्रामगृहात काही वेळ थांबून संजय राठोड हे पोहरादेवी गडाकडे रवाना झाले, तेव्हा दिग्रस ते पोहरादेवी गडापर्यंत त्यांच्यासोबत २०-२५ गाड्यांचा ताफा होता, या सर्व शक्तीप्रदर्शनावर भाजपाकडून टीका केली जात आहे.

“पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणानंतर १५ दिवस वनमंत्री संजय राठोड कुठे होते?”

भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये(BJP Keshav Upadhye) यांनी ट्विट करत म्हटलंय की, २२ वर्षीय युवतीच्या मृत्युप्रकरणात नाव असलेले मंत्री १५ दिवस गायब होतात, मुख्यमंत्री गप्प, मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(CM Uddhav Thackeray) यांच्या आदेशाला हरताळ फासत हे मंत्री सोशल डिस्टेंसिंगचा फज्जा उडवत शक्तीप्रदर्शन करतात, सत्तेची अपरिहार्यता असू शकेल, मुख्यमंत्री किमान कोरोनाचे नियम मोडल्याचा गुन्हा दाखल तरी करणार का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

१५ दिवस मंत्री संजय राठोड कुठे होते?

संजय राठोड यांच्या पहिल्याच कार्यक्रमाला होत असलेल्या गर्दीवर विरोधी पक्ष भाजपाने(BJP) निशाणा साधला आहे. विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर(Pravin Darekar) म्हणाले की, पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणानंतर खरंतरं मंत्र्यांनी समोर येऊन त्यांची भूमिका मांडायला हवी होती, मात्र कॅबिनेट बैठकीला महत्वाचा मंत्री गैरहजर राहतो, यवतमाळमध्ये कोरोनाचा कहर असतानाही पालकमंत्री गायब होते, मग मागील १५ दिवस मंत्री संजय राठोड नियोजन करत होते का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केले आहेत

Web Title: Pooja Chavan Suicide Case: Shiv Sena minister Sanjay Rathod trobule, BJP Target CM Uddhav Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.