शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
3
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
4
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
5
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
7
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
8
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
9
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
10
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
11
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
12
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
13
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
14
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
15
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
16
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
17
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
18
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
19
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
20
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम

Pooja Chavan : पूजा चव्हाण आत्महत्येवर मुख्यमंत्र्यांनी आधी बोलणे टाळले; 'चौकशी होईल', म्हणाले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2021 19:10 IST

Pooja Chavan Suicide case, CM Uddhav Thackreay talk on Sanjay Rathod : ट्रान्सहार्बर कामाची आज उद्धव ठाकरेंनी पाहणी केली. यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. सुरुवातीला त्यांनी ट्रान्सहार्बर कामाची माहिती दिली.

पूजा चव्हाण आत्महत्या (Pooja Chavan Suicide case) प्रकरणी सखोल चौकशी केली जाणार आहे. यामध्ये जे दोषी असतील त्यांना शिक्षा केली जाईल. परंतू गेल्या काही दिवसांत एखाद्याला आयुष्यातून उठविण्याचे प्रयत्न पाहिले आहेत. यामुळे कोणी दोषी वाचता नये तसेच कोणाचे आयुष्य उद्ध्वस्त होऊ नये. यामुळे जे सत्य असेल ते जनतेसमोर येईल,  असे मुख्यमंत्री उद्ध्व ठाकरे यांनी म्हटले आहे. (CM Uddhav Thackreay talk on Sanjay Rathod and pooja chavan suicide Case)

ट्रान्सहार्बर कामाची आज ठाकरेंनी पाहणी केली. यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. सुरुवातीला त्यांनी ट्रान्सहार्बर कामाची माहिती दिली. नंतर पत्रकारांनी पूजा चव्हाणचा विषय काढताच, काही काळासाठी त्यांनी हा प्रश्न टाळला. एक्स्प्रेस वेवर प्रश्न सुरु असताना आधी ते बोलतो असे ते म्हणाले. यानंतर पत्रकारांनी पूजाबाबतचा प्रश्न विचारले तेव्हा त्यांनी सखोल चौकशी होईल, असे सांगितले. 

पूजा चव्हाणने आत्महत्या केली तेव्हा तिच्यासोबत दोघेजण उपस्थित होते. तिला अत्यवस्थ अवस्थेत हॉस्पिटलमध्ये नेल्यावर शेजाऱ्यांनी फैलावर घेतल्यावर या दोघांपैकी एका तरुणाने कथित मंत्र्यासोबतच्या संभाषणाच्या क्लीप या स्थानिकांना दिल्याचे समोर आले आहे.

पूजाचा मोबाईल आणि लॅपटॉप ताब्यात घे असे हे संबंधित मंत्री अरुण राठोडला सांगत होते. यवतमाळमध्ये 2 ऑक्टोबरला अॅडमिट असलेली व्यक्ती ही पूजाच होती असे या अरुण याने दिल्याचे पोलिस अधिकाऱ्याने एका टीव्ही चॅनेलला सांगितले. ज्या दिवशी ही घटना घडली तेव्हा तिच्यासोबत असलेले तरुण हे मंत्र्यांच्या सांगण्यावरूनच तिथे आले होते. त्या दोघांना पूजाने आत्महत्या केल्यानंतर शेजाऱ्यांनी पकडून ठेवले होते, असे समजते. अरुण राठोडला या मंत्र्यानेच नोकरीला लावले होते. पूजाचा लॅपटॉप अद्याप सापडलेला नाही, असे समजते. 

राष्ट्रीय महिला आयोगाने पुणे पोलिसांना चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. या घटनेबाबत राष्ट्रीय महिला आयोगाला ट्विटरवर टॅग करण्यात आले होते. तसेच या प्रकरणाची दखल घेण्याची विनंतही करण्यात आली होती. या विनंतीनुसार राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी हे आदेश दिले आहेत. रेखा शर्मा य़ांनी महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकांना आणि पुण्याच्या अतिरिक्त पोलीस आयुक्तांना पत्र पाठविले आहे. यामध्ये लवकरात लवकर पोलिसांनी तपास अहवाल आयोगाला सादर करावा. यामध्ये याप्रकरणी काय कारवाई केली हे देखील असावे, असे म्हटले आहे. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेPooja Chavanपूजा चव्हाणSanjay Rathodसंजय राठोडShiv Senaशिवसेना