शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता-नेता विजयने जाणीवपूर्वक उशीर केल्याने झाली मोठी चेंगराचेंगरी; मृतांची संख्या ४१ वर
2
आजचे राशीभविष्य, ३० सप्टेंबर २०२५: चालू कामात यश मिळेल, सामाजिक क्षेत्रात कीर्ती वाढेल
3
लडाखला परके करताय, वांगचुक यांना सोडा; कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्सची मागणी
4
तरुणींच्या ‘लाइव्ह’ हत्येनं अर्जेंटिना हादरला! 'मित्र'च बनले हैवान, तरुणींची बोटं कापली, नखं उपसली अन्... 
5
शेतकऱ्यांचं मरण : महिनाभरात २६ लाख हेक्टरला फटका; खरिप हंगामातील ५२ लाख हेक्टरवरील पिके गेली पाण्यात
6
सायबर फसवणुकीवर आता एआयचा लगाम; मोबाइल नंबर व आयपी ॲड्रेस होतील ब्लॉक
7
अखेर 'त्या' आईने लढाई जिंकली, २० वर्षांनंतर ६० लाखांची भरपाई; नेमकं प्रकरण काय?
8
ट्रम्प बनले व्हिलन! केली नवी घोषणा; चित्रपटांवरही लावला १००% टॅरिफ
9
‘स्थानिक’ निवडणुकीत दोस्त दोस्त ना रहा! महायुती अन् महाविकास आघाडी फुटणार
10
ठाणे जिल्ह्यात पुरामुळे  हजाराे नागरिकांचे ठिकठिकाणी स्थलांतर; शनिवार, रविवारी पावसाने  दिवसभर झोडपून काढले
11
चांदी दीड लाखांवर, ९ महिन्यांत ७५% लाभ! का वाढतेय चांदीची किंमत?
12
स्वयंपाकघर ते मंत्रालय : ‘विदेशी’ असेल ते हाकला! बलाढ्यांशी टक्कर द्यायला स्वदेशी २.० आंदोलन
13
पाकिस्तानचे शेपूट किती वेळा नळीत घालून बघायचे?
14
संपादकीय : संवेदनशीलतेचा पंचनामा! आता केवळ आर्थिक नव्हे, सरकारी मनाची कसोटी लागणार
15
आता विद्यार्थी ऑनलाइनही शाळेमध्ये दिसणार हजर; यू-डायस प्रणालीत प्रवेश नोंदीसाठी १७ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
16
राजेंद्र लोढांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी; फॉरेन्सिक ऑडिट सुरू
17
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
18
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
19
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
20
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप

Pooja Chavan Suicide case : संजय राठोड यांनी मुख्यमंत्र्यांची वेळ मागितली, पण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2021 16:11 IST

Pooja Chavan Suicide case, Sanjay Rathod wants to meet CM Uddhav Thackeray : पूजा चव्हाण ही मुळची बीडच्या परळीची आहे. तिच्या आत्महत्येनंतर शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांचे नाव समोर आले आहे. त्यांच्या पूजासोबत बोलतानाच्या आणि पुरावे नष्ट करण्याच्या कथित दहा-बारा क्लिपही व्हायरल झाल्याने राज्यभरात हा विषय तापलेला आहे. राठोड यांचे मंत्रिपद जाण्याची शक्यता आहे. 

मुंबई, पुणे : पुण्यातील पूजा चव्हाणआत्महत्याप्रकरणी (Pooja Chavan Suicide case) शिवसेना चांगलीच अडचणीत आलेली आहे. सत्तेत येऊन वर्ष होत नाही तोच नाजूक प्रकरणांतील तिसरे मोठे प्रकरण घडल्याने महाविकास आघाडीही मेटाकुटीला आली आहे. यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) कमालीचे सावध झाल्याचे दिसत आहेत. (Pooja Chavan suicide case Maharashtra)

पूजा चव्हाण ही मुळची बीडच्या परळीची आहे. तिच्या आत्महत्येनंतर शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांचे नाव समोर आले आहे. त्यांच्या पूजासोबत बोलतानाच्या आणि पुरावे नष्ट करण्याच्या कथित दहा-बारा क्लिपही व्हायरल झाल्याने राज्यभरात हा विषय तापलेला आहे. राठोड यांचे मंत्रिपद जाण्याची शक्यता आहे. 

यावर राठोड यांनी आपली बाजू मांडण्यासाठी उद्धव ठाकरेंची वेळ मागितल्याचे सूत्रांनी सांगितले. मात्र, ठाकरे यांनी अद्याप त्यांना वेळ दिलेली नाही. तसेच फोनवरही बोलणे झालेले नाही. याउलट मातोश्रीवरून राठोड यांना तसेच अन्य नेत्यांना या प्रकरणावर प्रसारमाध्यमांमध्ये काहीच बोलू नये, असे आदेश गेलेले आहेत. 

आज सकाळीच पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. यामध्ये त्यांनी दोन दिवसांत पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणातील तपासाची माहिती दिल्याचे समजते आहे. या प्रकरणी मुख्यमंत्री गंभीर असून ते राठोड दोषी आढळले तर त्यांच्यावर कारवाई करू शकतात. यामुळे राठोड यांच्यासाठी आजचा दिवस महत्वाचा आहे. दुसरीकडे पूजा चव्हाण प्रकरणी मुख्यमंत्री संवेदनशील; केवळ आरोपावरून कारवाई करणं चुकीचे आहे, असे माजी मंत्री आणि शिवसेना आमदार दीपक केसरकर यांनी म्हटले आहे. 

पूजा चव्हाण कोण?पुण्यामधील एका उच्चभ्रू सोसायटीत राहणाऱ्या पूजा चव्हाण या तरुणीने रविवारी ७ फेब्रुवारी रोजी इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली होती. तिच्या आत्महत्येनंतर सोशल मीडियावरून उलटसुलट चर्चांना सुरुवात झाली होती. त्यानंतर या प्रकरणात महाविकासआघाडी सरकारमधील शिवसेनेचे मंत्री असलेले संजय राठोड यांचे नाव समोर आले होते. संजय राठोड यांचे नाव समोर आल्यानंतर विरोधी पक्षात असलेल्या भाजपाने या प्रकरणी आक्रमक भूमिका घेतली आहे.

पूजा चव्हाण ही २२ वर्षीय तरूणी बीड जिल्ह्यातील परळीत राहणारी होती, परळीत तिचे आई-वडील राहतात, पूजाच्या ५ बहिणींपैकी ४ बहिणींची लग्न झाली आहे, पूजा कुटुंबाला मुलासारखी होती, फेसबुक, इन्स्टाग्रामवर पूजाचे लाखो चाहते होते, ती डॅशिंग होती, १ महिन्यापूर्वी पूजा पुण्यात स्पोकन इंग्लिशच्या क्लासेससाठी आली होती. भाऊ विलास चव्हाण व मित्र अरुण राठोड यांच्या सोबत ती भाड्याच्या सदनिकेमध्ये राहत होती.

टॅग्स :Pooja Chavanपूजा चव्हाणSanjay Rathodसंजय राठोडUddhav Thackerayउद्धव ठाकरेSuicideआत्महत्याShiv Senaशिवसेना